Information About Pakistan in Marathi | पाकिस्तान संबंधित काही आश्चर्यकारक माहिती
हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे दोन देश विभाजनानंतर एकमेकांचे शत्रू म्हणून जगाच्या समोर आले. १४ ऑगस्टला पाकिस्तानात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो तर १५ ऑगस्ट ला भारतामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. पाकिस्तानविषयी, आपण दैनिक वृत्तपत्रात काही ना काही चांगले वाईट वाचतच असतो. पण पाकिस्तानाबद्दल काही अशा गोष्टी आहेत ज्याबद्दल तुम्हाला क्वचितच माहिती असेल. तर चला मग जाणून घेऊया पाकिस्तानाशी संबंधित काही आश्चर्यकारक माहिती.
१) पाकिस्तान हा जगातील पहिला मुस्लिम देश आहे जिथे अणुऊर्जा आहे.
२) पाकिस्तान मधील केवळ दोनच लोकांनी नोबल पारितोषिक जिंकले आहेत. एक मालाला युसूफझाई यांना २०१४ मध्ये शांतता पुरस्कार देण्यात आला आणि अब्दुल सलाम यांना १९७९ मध्ये भौतिकशास्त्र साठी पारितोषिक देण्यात आले.
३) पाकिस्तान देशाचे अधिकृत नाव “इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान” असे आहे.
४) १९४७ साली पाकिस्तान ब्रिटिश भारतीय साम्राज्यापासून मुक्त झाले.
५) पाकिस्तानालगत अफगाणिस्तान, चायना, भारत आणि इराण या देशा च्या सीमा आहेत.
६) पाकिस्तानाची राष्ट्रीय भाषा उर्दू आहे तर अधिकारिक भाषा इंग्रजी आहे.
७) एका सर्वेक्षणानुसार पाकिस्तानचे राष्ट्रगीत जगातील सर्वोत्तम आहे
८) युरोपियन बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन संस्थेद्वारे १२५ देशांच्या सर्वेक्षणानुसार सर्वात हुशार आणि बुद्धिमान व्यक्तींच्या यादीत पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे.
९) सर्वाधिक शास्त्रज्ञ आणि अभियंते असलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तान सातव्या क्रमांकावर आहे.
१०) आंबा पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ आहे आणि जास्मिन राष्ट्रीय फूल आहे.
११) पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी मारखोर आहे तर राष्ट्रीय पक्षी चकोर आहे.
१२) २३ मार्च रोजी पाकिस्तानचा प्रजासत्ताक दिन आहे. याला ‘पाकिस्तान डे’ असे सुद्धा म्हटले जाते.
१३) इस्लामाबाद पाकिस्तानचे राजधानी आहे आणि इस्लामाबाद ची लोकसंख्या ९,१९,००० आहे.
१४) पाकिस्तानामध्ये मुसलमानांची बहुतेक लोकसंख्या आहे. जवळजवळ ९६.४% लोक मुस्लिम आहेत आणि उर्वरित लोक हिंदू आणि ख्रिश्चन धर्माचे आहेत.
१५) पाकिस्तानची जीडीपी ८८४.२ अब्ज डॉलर आहे.
१६) १९६५ मध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. १७ दिवस चाललेल्या या युद्धात दोन्ही देशातील हजारो लोक जखमी झाले आणि मारले गेले. इतिहासात द्वितीय विश्व युद्धा नंतर भारत-पाकिस्तानामधील हे युद्ध सर्वात विनाशकारी युद्ध मानले जाते.
१८) १९७३ मध्ये पाकिस्तान ने संसदीय व्यवस्थेसाठी शासकीय संविधान स्वीकारले.
१७) १९६५ मध्ये दोन्ही देशांनी विजय प्राप्त झाल्याचा दावा केला. हे युद्ध सोव्हिएत युनियन आणि यूनाइटेड स्टेट्स हस्तक्षेपानंतर संपले.
१८) १९७३ मध्ये पाकिस्तान ने संसदीय व्यवस्थेसाठी शासकीय संविधान स्वीकारले.
१९) बेनझीर भुत्तो पाकिस्तानाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या तसेच मुस्लिम राष्ट्रातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.
२०) १९९१ मध्ये दिलेल्या शिकवणीनुसार इस्लामिक कायदाच पाकिस्तानाचा कायदा बनला.
२१) पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये २ मे, २०११ या दिवशी यूनाइटेड स्टेट्स फोर्सने ओसामा बिन लादेनची हत्या केलेली. ते अल कायदाचे लीडर होते.
२२) पाकिस्तानचे इंटरनेट कोड .पिके(.pk) आहे.
२३) पाकिस्तानाची एकूण लांबी ७७८९ किलोमीटर लांब रेल्वेने व्यापलेली आहे. या लांबीच्या ७४७७ किलोमीटरचा ब्रॉडगेज आणि ३१२ किमी चा छोटा गेज आहे.
२४) पाकिस्तानाच्या कराचीमधील मुहम्मद बिन कासिम बंध हे प्रमुख बंदर आहे.
२५) कबीर-ए-आझम मोहम्मद अली जिना ( १८७६-१९४८) पाकिस्तान देशाचे पिता असल्याचे म्हटले जाते.
२६) पाकिस्तानाचे राष्ट्रगीत ८० सेकंदाचे आहे.
२७) पाकिस्तानामध्ये अठरा वर्षाचा व्यक्ती मतदानास पात्र ठरतो.
२८) पाकिस्तान सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय रस्ते आहेत जसे की काराकोरम महामार्ग.
२९) पाकिस्तान मध्ये जगातील सर्वात मोठी कालवा आधारित सिंचन प्रणाली आहे.
३०) पाकिस्तानामध्ये जगातील सर्वात मोठी रुग्णवाहिका नेटवर्क आहे. यासंदर्भात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पाकिस्तानची “एधि फाउंडेशनची” नोंदणीदेखील करण्यात आली आहे.
३१) उर्दु आणि पर्शियन भाषेमध्ये पाकिस्तान शब्दाचा अर्थ “पवित्र जमीन” असे आहे.