Vat Purnima Marathi ukhane | Vat purnima status in Marathi वट पूर्णिमा उखाणे । वट सावित्री उखाणे Ukhane in Marathi

Vat Purnima marathi ukhane | Vat purnima status in Marathi

Vat purnima ukhane Marathi: मैत्रिणींनो बघता बघता लगेचच वट पूर्णिमेचा सण आला. वट पूर्णिमा आहे तर आपल्या पतिदेवासाठी एक उखाणा तर आपल्या कडे तयार पाहिजेच, म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला वट पूर्णिमेच्या सणाला घेतले जाणारे सुंदर सुंदर उखाणे सांगणार आहोत.

पहाटे अंगणी माझ्या सुगंधी
प्राजक्ताचा सदा वटपौर्णिमेच्या दिवशी
रावांचा नाव घेऊन भरला मी हिरवा चुडा

सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न
रावांसोबत झाले आताच माझे लग्न

वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी
….. रावांसाठी दिर्घायुष्य मागते

त्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्
….रावांसोबत झाले आताच माझे लग्न

देवीची भरली ओटी वाचला देवीचा पाठ
…..रावांबरोबर बांधली जन्मोजन्माची गाठ

भरझरी साडी जरतारी खण
….. रावांचे नाव घेते, वटसावित्रीचा आहे सण

जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी
…… रावांची साथ जन्मोजन्मी असावी

नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे
….. रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे

वटपौर्णिमा स्पेशल मराठी उखाणे | Best Marathi Ukhane For Vat Purnima

Best Marathi Ukhane For Vat Purnima
Best Marathi Ukhane For Vat Purnima

वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाला फेरे घालते सात…
__रावांची लाभो मला, जन्मोजन्मी साथ

गुलाबाच्या फुलांपेक्षा, नाजूक दिसते शेवंती…
__रावांना मिळो दीर्घायुष्य, हीच देवाला विनंती

तीन वर्षांतून एकदा, येतो अधिकमास…
____रावांसाठी ठेवला, मी वटपौर्णिमेचा उपवास

वटवृक्ष सांगतो, सत्यवान-सावित्रीचा इतिहास…
__रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेसाठी खास

वडाची पूजा करून, मागितले दीर्घायुष्याचे दान…
____रावांसोबत, मी संसार करीन छान

वडाच्या झाडाला घातल्या, प्रदक्षिणा एकशे आठ…
____रावांसोबत बांधली, मी जन्मोजन्मीची गाठ

रामाने सीतेसाठी, उचलले शिवधनुष्य…
____रावांसाठी मागते, देवाकडे दीर्घायुष्य

वटपौर्णिमेला आहे, वडाला खूपच महत्त्व…
____रावांची वाढत राहो, कीर्ती आणि कर्तृत्व

पतिव्रता धर्माचा, सावित्री आहे आदर्श…
____ रावांचे नाव घेताना, होतो खूपच हर्ष

वटपौर्णिमेचे व्रत, निष्ठेने करते…
____रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते

पतिव्रता सावित्रीपुढे, हार मानली यमाने…
____रावांचे नाव घेते, आदर व प्रेमाने

वटपौर्णिमेचे व्रत करते, सत्यवान-सावित्रीला स्मरून…
____रावांसाठी दीर्घायुष्य मागते, वडाला नमस्कार करून

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी, नका फांद्या तोडू …
____रावांचे नाव नाव घेते, वेळीच हा वेडेपणा सोडू

फांद्या तोडून नका घेऊ, वटवृक्षाचे प्राण…
____राव म्हणतात झाडं म्हणजे, ऑक्सिजन ची खाण

पतीच्या दीर्घायुष्यासाठी, नका करू वडाची कत्तल…
____रावांची शप्पथ, निसर्ग घडवेल तुम्हाला अद्दल

पूजेच्या नावाखाली फांद्या तोडणं, पटत नाही मनाला…
____रावांच्या दीर्घायुष्यासाठी, मनातच स्मरते वडाला

मैत्रिणींनो तुम्हाला जर का हे Vat Purnima marathi ukhane आवडले असतील तर Whatsapp आणि Facebook द्वारे तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.

तसेच तुमच्या कडे सुद्धा काही असेल Vat Purnima Ukhane Marathi किव्हा Vat Purnima Marathi status असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. आम्ही तुम्ही दिलेले वटपौर्णिमा मराठी उखाणे आमच्या वेबसाईट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू.

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.