तेलकट त्वचेच्या लोकांना हिवाळ्यात कोणत्याच अडचणी येत नाही परंतु उन्हाळ्यात त्यांना चेहऱ्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. खाली असे काही उपाय नमूद केले आहेत ज्यामुळे गर्मीत आपण तेलकट त्वचेची निगा राखून चेहऱ्याच्या अनेक समस्यांवर मात करू शकतो व चेहऱ्याची चांगली काळजी घेऊ शकतो.
कोमट पाण्याने चेहरा धुणे
तेलकट त्वचा असल्यास कोमट पाण्याने चेहरा साफ करावा कारण कोमट पाण्यात चेहऱ्यावरील तेल प्रभावीपणे मिसळते कोमट पाण्याच्या वापराने त्वचेवरची घाण आणि अशुद्ध द्रव्ये स्वच्छ होतात व चेहऱ्यावरील छिद्रे मोकळी होतात.
सूर्यकिराणांपासून सावधानता
गर्मीत तेलकट त्वचेच्या लोकांचा पाहिला शत्रू म्हणजे सूर्य. अधिक काळ घरबाहेर राहिल्यास सूर्यकिराणांमुळे चेहऱ्यावरील तेलाचे प्रमाण वाढते. UV किरणांमुळे चेहऱ्यावर बाईट परिणाम होतात. सकाळी १० ते संध्याकाळी ३ पर्यंत सूर्यकिरणे तेज व हानिकारक असतात. या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे.
ग्लोइंग त्वचेसाठी काय करावे?
चेहऱ्याची अतिरिक्त स्वच्छता टाळावी
तेलकट त्वचेच्या लोकांनी आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात चेहरा धुण्याची सावधानता बाळगावी. सारखा चेहरा धुतल्याने अतिरिक्त तेलाची समस्या आणखी प्रबळ होते. चेहऱ्यावर अशा सौम्य क्लीनजर चा वापर करावा जो त्वचेला कोरडं न बनवता मऊ व निरोगी ठेवतो.
सकस आहार
आपण जे काही जेवतो त्याचा परिणाम आपत्या त्वचेवर होतो. गर्मीत सकस आहाराकडे वळण्याची चांगली संधी असते कारण आपल्याला भूक कमी लागते. उन्हाळ्यात तेलकट पदार्थ टाळावेत. हिरवी पालेभाजी, फळं यांचा आहारामधे समावेश असल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते.
आठवड्यातून दोन वेळा फेस पॅक चा वापर
त्वचेच्या चिकटपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा फेस पॅक चा प्रयोग करावा. आज़ बाजारात विविध समस्यांसाठी उदा. Acne, काळे डाग, मोठी छिद्र, सफेद डाग यासाठी अनेक प्रकारचे फेस पैक अपलब्ध आहेत. आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपण फेस पॅक निवडून वापरावा.
जास्त पाणी पिणे
चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी एक उपाय म्हणजे आपल्या शरीरातील पाणी जास्त पाणी पिणे कधीच कमी पडू देऊ नये. साखरयुक्त पेय टाळावीत व दिवसातून जास्तीत जास्ती पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. बाहेर पडतान आपल्यासोबत पाण्याची बॉटल ठेवावी आणि गरज भासल्यास पाणी प्यावा.
मला आशा आहे, या लेखामधून तुम्हाला तेलकट त्वचेची निगा राखण्याचे उपाय समजले असतील. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!