ब्लॉग कमी कालावधीत लोकप्रिय कसा बनवतात | How to Start a Blog in Marathi

ब्लॉग कमी कालावधीत लोकप्रिय कसा बनवतात | How to Start a Blog in Marathi

How to Start a Blog in Marathi: आजच्या काळात ब्लॉगिंग सुरू करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की आपला ब्लॉग कमी कालावधीत Successful, Famous आणि Popular कसा बनवावा? कारण आता ब्लॉगिंग मध्ये स्पर्धा खूप जास्त वाढलेली आहे. प्रत्येक व्यक्ती हा कमीत कमी कालावधीत यशस्वी होऊ इच्छितो आहे. त्यामुळे आज आम्ही 10 अशा पद्धती सांगणार आहोत ज्या तुमच्या ब्लॉग्सला कमी कालावधीत एक Popular (लोकप्रिय) ब्लॉग बनवू शकतील.

How to make Blog Popular in short time- Beginner Guide in Marathi

सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की Famous ब्लॉगर बनणे आणि Blogging मध्ये success मिळणे या दोन्ही एकच गोष्टी आहेत. कारण तुम्ही जेव्हा एक यशस्वी ब्लॉगर बनता तेव्हाच तुम्ही प्रसिद्ध ब्लॉगर देखील झालेले असता.

ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होणे आणि यशस्वी ब्लॉगर बनणे याविषयी काही लेखांमध्ये आम्ही आधीच माहिती दिलेली आहे.

परंतू इथे आज आपण फक्त यशस्वी होण्याविषयी नाही तर कमीत कमी कालावधीत यशस्वी होण्याविषयी बोलणार आहोत. त्यामुळे आज आम्ही असे काही मार्ग सांगणार आहोत जे तुम्हाला Short Time मध्ये यश देऊन लोकप्रिय बनवू शकतील.

यासाठी सर्वात आधी आपल्याला हे बघावे लागेल की ज्या ब्लॉगर्स ला लवकर यश मिळते असे ब्लॉगर्स नक्की कशा पद्धतीने काम करतात. याशिवाय जे ब्लॉगिंग मध्ये फेल होतात त्यांच्याकडून काय चुका घडतात याविषयी देखील आपल्याला जाणून घेणे गरजेचे असते. या सर्वांच्या अनुभवातून आपल्याला सुरुवात करायची आहे, जेणेकरून आपल्याकडून काही चुका होणार नाहीत व आपल्याला लवकरात लवकर यश मिळेल. आपला ब्लॉग देखील कमी कालावधीत लोकप्रिय बनू शकेल.

वेबसाईट आणि ब्लॉग ला कमी कालावधीत लोकप्रिय बनविण्याचे मार्ग

इथे सांगितलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर खूप कमी कालावधीत तुमचा ब्लॉग किंवा वेबसाईट सहज लोकप्रिय होऊ शकते.

1. एक ब्रँड सोबत सुरुवात करा

कमीत कमी कालावधीत यशस्वी ब्लॉग बनविण्यासाठी सर्वात जास्त गरजेचे असते ब्लॉगिंग सुरू करण्याच्या आधीची तयारी! त्यामुळे तुम्हाला ब्लॉगिंग सुरू करण्याच्या आधी ब्लॉगिंग विषयी माहिती जाणून घ्यायची आहे. एकदा तुम्हाला blogging विषयी basic knowledge आले की मग तुम्ही ब्लॉगिंगला सुरुवात करू शकतात. त्यासाठी तुम्हाला या लेखाची मदत होईल. काहीही माहिती नसताना ब्लॉगिंग ची सुरुवात करणे म्हणजे डोळ्यांवर काळी पट्टी बांधून एखाद्या खड्यांच्या रस्त्यावर चालण्याचा प्रयत्न करणे. इथे तुम्हाला यशाचा रस्ता कधीच सापडू शकत नाही.

