Lagnasathiche Navin Ukhane In Marathi | लग्नासाठीचे नवीन व सोपे उखाणे

लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू,
……..रावांना घास देताना, मला येई गोड हसू

शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी
……..राव म्हाजे माझ्या जीवनसाथी

चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल,
……..रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल

आकाशाच्या अंगणात, ब्रह्मा, विष्णू आणि महेश,
……..रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश

गर्द आमराई त्यामाध्ये पोपटाचे थवे,
……..चे नाव माझ्या ओठी यावे

गोव्यावरून आणले काजू,
……..रावांच्या थोबाडीत द्यायला मी का लाजू

वड्यात वडा बटाटावडा,
……..मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा

सुंदर सुंदर हरिणाचे इवले इवले पाय,
आमचे हे अजून कसे नाही आले
गटारात पडले कि काय

निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान,
……..रावांचा आवडता छन्द म्हणजे सतत मदिरापान

एक होती चिऊ एक होती काऊ,
……..रावांचे नाम घेते काय काय खाऊ

शिडीवर शिडी बत्तीस शिडी,
……..राव ओढतात विडी अन मी लावते काडी

तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
……..रावांशी केले लग्न, आता आयुष्याची वाट

विडाच्या पानात पावशेर कात,
……..रावांच्या कमरेत घातली गाढवाने लात

चांदीच्या ताटात ठेवले होते गहू,
लग्न झालेच नाही तर नाव कशे घेऊ

साठ्यांची बिस्किटे ,बेदेकारंचा मसाला,
……..नाव घ्यायला आग्रह कशाला

हाताने कराव काम मुखाने म्हणावे राम,
……..रावांचे चरण हेच माझे चारधाम

सागवानी पेटीला सोन्याची चूक,
……..रावांच्या हातात कायद्याचे बुक

चांदीचा पात सोन्याचे ठसे,
……..राव बसले आंघोळीला सोन्यावाणी दिसे

केळे देते सोलून पेरू देते चोरून,
……..रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून

आनंदाने भरला ,दिन हा लग्नाचा,
……..ल घास देते ,गोड जिलेबीचा

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.