भगवान गौतम बुद्धांचे 40 अनमोल विचार | Gautam Buddha Quotes In Marathi
आर्थीक विषमता शेतकर्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे.
– गौतम बुद्ध
पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची छाया अघिक शीतल असते.
– गौतम बुद्ध
आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दु:ख होय.
– गौतम बुद्ध
आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.
– गौतम बुद्ध
भयाने व्याप्त असणारया या विश्वात दयाशील वृतीचा मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.
– गौतम बुद्ध
कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.
– गौतम बुद्ध
मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा.
– गौतम बुद्ध
जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो, त्यालाच मी खरा सारथी समजतो.
– गौतम बुद्ध
क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समाजाला जातो.
– गौतम बुद्ध
जो स्वता:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.
– गौतम बुद्ध
माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.
– गौतम बुद्ध
विश्वाचा आदि आणि अंत याच्या भानगडीत पडू नका.
– गौतम बुद्ध
दुसऱ्यांच्या दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.
– गौतम बुद्ध
वैर प्रेमाने जिंकावे.
– गौतम बुद्ध
शरीर धर्म सगळ्यांना सारखेच आहेत त्यामुळे वर्ण श्रेष्ठत्व मूर्खपणाचे आहे, सगळी माणसे सारखीच आहेत.
– गौतम बुद्ध
देव आणि भक्त यां मध्ये मध्यस्थाची गरज नाही.
– गौतम बुद्ध
पशूंना बळी देणे ही अंध श्रद्धा आहे.
– गौतम बुद्ध
सत्य पालन हाच धर्म आहे बाकी सर्व अधर्म आहेत.
– गौतम बुद्ध
स्रीयांना एक तर्हेचा नियम लागू करणे, व पुरुषांना दुसरा नियन लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.
– गौतम बुद्ध
पाप अपरिपक्व असे पर्यंत गोड लागते; परंतु ते पक्व होऊ लागले की खूप दु:खकारक असते.
– गौतम बुद्ध
स्वत:च्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड हि रचले आहे.
– गौतम बुद्ध
ज्याला खोटं बोलायला लाज वाटत नाही, त्याचे साधूपण रिकाम्या मटक्याप्रमाणे आहे. साधुतेचे एक थेंबदेखील त्याच्या हृदयात नाही.
– गौतम बुद्ध
हजारो पोकळ शब्दांपेक्षा एकच चांगला शब्द योग्य आहे ज्यामुळे शांती नांदेल.
– गौतम बुद्ध
संतोष सर्वात मोठे धन आहे, निष्ठा सर्वात मोठे संबंध आहे आणि आरोग्य सर्वात मोठे उपहार आहे.
– गौतम बुद्ध
पाण्याकडून हे शिका – जोराच्या लाटेने कदाचित झुडुपं विखुरली जाऊ शकतात पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते. त्यामुळे शांत राहायला शिका.
– गौतम बुद्ध
कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहात नाही. कोणते काम करायचे शिल्लक आहे याकडेच माझे लक्ष असते.
– गौतम बुद्ध
लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे. पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.
– गौतम बुद्ध
दयाळूपणा दाखवा. नेहमी प्रेमाने वागा. तुमचा हेतू चांगला आहे ना हे तपासून पाहा. तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा आणि नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा.
– गौतम बुद्ध
तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळंच तुम्हाला इथेच भोगावी लागतात.
– गौतम बुद्ध
तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका.
– गौतम बुद्ध
नेहमी चांगला विचार करा. दुसऱ्यांबरोबर चांगले वागा. त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल.
– गौतम बुद्ध
आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो. आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो. आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा.
– गौतम बुद्ध
दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबातच नाही. पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे.
– गौतम बुद्ध
एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो.
– गौतम बुद्ध
एखाद्याची प्रशंसा केल्याने तुमचा आणि त्यांचा आनंद वाढेलच. पण तसे नाही केले तर तुम्हालाच अधिक दुःख मिळेल.
– गौतम बुद्ध
आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही. तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे.
– गौतम बुद्ध
दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी वा दुःखी करू शकेल असा विचार करणेच हास्यास्पद आहे.
– गौतम बुद्ध