भारतीय व ऑस्ट्रेलियन रेल्वेची तुलना २०१८
ऑस्ट्रेलिया सारखे अनेक देश भारतापेक्षा अनेक गोष्टीत पुढे आहेत, परंतु भारतदेखील सध्या बरोबरीने पाउल टाकत आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे भारतीय रेल्वे. चला तर मग बघूया दोन देशातील रेल्वेची तुलना.
१) भारत आणि ऑस्ट्रेलियाची पहिली रेल्वेगाडी :
भारतात प्रथम रेल्वेगाडी १८५३ साली सुरु झाली जी मुंबई बोरी बंदर ते ठाणे या दरम्यान धावू लागली. तर, ऑस्ट्रेलियात पहिली रेल्वे सन १८५६ पासून सुरू झाली होती.
२) सर्वात जलद रेल्वे :
सध्या “गतिमान एक्स्प्रेस” भारतातील सर्वात जलद धावणारी रेल्वे असून, या रेल्वे ची गती २०० किमी/तास पर्यंत जाते, परंतु भारतीय रेल्वे ट्रॅक च्या खराब क्षमतेमुळे या रेल्वे ची गती १६० किमी/तास पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियातील सर्वात वेगवान ट्रेनला “इलेक्ट्रिक टिल्ट रेल्वे” असे म्हणतात, मे १९९९ मध्ये या रेल्वेने उच्च गतीचा (२१० किमी/तास) विक्रम नोंदवला होता परंतु या रेलगाडी ची गती देखील १६० किमी/तास पर्यंत मर्यादित ठेवली आहे याचे कारण देखील भारतासारखेच आहे, रेल्वे ट्रॅक ची असलेली खराब क्षमता.
३) स्वच्छता :
स्वच्छतेच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा बरेच चांगले आहे. ऑस्ट्रेलियन रेल्वे स्थानके आणि रेल्वे स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवले जातात.
तर भारतात परिस्थिती खूपच खराब होती. पण गेल्या १-२ वर्षात भारतात रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेमध्ये बरेच बदल झाले आहेत.
४) रेल्वे अपघात :
या बाबतीत दोन्ही देश समान स्तरावर आहेत. आतापर्यंत ऑस्ट्रेलियात अनेक रेल्वे अपघातात झाले आहेत, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला.
परंतु भारतातील रेल्वे अपघातांची संख्या जास्त आहे आणि रेल्वे अपघातामुळे भारतात हजारो लोक मरण पावले आहेत. दोन्ही देशांतील रेल्वे अपघातांचे कारण एकच आहे, खराब आणि जुनी रेल्वे ट्रॅक व्यवस्था.
५) नियमितता :
भारत जगातील सर्वात कमी नियमितता रेल्वे यादीमध्ये गणला गेला जातो. कारण भारतात सामान्य वातावरणात देखील अनेकदा गाड्या १ ते २ तास उशीरा धावतात आणि खराब वातावरण असल्यास गाड्या १ ते २ दिवसांसाठी विलंबित होतात.
भारतीय रेल्वेच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन रेल्वे अधिक वक्तशीर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ८०-९०% गाड्या वेळेवर धावतात.
६) लक्झरी रेल्वे :
भारताकडे ५ लक्झरी ट्रेन्स आहेत, ज्यामध्ये “महाराजा एक्सप्रेस” हि भारतातील सर्वांत जास्त व प्रसंसनीय सुविधा उपलब्ध असलेली रेल्वे आहे आणि ही ट्रेन जगातील सर्वोत्तम लक्झरी ट्रेनमध्येही मोजली जाते.
तर ऑस्ट्रेलियामध्ये २ लक्झरी ट्रेन्स आहेत: “इंडिअन पॅसिफिक” आणि “द घन”, या रेल्वे मध्ये देखील जगप्रसिद्ध सुविधा उपलब्ध आहेत.
७) मेट्रो रेल्वे :
भारतातील ११ प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे व्यवस्था उपलबद्ध आहेत, तसेच ६ अन्य प्रमुख शहरांत देखील या मेट्रो रेल्वे चे काम चालू आहे. सन १९८४ मध्ये भारतात मेट्रो रेल्वे सुरू केली होती.
परंतु ऑस्ट्रेलियात, सध्या कोणतेही मेट्रो रेल्वे व्यवस्था उपलब्ध नाही. पण २०१९ पर्यंत “सिडनी मेट्रो रेल्वेचा” पहिला टप्पा पूर्ण होणार आहे आणि या व्यवस्थेचा दुसरा टप्पा देखील २०१४ पर्यंत पूर्ण होईल.
ऑस्ट्रेलियामध्ये ३२,७८४ किमी रेल्वे ट्रॅक नेटवर्क आहे आणि त्यातील फक्त ८% रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण केले गेले आहे. तर सर्वात मोठे रेल्वे ट्रॅक नेटवर्क साठी भारत जगात चौथ्या स्थानावर आहे. भारतामध्ये १,१५,००० किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा रेल्वे नेटवर्क आहे. आणि ३८% हून अधिक रेल्वे नेटवर्क चे विद्युतीकरण झाले आहे, आणि २०२१ पर्यंत १००% रेल्वे नेटवर्क चे विद्युतीकरण होईल असे शासनाने घोषित केले आहे.
ऑस्ट्रेलियन रेल्वे व्यवस्थे मध्ये ३६,००० हून अधिक कर्मचारी काम करतात, तर भारतामध्ये ऑस्ट्रेलिया पेक्षा ३८% अधिक कर्मचारी रेल्वे व्यवस्थेमध्ये काम करत आहेत.
भारतामध्ये दरवर्षी 8 करोड लोक रेल्वेद्वारे प्रवास करतात आणि ही जगातील सर्वात मोठी संख्या आहे. भारतीय रेल्वे मध्ये अजून सुधारणा करण्याची गरज आहे कारण भारतातील स्थानिक गाड्यांमध्ये सध्या उपलब्ध असलेली गर्दी आरोग्यासाठी तसेच सुरक्षेच्या कारणास्तव खूप धोकादायक आहेत.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.