Information about Malaria in Marathi | मलेरियाची, लक्षणे आणि निदान संबंधित माहिती

मलेरियाची, लक्षणे आणि निदान संबंधित माहिती | Information about Malaria in Marathi

१. दरवर्षी सुमारे 250 दशलक्ष मलेरियाच्या प्रकरणांची नोंद केली जाते. आणखी अवघड गोष्ट म्हणजे अविकसित व गरीब अर्थव्यवस्थांमध्ये बहुतांश भागात मृत्यूंचे प्रमाण जास्त होते.

२. मलेरिया हे प्लास्मामिअम प्रजातींच्या परजीवीमुळे होतो. मच्चर(डास) हा रोगजंतू प्रसार करण्यासाठी वाहक म्हणून कार्य करतो. मलेरिया हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो.

३. मलेरियाच्या वाढत्या प्रभावामुळे आर्टिमिसिनिन आधारित संसाधनांचा एक नवीन गट विकसित केला जात आहे.

४. मलेरियाचे प्रमाण कमी करण्यासाठी मलेरियाच्या डासांचे पैदास नियंत्रित करणे गरजेचे आहे.

५. गर्भवती महिला आणि नवजात अर्भकांना गंभीर मलेरियाचा धोका असतो. या प्राणघातक आजारामुळे पाच वर्षाखालील 85% पेक्षा जास्त वयोगटातील मुले मृत्यूमुखी पडतात.

६. मलेरियापासून दूर राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डासांच्या चावण्यापासून लांब राहा.

७. “मलेरिया” या शब्दाचा अर्थ “खराब हवा” असा होतो. अठराव्या शतकातील लोकांना असे वाटले की दलदलीचा भागात श्वास घेण्यामुळे मलेरिया होतो. पण १८८० मध्ये शास्त्रज्ञांना उघडकीस आणले कि मलेरिया प्लास्मामिअम प्रजातींच्या परजीवीमुळे होतो आणि हा परजीवी डासांमध्ये आढळून येतो.

८. अमेरिकेत दर वर्षी सुमारे 1500 मलेरियाचे रुग्ण भेटतात.

९. मलेरियामध्ये खालील लक्षणे आढळून आहेत:

  1. थंडी वाजून ताप येणे
  2. अंग दुखणे
  3. डोकेदुखी
  4. उलटी
  5. जुलाब
  6. अशक्तपणा
  7. रक्ताचा अभाव
  8. भूक नाही लागणे
  9. श्वास घेण्यासाठी समस्या
  10. कोमा
  11. प्लेटलेटच्या अभावामुळे, लाल स्पॉट्स त्वचेवर येऊ शकतात.

१०. मलेरिया हा संसर्गजन्य रोग नाही. संक्रमित व्यक्तीशी लैंगिक संबंध व संपर्काद्वारे याची लागण होत नाही. जर रुग्णाचा योग्य प्रकारे उपचार केला तर हा गंभीर आजार व मृत्यू टाळता येऊ शकतो.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment