Mom Dad status in Marathi | Fathers Day quotes in Marathi | Aai Baba Quotes in Marathi – आई-वडील

Mom Dad status in Marathi | Fathers Day quotes in Marathi | Aai Baba Quotes in Marathi – आई-वडील

Mom Dad status in Marathi: ज्यांचे पालक जिवंत आहेत ते जगातील सर्वात श्रीमंत लोक आहेत. आई वडील म्हणजे देवाचे दुसरे रूपच. जर आपले आई-वडील आपल्यावर खुश असतील तर देवसुद्धा आपल्यावर खुश राहील. ज्या घरात आई-वडिलांचा आदर केला जात नाही त्या घरात नेहमीच दुःखाचे सावट पसरलेले असते, त्यामुळे नेहमीच आपल्या पालकांचा आदर करा. या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्या सोबत Aai Baba Quotes in Marathi मध्ये शेअर करत आहोत, जे वाचून तुम्हाला तुमच्या आई वडिलांचे तुमच्या आयुष्यातील योगदान कळायला मदत होईल व आपल्या पालकांवरील प्रेम अधिक वाढेल.

आजच्या ह्या पोस्ट मध्ये आम्ही Mom Dad status in Marathi, Fathers Day quotes in Marathi, Aai Baba Quotes in Marathi, mother day quotes in Marathi, happy anniversary aai baba in Marathi, marathi status for aai, Marathi status for baba, aai Marathi status, Baba quotes इत्यादी चा समावेश केलेला आहे.

आई बाबा मराठी सुविचार | Aai Baba Suvichar in Marathi

मनाची माया फ़ार निरागस असते..!
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात हरवते..!!

स्वतः डब्बा मोबाईल वापरून मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
—–तो एक बाप असतो…..

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती “आई”…
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते “बाबा”..

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता आहे.

देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे
आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.

ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो
पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही.

जगात असे एकच न्यायालय आहे
की तेथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम.

आईच्या डोळ्यांतील रागाच्या पाठीमागे
वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!

घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही
जीवनात ‘आई’ नावाचं पान कधीच मिटत नाही,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात…!

झाडासारखे जगा… खूप उंच व्हा…
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती,
डोळे वटारुण प्रेम करते ति पत्नी,
आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त आई…..

प्रेमास्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई!
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी?

या जगात एकच सुंदर व गोंडस मुल आहे
व ते प्रत्येक आई जवळ असते!

बाळ जन्म घेण्याच्या आगोदर देवाने त्याला सांगितले,
” आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल….
हे ऐकून मुलगा रडायला लागला….आणि त्याने विचारलं,
तिथे माझी काळजी कोण घेणार???
देव म्हणाला, मी एक परी पाठवली आहे…ती तुझी खूप छान काळजी घेईल..
बाळाने पुन्हा विचारलं, मला बोलायला कोण शिकवणार???
देव म्हणाल, तीच परी तुला बोलायला शिकवेल…
बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला,
मी तुझी प्रार्थना कशी करणार??
देव म्हणाला, परी तुला शिकवेल..
बाळाने विचारलं, मी त्या परी ला ओळखणार कसं??
देव म्हणाला , ओळखायला वेळ नाही लागणार….
पृथ्वीवर लोक तिला ‘आई’ म्हणतात….’

प्रेमात हारलात म्हणून आयुष्य संपवण्यात काहीच अर्थ नाही…
.
.
.
कारण, तिला/त्याला कदाचित दूसरा साथीदार मिळेल….
.
.
.
पण तुमच्या आई-बाबा ला तुमच्यासारखा मुलगा
मुलगी कधीच नाही मिळणार..!!!

