Diwali message in Marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Diwali SMS in Marathi

Diwali message in Marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Diwali SMS in Marathi

Diwali message in Marathi 2023: दरवर्षी दिवाळीचा उत्सव कार्तिक महिन्याच्या अमावास्येच्या दिवशी साजरा केला जातो. हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. यावर्षी म्हणजे 2023 मध्ये दिव्यांचा हा उत्सव 10 नोव्हेंबर रोजी आहे.

दिवाळीच्या या दिवशी सर्व भारतात देवी लक्ष्मीची उपासना केली तसेच दिवाळीच्या रात्री, सर्वत्र दिवे लावले जातात. लोक संध्याकाळी एकमेकांच्या घरी जातात, मिठाई, भेटवस्तूआणि दिवाळीची शुभेच्छा देतात. सोबत आज सोशल मीडियावर Diwali SMS in Marathi शेअर करतात. म्हणूनच आम्ही Diwali message in Marathi आजच्या या लेखात आम्ही घेऊन आलो आहोत सुंदर सुंदर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🪔

Diwali message in Marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Diwali message in Marathi
Diwali message in Marathi

चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!
🪔दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!🪔

स्नेहाचा सुगंध दरवळला..
आनंदाचा सण आला..
एकच मागणे दिवाळी सणाला..
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना..
🪔🪔दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!🪔🪔

सडा घालून अंगणी,
रंग भरले रांगोळीत..
झेंडूच्या फुलांचे तोरण,
दिवा शोभतो दिवाळीत..
हि दिवाळी आपणास सुखकारक
आणि समृद्धीची जावो..!

जाहला आरंभ आनंद पर्वाला,
दीपोत्सव – दिवाळी सुरु झाला..
सप्तरंगात आसमंत उजळला,
चैतन्य, उत्साह मनी उसळला..
धन, आरोग्य, मन:शांति लाभो,
याच शुभेच्छा आपणा सर्वांना.

Diwali Quotes in Marathi | दिवाळी कोट्स मराठी

धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
🪔🪔शुभ दिवाळी!🪔🪔

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
🪔दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !🪔

सण साधासुधा असावा,
नको पैश्यांची उधळण..
क्षणभंगूर प्रतिष्ठेसाठी,
नको आयुष्यभराची चणचण..

नको फटाक्यांचा कचरा,
नको कर्ण कर्कश आवाज..
अंगी पाळावा मंत्र स्वच्छतेचा,
राखा शुद्ध पर्यावरण..

करू दिवाळी साजरी यंदा,
गोर गरिबांना मिठाई वाटून..
हाच संदेश देतो तुम्हाला,
दिवाळी शुभेच्छांमधून..
🪔दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा!!!🪔

सण दिवाळीचा,
आनंददायी क्षणांचा..
नात्यातील आपुलकीचा,
उत्सव हा दिव्यांचा….🪔

Diwali Nimitt Shubhechha | दिवाळी निमित्त शुभेच्छा

Diwali Nimitt Shubhechha
Diwali Nimitt Shubhechha

दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
🪔🪔* शुभ दिपावली *🪔🪔

दिवाळीची रोषणाई, आयुष्यभर उजळू दे,
फराळाचा गोडवा, जिभेवर असू दे,
नात्यांची वीण अशी, कायम घट्ट राहू देत..
दीपावली च्या शुभेच्छांची, बरसात होऊ देत..
तुम्हां सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा….!🪔

नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
🪔दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!🪔

आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
🪔दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🪔

Diwali Wishes in Marathi | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

Diwali Wishes in Marathi
Diwali Wishes in Marathi

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,
सरस्वतीपूजा व दीपपूजा,
दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला..
🪔दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा..!🪔

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!🪔🪔

जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
🪔दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🪔

Diwali Greetings Marathi | दिवाळी शुभेच्छापत्र मराठी

Diwali Greetings Marathi
Diwali Greetings Marathi

धन त्रयोदशी !!
नरक चतुर्दशी !!
लक्ष्मी पूजन !!
बलि प्रतिपदा !!
भाऊबीज !!
आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…
🪔शुभ दीपावली..!🪔

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट..
दिव्यांची आरास, फराळाचे ताट..
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट..
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
🪔शुभ दीपावली..!🪔

सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा
या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो..
दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा..!