2. आपल्या ब्लॉग मध्ये गुंतवणूक करा

जर तुम्हाला कमीत कमी कालावधीत जर ब्लॉगला प्रसिद्धी मिळवून द्यायची असेल किंवा यश मिळवून द्यायचे असेल तर तुम्हाला तुमच्या ब्लॉग मध्ये काही गुंतवणूक करावी लागेल. तेव्हाच लोक तुमच्या ब्लॉग कडे आकर्षित होतील. तुम्हाला सुरुवाती पासून ब्लॉगला एक ब्रँड बनवायचा आहे. यासाठी तुम्ही सर्वोत्तम ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म WordPress निवडून मग त्यात एक चांगली theme लावून योग्य प्रकारे customization करून ब्लॉगला एक professional look देऊ शकता.

3. काहीतरी नवीन आणि वेगळे लिहा

ब्लॉगिंग मध्ये अपयशी होण्याचे कारण म्हणजे दुसऱ्याची पूर्णपणे कॉपी करणे. तुम्हाला जर कमी कालावधीत Blogging मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळे आणि चांगले लिहावे लागणार आहे. दुसऱ्या एखाद्या ब्लॉगरची कॉपी करणे टाळले पाहिजे. तुम्ही कॉपी केलेली असली तर एकदा लोक तुमच्या ब्लॉगला भेट द्यायला येतील मात्र ब्लॉगवर काही युनिक माहिती नाहीये त्यामुळे ते तुमच्या ब्लॉगवर पुन्हा येणार नाहीत.

4. सर्वात चांगले आणि आकर्षक लिहा

आज इंटरनेट वर ब्लॉगर्स तर भरपूर सारे आहेत आणि प्रत्येक दिवशी संपूर्ण जगभरात हजारो नवीन ब्लॉग्स सुरू होत आहेत मात्र इथे कमतरता आहे ती चांगले लिहीणाऱ्या ब्लॉगर्सची! तुम्ही जर इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आणि युनिक असे लेख लिहिण्यात सक्षम असाल तर मग तुम्हाला यश हे लवकरच मिळणार आहे.

एखाद्याला जर चांगले कंटेंट तुमच्या ब्लॉगवर मिळाले तर तो पुन्हा पुन्हा तुमच्या ब्लॉगवर ते कंटेंट बघायला येईल. त्यामुळे तुमचे रिटर्न व्हिजिटर्स वाढतील आणि ब्लॉगची ट्राफिक देखील वाढेल. याचा अर्थ साधा आहे की तुमचा ब्लॉग काही कालावधीत पॉप्युलर बनलेला असेल. जसे आधी पासून काही ब्लॉगर्स लिहीत आहेत तसे बिलकुल लिहू नका. याशिवाय असे काहीतरी लिहा की जे वाचून तुमचे व्हिजिटर्स हे तुमच्या वेबसाईटचे रेग्युलर वाचक बनतील.

5. योग्य वेळेत पोस्ट करा

जर तुम्ही तुमची डायरी लिहीत असाल तर कधीही तुम्ही पोस्ट केली तरी काही हरकत नसते. याउलट जर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या विषयावर ब्लॉगिंग करायची असेल ज्यात वेळेला महत्व आहे तर मग तिथे तुम्हाला वेळेत आर्टिकल लिहून पाठविणे गरजेचे आहे. माझे मत हे नाहीये की तुम्ही 24×7 फक्त लिहितच रहा, आमच्या बोलण्याचा अर्थ हा आहे की तुमचा पोस्ट टाकण्याचा वेळ हा फिक्स असायला हवा. तुम्हाला नियमित त्याच वेळेला पोस्ट करायची आहे. तुम्ही दिवसाला, 2 दिवसाला किंवा आठवड्याला पोस्ट टाकू शकतात. फक्त तुमचा पोस्ट शेअर करण्याचा एक निश्चित वेळ असायला हवी. त्यामुळे तुमच्या वाचकांना तुम्ही कधी पोस्ट करता याविषयी माहिती असते.