प्रेम कुणावर करावं…? ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर,
कि जो आपल्यावर करतो त्याच्यावर?
सर्वाँचे लक्ष वेधुन घेणा-या ‘गुलाबावर’ कि त्याला जपणा-या… काट्यांवर. ……?
काल facebook वर भेटलेल्या’ मुलीवर….
कि आपले सर्वस्व ओवाळुन टाकणा-या ‘आई-वडिलां वर’

देवाने एका ‘आई’ ला प्रश्न विचारला…
.
.
‘ तुमच्या आयुष्यातून सर्वसुख: काढून घेतले…
आणि विचारलं दुसरं काही मागा….तर तुम्ही काय मागणार..??
.
.
त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;
.
.
माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागणार…

कारण, त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख: काहीच नाहीत…”

तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल
पण जर आईचा फोन
उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोडा वेळ
बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात

चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला तर,
“आई ग…!” हा शब्द बाहेर पडतो…
.
पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन
ब्रेक दाबतो तेव्हा “बाप रे!” हाच शब्द बाहेर पडतो.
.
छोट्या संकटासाठी आई चालते
पण मोठ्मोठी वादळ पेलताना बापच आठवतो….

खरे प्रेम आंधळे का असते?
.
.
.
.
.
कारण ?????
आपल्या आईने आपल्याला न बघताचं फक्त
आपल्या येण्याच्या चाहुलानेचं, (आपला जन्म होण्यापूर्वीचं)
आपल्यावर प्रेम करायला सुरुवात केलेली असते..

आईच्या पदरात झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही.
कारण जिन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही.

आई म्हणजे मंदिराच्या उंच कळस,
अंगणातील पवित्र तुळस,
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
वाळवंटात प्यावं अस थंड पाणी,
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी,
आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची बाहूली, आई म्हणजे दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून, आपल्याला भरवणारी..
आई म्हणजे जीवाचं रान करून, आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी,
जे कधी ओरडून समजावणारी.. आईचं बोट धरून,
चालायला शिकवणारी.. आईचं आपले, अस्तित्व घडवणारी.

आई बाबा वरती माया अपार असायला पाहिजे
सागरासारखं प्रेम अभ्याग असायला पाहिजे
श्रावण बाळाने केली जशी सेवा
तशी आपण पण करायला पाहिजे

आई तू उन्हा मधली सावली… आई तू पावसातली छत्री !!
आई तू थंडीतली शाल… आता यावीत दु:खे खुशाल!!
आई म्हणजे मंदिराचा कळस…
आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी!!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी!!
आई म्हणजे वेदने नंतरची सर्वात पहिली आरोळी

अमाप सुख आहे सगळ्यांच्याच पदरात पण ते अनुभवायला आज वेळ नाही
..आईच्या अंगाईची जाणीव आहे पण आईला आज आई म्हणायलाच वेळ नाही..
सगळी नातीसंपवून झाली पण त्या नात्याँना विचारायलाही आज वेळ नाही..
सगळयांची नावं मोबाईल मध्ये सेव आहेत पण प्रेमाचे चार शब्द बोलायलाही आज वेळ नाही

आयुष्यात काही नसले तरी चालेल
पण आई-वडिलांचा हात नेहमी पाठीशी असावा

वडील आणि मुलगा यांच्यामधल्या वाढत जाणाऱ्या ‘जनरेशन ग्याप’
नावाच्या दरीला जोडण्यासाठी ‘आई’ नावाचा भक्कम पुल असतो

वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असत,
पाण्यात न भिजवता किनाऱ्याला नेत असत.

पुरुष शिकला तर फक्त एक पुरुष सुसंकृत होतो
पण एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंब सुसंकृत होते.

नेहमी दोन स्त्रियांचा स्वीकार करा जिने तुम्हाला जन्म दिला
आणि जिने फक्त तुमच्यासाठीच जन्म घेतलाय.

आई म्हणजे कुटुंबाचे हृदय असते.

आईसारखा चांगला टीकाकार कोणी नाही
आणि तिच्यासारखा खंभीर पाठीराखा कोणी नाही.

लहानपणी आपण आई माझ्याकडे ये म्हणून भांडत असतो
आणि मोठेपणी आईला तुझ्याकडे राहूदेत म्हणून भावंडाबरोबर भांडत असतो.

जीवनात दोनच गोष्टी मागा
आई शिवाय घर नको आणि कोणतीही आई बेघर नको.

!! आईच्या !! गळ्याभॊवती तिच्या पिल्लानॆ मारलेली
मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆस पेक्षाही मॊठा दागिणा आह

आई म्हणजे मंदिराचा कळस…..आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी!!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी!!

आई तू उन्हा मधली सावली… आई तू पावसातली छत्री !!
आई तू थंडीतली शाल… आता यावीत दु:खे खुशाल!!

आ म्हणजे आस्था,
ई म्हणजे ईश्वर !!

आई कोणिच नाही ग येथे आधार मनाला देणार
सर्व चुका माफ करुन तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार
आई कोणीच नाही ग माझ आसरा मनाला देणार
मायेने रोज कुशित घेऊन झोपणार

आई च्या कूशीतला तो विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो नेहमीच देई समतोल

आई म्हणजे असते एक माये चा पाझर
आई ची माया असते एक आनंदाचा सागर

आई म्हणजे मंदिराचा कळस… आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात गुण-गुणावी अशी संतवाणी!!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी!!

आई”म्हणजे भेटीला आलेला देव,
“पत्नी” म्हणजे देवाने दिलेली भेट
आणि “मित्र” म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट….

आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा….
पण, कोणत्याही गोष्टीसाठी,
आई-वडिलांना सोडू नका….

सोसताना वेदना मुखातून एक शब्द नेहमी येई
प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर वेदना नाहिशी करते आई …

आई च्या कूशीतला तो विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो नेहमीच देई समतोल

आई म्हणजे असते एक माये चा पाझर
आई ची माया असते एक आनंदाचा सागर

खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य…
या जगात कोणती ही मुलगी ही,
तिच्या नव-यासाठी त्याची “राणी” नसेल ही कदाचित..
पण..????? तिच्या वडिलांसाठी ती,
नेहमीचं एक सुंदर “परी” असतेचं…

पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!

देवाला प्रत्येक ठिकाणी जाणे जमले नाही…
म्हणून त्याने आई निर्माण केली
आयुष्यात कधीही आई ला त्रास देऊ नका
कारण आई हे आपलेला देवाकङुन मिळालेले अनमोलं भेट आहे.

जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर,
जीवन हिच नौका तर आई म्हणजे तीर,
जीवन हिच शाळा तर आई म्हणजे पाटी,
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी….!

आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे
वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.

आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दांची ओळखकरुन दिली
बाबानी शब्दांचा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली
आईने लढण्यासठी शक्ती दिली बाबानी जिकण्यासाठी नीती दिली
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे.

आईसारखा चांगला टीकाकार कोणी नाही
आणि तिच्यासारखा खंभीर पाठीराखा कोणी नाही

आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात पैसा आणि नाव कितीही कमवलतं तरीही
आई वडील गुरू यांच्या आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.

एका आठवड्याचे ‘सात’ वार असतात.
‘आठवा’ वार आहे “परिवार”;
तो ठिक असेल तर सातही वार ‘सुखाचे’ जातील !!

खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा
लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी
दिलेल्या एक रुपयापेक्षा कमीच असते..

जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात
अन् खाणारे पाच असतात तेव्हा एक जण
म्हणते मला भुख नाही ती म्हणजे “आई”

जर तुमच्या कडे अजून कोणतेही Aai Baba Status in Marathi मध्ये असतील तर तुम्ही आमच्या अधिकृत ई-मेल आयडी [email protected] या आयडी वर पाठवा. आम्ही तुमचे निवडक Mom dad Marathi status आमच्या वेबसाईट द्वारे हजारो लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू.

हे देखील वाचा

Success Quotes in Marathi

Love quotes in Marathi

Spiritual Quotes in Marathi

Sad Quotes in Marathi

Motivational Quotes in Marathi

Life quotes in Marathi

Education Quotes in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment