जाडेपणा हि सगळ्यांसाठीच एक समस्या आहे यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याचदा लोक आपल्यावर हसतात. जाडेपणा मुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात चरबी साठल्यामुळे आपण जाडे होतो. आज आपण जाडेपणा वर घरगुती उपचार पाहूयात ज्यामुळे आपला वाढलेला वजन कमी करण्यास मदत होईल. आपली खराब जीवनशैली, आपल्या खाण्या पिण्याच्या सवई उदा. जास्त चरबीयुक्त(fatty) पदार्थ खाणे, जास्त प्रमाणात दारू पिणे, शारीरिक श्रम कमी करणे, तेलकट पदार्थ खाणे, व्यायाम न करणे, कमी झोपणे तसेच हार्मोनल समस्यांमुळे पोटाची चरबी वाढणे यामुळे आपण जाडे होतो.
जाडेपणा वर उपचार करणे आवश्यक आहे कारण यामुळे आपल्याला इतर आजार देखील होतात उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदया संबंधी विकार आणि या समस्या निवारणासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीत व आपल्या खाण्या पिण्याच्या सवई मध्ये बदलाव करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आपल्याला नियमित व्यायाम व योगा करणे आवश्यक आहे. कारण असे केल्यामुळे आपण निरोगी व तंदुरुस्त होऊ तसेच याच्यावर काही घरगुती उपचार देखील आहेत.
लाल मिरची कदाचित आपल्याला माहित नसेल लाल मिरची जाडेपणा कमी करण्यासाठी उपयोगी आहे. तसेच आपला वजन कमी करण्यासाठी फायदेमंद आहे. कारण लाल मिरची मध्ये Capsaicin हा एक घटक तत्व असतो जो आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी नष्ट करतो जे उर्जा खपत वाढवण्यासाठी जरुरी असतो. ज्यामुळे आपली पाचन क्रिया पण ठीक राहते. रोज आपण लाल मिरची चा चहा बनवून प्या असे आपण काही दिवसांसाठी करा. एक ग्लास पाण्यात थोडी लाल मिरची टाका आणि चहा बनवा आणि हळू हळू याची मात्रा १ चमचा एवढी वाढवा आणि जास्त लाभासाठी याच्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळा. असा चहा रोज कमीत कमी १ महिन्यासाठी प्या. तसेच आपल्या जेवणात आले, काळी मिरी, राई यांचा वापर करा असे केल्याने आपल्याला फायदा होईल.
लिंबू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद आहे. लिंबाचा रस आपला जाडेपणा कमी करण्यासाठी खूप फायदेमंद असतो. याच्यामुळे आपली पचन क्रिया ठीक होते आणि विषहरण ची प्रक्रिया वाढवतो, ज्यामुळे आपली पचन क्रिया मजबूत होते. म्हत्वाचे म्हणजे जाडेपणा कमी करण्यासाठी आपली पचन क्रिया चांगली असणे आवश्यक आहे. कारण यामुळे आपली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी पोषक तत्व प्रदान करतात आणि याच्यात आपला मेटाबोलीज्म कमी करणारे विषाणू पदार्थ शरीरातून बाहेर काढतात. ३ चमचे लिंबाचा रस, १ चमचा मध आणि अर्धा चमचा काळी मिरी ची पावडर १ ग्लास पाण्यात चांगल्या प्रकारे मिळवून घ्या आणि रोज याचे सकाळी रिकाम्यापोटी सेवन करा. असे आपण ३ – ४ आठवड्यांपर्यंत करा आपला जाडेपणा कमी होण्यास मदत होईल.
एलोवेरा(कोरफड ) जसा आपल्या केसांसाठी व त्वचेसाठी फायदेमंद असतो तसाच आपला जाडेपणा कमी करण्यासाठी देखील उपयोगी आहे. कारण हा आपल्या मेटाबोलीजमला (चयापचयन) उत्तेजित करतो आणि उर्जेची खपत वाढवतो आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतो. याच्यात नैसर्गिक कॉलेजन प्रोटीन असतात जे शरीरातील प्रोटीन सोखण्यासाठी ज्यादा मेहनत करून घेतात. ज्यामुळे पचन तंत्र क्रिया तंदुरुस्त होते आणि पोटातील विषाणू पदार्थ देखील बाहेर निघतात. ज्यामुळे आपल्या शरीरात रोग होण्याही शक्यता कमी होते. याच्यासाठी आपल्याला एक ताजा एलोवेरा (कोरफड)च्या पानामधून त्याचा गर काढा आणि त्याच्यात एक कप पाणी मिळवा किंवा संत्राच्या रस किंवा द्राक्षांचा रस देखील मिळवू शकता. आणि एलोवेरा ४ मिनिटांसाठी असेच राहूद्या आणि नंतर याचे सेवन करा असे केल्याने आपल्याला लवकर फरक जाणवेल.
सफरचंद आपल्याला अनेक प्रकारे फायदा पोचवतो जर आपण apple vinegar चा उपयोग करत असाल तर आपल्याला जाडेपणा कमी करण्यास मदत होईल. याच्यासाठी आपण एक कच्या सफरचंदाचा vinegar करू शकता यामुळे जाडेपणा कमी होतो आणि आपल्याला त्वरित उर्जा मिळते. यामुळे आपल्या शरीरात वाढलेली चरबी नियंत्रणात राहते. एक चमचा apple vinegar एक ग्लास पाण्यात मिळवा आणि याचा सेवन आपण रिकाम्या पोटी करत असाल तर आपली चरबी कमी होईल.
आपण एक चमचा Apple vinegar आणि एक लिंबाचा रस एक ग्लास पाण्या सोबत मिळवून देखील सेवन करू शकता हे देखील आपल्या साठी फायदेमंद ठरेल. apple vinegar चा उपयोग उचित मात्रेत करा कारण याच्या जास्त सेवनाने आपल्या शरीरातील पोट्याशियम चा स्थर व हाडांमधील खनिज पदार्थान मधील घनत्व कमी होऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणून apple vinegar चा वापर योग्य मात्रेत व योग्य त्या सल्ल्याने करा.
मध आणि दालचिनी आपल्यासाठी खूप फायदेमंद आहे जर आपण याचा उपयोग करत असाल तर आपल्याला जाडेपणाची समस्या कमी होऊ शकते. कारण यापासून बनवलेला चहा पिण्याने आपला मेटाबोलीजम चांगल्या प्रकारे चालतो. उर्जा वाढते व शरीरातून विषाक्त पदार्थ बाहेर पडतात आणि आपली पचन क्रिया चांगली होते. ज्यामुळे आपण जेवण चांगल्या प्रकारे पचवू शकतो. हा एक चंगला उपाय आहे.
दालचिनी इन्सुलिन शी लढून भूक कमी करते ज्यामुळे आपल्याला भूक कमी लागते. याच्यासाठी १ कप गरम पाणी घ्या त्यात अडीच चमचा दालचिनी पावडर मिळवा आणि त्यात एक चमचा शुद्ध मध मिळवा आणि यातील अर्धा मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी खा आणि उरलेला अर्धा मिश्रण रात्री झोपण्याच्या आधी घ्या हा आपला जाडेपणा कमी करण्यासाठी एक सरळ व सोपा घरगुती उपाय आहे. आणि त्याच बरोबर नियमित व्यायाम व योग करणे तेवढेच आवश्यक आहे.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.