6. Professional बना, Beginner नाही

तुम्हाला एक प्रोफेशनल ब्लॉगर बनून काम करायचे आहे. एखादा नवीन ब्लॉगर म्हणून तुम्ही काम करत असाल तर वाचक तुम्हाला नवीन समजून इग्नोर करायला सुरुवात करतील. तुमच्या वाचकांना असे वाटायला हवे की तुम्ही प्रोफेशनल आहात आणि तुमचा ब्लॉग त्यांच्यासाठी मदत करत आहे. यातून त्यांना दररोज नव-नवीन काहीतरी शिकायला मिळेल म्हणून ते तुमच्याकडे बघतील. आणि यातूनच तुम्हाला कमी कालावधीत यश मिळू शकते.

7. सोशल मीडियाचा वापर करा

कमीत कमी कालावधीत तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर सोशल मीडिया तुमची खूप मदत करेल. प्रत्येक जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे आणि यावर दररोज नवनवीन लोक जोडले जात आहेत. त्यांना तुम्ही तुमच्या ब्लॉग विषयी सांगू शकतात. तुमच्या ब्लॉग च्या नावाने प्रत्येक सोशल मीडिया साईटवर एक अकाउंट ओपन केल्याने तुम्हाला अधिक फायदा होईल. या अकाउंट च्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना तुमच्या ब्लॉग सोबत जोडण्याचा प्रयत्न करत रहा. यासाठी फेसबुक, व्हाट्सअप्प, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्राम या सर्व माध्यमाचा वापर करा.

8. इतर ब्लॉगर्स सोबत जोडले जा

फक्त वाचकांपर्यंत मर्यादित न राहता इतर तुमच्यासारख्या ब्लॉगर्स सोबत कॉन्टॅक्ट करा. त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून त्यांच्या ब्लॉग वर तुमच्या ब्लॉग ची लिंक द्यायला सांगा. तुम्ही इतरांच्या ब्लॉग वर गेस्ट पोस्ट देखील करू शकतात. तुम्हाला अनेक असे लोक मिळतील जे गेस्ट पोस्ट लिहिण्याचा बदल्यात तुम्हाला एक dofollow बॅकलिंग देऊन टाकतात. तुमच्या वेबसाईटला सर्च इंजिन (गुगल, याहू, बिंग,…) मधून organic ट्राफिक येण्यास या लिंक खूप मदत करतात.

9. वेबसाईटचे SEO OPTIMIZATION करा

जेव्हा तुमच्या ब्लॉग वर जास्त ट्राफिक असेल तेव्हा साहजिक आहे की तुमचा ब्लॉग यशस्वी आणि लोकप्रिय झालेला असेल. परंतु ब्लॉग वर ट्राफिक घेऊन येण्यासाठी तुमची वेबसाईट सर्च इंजिन मध्ये टॉप वर रँक व्हायला हवी. Search Engine मध्ये टॉप रँक मिळविण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लॉगला तुमच्या बाजूने Search Engine Optimization करावे लागेल. यालाच SEO म्हणतात.

यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लॉग कंटेंट मध्ये Keywords चा योग्य वापर करावा लागेल. त्यासाठी title SEO फ्रेंडली निवडावे लागेल. तुम्ही लिहीत असलेले कंटेंट देखील SEO फ्रेंडली असावे. यामुळे गुगल सारख्या सर्च इंजिन मध्ये तुमची साईट टॉपला रँक होऊ शकेल.

10. ब्लॉग साठी एक YouTube चॅनल बनवा

आजच्या काळात लोक Text कन्टेन्ट वाचण्यापेक्षा व्हिडीओ कंटेंट बघणे जास्त निवडतात. त्यामुळे तुमच्याकडे तुमच्या ब्लॉगला एक युट्युब चॅनल असावा. आपल्या ब्लॉग च्या नावाने किंवा त्याच्यासाठी एक चॅनल बनवा आणि त्यावर तुमच्या कंटेंट च्या आधारित काही व्हिडीओ टाका. तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये त्या व्हिडीओ ची लिंक टाका आणि व्हिडीओ च्या description मध्ये ब्लॉगची लिंक द्या.