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त
मंगलमय शुभेच्छा..!🪔🪔

सण आला मोठा,
नाव त्याचे दिवाळी..
पाच दिवस उठायचे,
लवकरच सकाळी..

उटणे लावू अंगाला,
करु अभ्यंग स्नान..
दिवाळीच्या पहाटे,
रांगोळी काढूया छान..

लख्ख दिव्यांच्या प्रकाशात,
लक्ष्मीचा मंगल प्रवेश होईल..
फराळाच्या आस्वादाने,
साजरी होईल आज दिवाळी..!

Dhantrayodashi Wishes in Marathi | धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी

Dhantrayodashi Wishes in Marathi
Dhantrayodashi Wishes in Marathi

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!

ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ..!

Narak Chaturdashi Wishes in Marathi | नरकचतुर्दशी

नरकासुराचा वध झाला नरकचतुर्दशीला
अभ्यंग स्नान करुनि स्मरावे श्रीकृष्णाला..
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा
अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो !
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !
आपणास स्वर्गसुख नित्य लाभो !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना
सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशी आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !🪔

Laxmi Poojan Wishes in Marathi | लक्ष्मीपूजन शुभेच्छा

Laxmi Poojan Wishes in Marathi
Laxmi Poojan Wishes in Marathi

लक्ष्मीमातेचा आशीर्वाद
आपणां सर्वांवर सदैव राहो,
सुख-समृद्धी, धनसंपदा,
सदृढ आरोग्य यांचा वास
आपल्या घरात सदैव राहो.
✨लक्ष्मीपुजनाच्या
आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

दीपावलीत होती
जसा वर्षाव अनारचा,
तुमच्या जीवनात होवो
वर्षाव धन-संपत्तीचा.
✨लक्ष्मी पूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा.✨

दीपावलीत होती
जसा वर्षाव अनारचा,
तुमच्या जीवनात होवो
वर्षाव धन-संपत्तीचा.
✨लक्ष्मी पूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा.✨

लक्ष्मी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
धन-धान्यांच्या राशी भरल्या
घरी नांदू दे सुख-समृद्धी!
💥लक्ष्मी पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!💥

तुम्हाला व तुमच्या परिवारास
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून
भरभराट होवो,
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो
💥लक्ष्मीपूजनाच्या
मन:पूर्वक शुभेच्छा.💥

Bali Pratipada Wishes in Marathi | बलिप्रतिपदा हार्दिक शुभेच्छा

आज बलिप्रतिपदा!
दिवाळी पाडवा,
राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा..
शुभ दीपावली!

दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी,
इडा पीडा जाऊदेत, बळीचं राज्यं येउ दे!

पवित्र पाडवा
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे !
सुखद ठरो हा छान पाडवा!!
त्यात असु दे अवीट हा गोडवा!!
शुभ पाडवा !!

Bhaubeej Wishes in Marathi | भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

Bhaubeej Wishes in Marathi
Bhaubeej Wishes in Marathi

नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष दिव्यांना उजळू दे
बहीण-भावाचे पवित्र नाते.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

भाऊबीजेचा दिवस खूप खास आहे,
मनात प्रेम आणि विश्वास आहे.
माझ्या प्रिय छोट्या भावा
तुला हॅपी भाऊबीज

आठवण येते बालपणीची,
तुझी गोड हाक तुझी सदैव असणारी सोबत,
तुझा आशिर्वाद सदैव साथ आहे,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

फुलों का तारो का सबका कहना है
एक हजारो में मेरी बहना है….
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा

Final Words

मित्रांनो तुम्हाला आजच्या या लेखात दिलेले Diwali message in Marathi कसे वाटले ते कंमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या कडे सुद्धा काही असेच Diwali SMS in Marathi चा संग्रह असेल तर खाली कंमेंट करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही शेअर केलेले Marathi Diwali Message इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.

मित्रांनो मराठी वारसा टीम तर्फे तुम्हां सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Bhaubeej Messages in Marathi

What is Diwali and how is it celebrated?

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment