www.marathivarsa.com

यामध्ये काहीही शंका नाही की भारतामध्ये क्रिकेट हा केवळ खेळच नाही तर लोकांसाठी हा एक धर्म आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा क्रिकेटचा चाहता आहे. चला तर मग जाणून घेऊया या प्रसिद्ध खेळा विषयी काही माहिती.


१) क्रिकेटचा पहिला एकदिवसीय सामना आस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात १९७१ साली खेळला गेला.


2) क्रिकेटचा पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. हा सामना १५ मार्च १८७७ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर खेळला गेला.


३) सचिन तेंदुलकर दुनियाचे सर्वात प्रथम खेळाडू आहेत ज्यांना थर्ड अम्पायर ने आउट केले होते.


४) ऑस्ट्रेलियाचा फलंदाज चार्ली बॅनरमन हा जगातील पहिला असे फलंदाज आहे ज्यांनी १८७७ च्या टेस्ट मॅचमध्ये शतक पूर्ण केलेले.


५) सौरव गांगुली हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याला चार सामन्यांत चार वेळा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळाला आहे.


६) इंग्लंडच्या खेळाडू विल्फ्रेड रोडस याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४२०४ बळी व ३९,९६९ धावा केल्या आहेत.


७) इंझमाम उल हक हा पहिलाच पाकिस्तानी खेळाडू आहे की ज्याने आपल्या करिअरच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली.


८) वीरेंद्र सेहवाग चा टी-ट्वेंटी,एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा: ११९, २१९, ३१९ ही संख्या आहे.


९) एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकाचा अष्टपैलू खेळाडू जयसूर्या यांने शेन वॉर्न पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.


१०) क्रिस गेल जगातील एकमेव असा फलंदाज आहे ज्याने क्रिकेटच्या कसोटी सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता.


११) राहुल द्रविडच्या धावा + जहीर खानच्या धावा = जॅक कॅलिस च्या धावा + विकेट्स.


१२) ख्रिस मार्टिन आणि चद्रशेखर हे दोन विश्वविक्रमी खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत धावांपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.


ख्रिस मार्टिन: ७१ कसोटी, १२३ धावा, २३३ विकेट
चंद्रशेखर: १६७ धावा, २४२ विकेट


१३) बॉलिवूड कलाकार सैफ अली खान यांचे आजोबा इफ्टहार अली खान हे एकमेव असे खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेटची मॅच दोन देशांच्या वतीने खेळली आहे. त्यांनी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघा तर्फे कसोटी सामने खेळले होते.


१४) इंग्लंडचा फलंदाज अलेक स्टुअर्ट याचा जन्म ८/४/१९६३ ला झाला आणि त्यांने आपल्या टेस्ट मॅच च्या करिअरमध्ये ८४६३ धावा केल्या आहेत.


१५) डॉन ब्रॅडमन या खेळाडूने त्याच्या कारकीर्दीत फक्त सहा षटकार मारले आहेत.


१६) पाकिस्तानचा स्लोअर फिरकी गोलंदाज सईद अजमलने पाकिस्तानसाठी अनेक सामने जिंकले आहेत परंतु आज पर्यंत त्याला कधीही सामनावीर म्हणून घोषित केले गेले नाही.


१७) आज पर्यंत क्रिकेट इतिहासातील सर्वांत मोठा योगायोग तेव्हा घडला जेव्हा ११/११/११ ला ११ तास आणि ११ मिनिटांवर दक्षिण आफ्रिकेला १११ धावा हव्या होत्या आणि तेव्हा त्यांची १ विकेट उडाली.


१९) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा १८७७ मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर ४५ धावांनी पराभव केला. १०० वर्षानंतर १९७७ मध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाने पुन्हा ४५ धावांनी विजय मिळवला.


२०) भारत हा एकमेव असा संघ आहे ज्याने ६० षटके, ५० षटके आणि २० षटकांच विश्वकप जिंकले आहे.

  • ६० षटके : १९८३
  • ५० षटके : २०११
  • २० षटके : २००७

२१) वी वी स लक्ष्मण ने १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत पण तो कधीच विश्वचषक स्पर्धेत खेळला नाही आहे.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.


You May Also Like

Add a Comment