How To Earn Money From Youtube in Marathi | YouTube वरून पैसे कसे कमवायचे

11. वेटर प्रमाणे लोकांची सेवा करा

तुम्ही तुमचा attitude दाखवून कमी कालावधीत जास्त यश मिळवू शकणार नाही. तुम्हाला हॉटेल मधील एखाद्या वेटर प्रमाणे काम करावे लागणार आहे. जास्तीत जास्त लोकांना तुमच्या ब्लॉगशी जोडत जा. जर तुम्ही फक्त पोस्ट लिहून ब्लॉग वर टाकत असाल तर तुमच्या ब्लॉगला यशस्वी होण्यास कालावधी खूप जास्त लागेल. कारण तुम्हाला गुगल मध्ये ब्लॉग रँक झाल्यानंतर ट्राफिक मिळेल आणि तेव्हाच तुमचा ब्लॉग लोकप्रिय होऊ शकेल.

परंतु तुम्ही जर वेटर प्रमाणे काम करत गेला आणि लोकांना विनम्रपणे ब्लॉग सोबत जोडत गेला तर तुमच्या ब्लॉग वर खुप जास्त प्रमाणात ट्राफिक अशीच येऊन जाईल. तुमच्या विनम्र स्वभावावर लोक खुश होऊन ते इतरांना देखील तुमच्या ब्लॉग विषयी सांगतील. हा 11 वा मुद्दा मी वेगळा जोडलेला आहे कारण याचा तुम्ही नाही म्हणाला तरी देखील ब्लॉगिंग मध्ये लवकर यशस्वी होण्यासाठी खूप फायदा होतो.

निष्कर्ष / Conclusion

या 10 अधिक 1 म्हणजे 11 ब्लॉगिंग मध्ये कमी कालावधीत यशस्वी होण्यासाठी टिप्स होत्या. यातून तुम्हाला लवकरात लवकर यश हे नक्कीच मिळणार आहे. याच्या माध्यमातून तुम्ही लवकरात लवकर आणि सहज एक प्रसिद्ध ब्लॉगर बनू शकतात. तुम्हाला कमी कालावधीत यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला दिवस रात्र मेहनत घ्यावी लागणार आहे कारण इथे स्पर्धा खूप जास्त आहे. ब्लॉग टॉप ला घेऊन जाणे तितके जास्त कठीण नाहीये मात्र सोपे देखील नाहीये.

तुम्ही जर एखाद्यावर अवलंबून राहून काम करत असाल तर मग थोडे अवघड जाणार आहे. जितकी जास्त मेहनत तुम्ही स्वतः घ्याल तितकी जास्त लवकर सफलता तुम्हाला मिळू शकते!

मित्रांनो तुम्हाला आता How to Start a Blog in Marathi या आमच्या लेखातून तुम्हाला आता समजले असेल कि ब्लॉग कमी कालावधीत लोकप्रिय कसा बनवतात. तुमच्या काही शंका असतील तर कंमेंट मध्ये त्यांची नोंद करा. मी तुम्हाला एक Professional Blogger व्हायला नक्कीच मदत करेन.

तुम्हाला हा Blogging Beginner Guide in Marathi वर आमचा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.

हे देखील वाचा

12 Benefits of Blogging in Marathi | ब्लॉगिंग करण्याचे काय फायदे आहेत

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

5 thoughts on “ब्लॉग कमी कालावधीत लोकप्रिय कसा बनवतात | How to Start a Blog in Marathi”

  1. Hello… mi english language madhe blogging karat hoto… pn mi ata jevha first time marathi blog karat hoto tar rank math madhe mi focus keyword paste karat hoto tar te hot navhte… tya mdhe copy paste hot nhi ka???

    Reply

Leave a Comment