New Modern Ukhane In Marathi Part 2 | आधुनिक उखाणे भाग २ | Latest Marathi Ukhane
20 January 2020, लेखक: सुजिता म्हात्रे | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


आजच्या काळात खूप साऱ्या स्त्रिया या स्वावलंबी झाल्या आहेत, त्या स्वकष्टाने आपल्या साथीदाराला ह्या ना त्या कारणाने मदत करत असतात. अश्या mordern स्त्रियांचे हे काही Morden Marathi Ukhane . हे Latest New Ukhane तुम्हाला नक्की आवडतील.
New Latest Best Ukhane in Marathi for Lagn, Festival, haladikunku, pooja and many other functions.


__च नाव घेताना होते मी Blush,
Life मधले Tensions सारे, होणार आता Flush

स्मार्ट Couple करते, कामांची वाटणी...
मी करते इडल्या आणि, ------ राव वाटतात चटणी

शॉपिंगला जायला, तयार होते मी झट्कन ...
__चे नाव घेते, तुमच्यासाठी पटकन

लग्नाआधी डेटिंगचे, आम्ही सारे रेकॉर्ड तोडले
घरच्यांनी बघितले आणि __शी लग्न लगेच जोडले

लग्नाआधी डेटिंगचे, आम्ही सारे रेकॉर्ड तोडले
घरच्यांनी बघितले आणि __शी लग्न लगेच जोडले

इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी
__मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी

एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल
__सोबत असताना, कशाला हवा हमाल

मंथ एन्ड आला की, भरपूर वाढते काम
ऑफिस मध्ये बॉस आणि घरी __ कटकट करते जाम

मंथ एन्ड आला की, Work Load ने जीव होतो हैराण
__सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण

Royal च्या बुलेट वर __ दिसतो एकदम फिट,
बोलू दे लोकांना, आपण आपले जाऊ डबल सीट

पोळीचे नकाशे बनवणं, ही __ची कला,
त्यानेही बनवल्या गोल तर, भाव कोण देणार मला?

ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
__तू मला, सुपरवूमन वाटतेस

उडालाय जणू काही, आयुष्यातील रंग
__ माझी नेहमी, Whatsapp मध्ये दंग

कधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त
_च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त

लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा
तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?

यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली
__ आल्यापासून सॅलरी कधी नाही पुरली

बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून
__शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून

दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते
__च्या एका स्माईल ने दिवसभराचे टेन्शन पळते

इस्त्री केल्यावर कॉलर राहते एकदम ताठ
माझ्या__चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ

तिची नि माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफूल
__ माझी आहे खरंच कित्ती ब्युटीफुल!

माझ्या __ चा चेहरा आहे खूपच हसरा
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे क्षणामध्ये विसरा

मिळून काम केल्यावर कामं होतात लवकर
मी चिरते भाजी आणि __ लावतो कुकर

You May Also Like

;
;