Funny Ukhane In Marathi | नवरीचे विनोदी उखाणे | Navariche Ukhane 2024

Funny Ukhane In Marathi | नवरीचे विनोदी उखाणे | Navariche Ukhane 2024

Funny Ukhane In Marathi: नमस्कार, आजच्या या ukhane Marathi funny लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत एकदम खास निवडक funny ukhane. या लेखामध्ये आम्ही Marathi ukhane for female funny तसेच marathi ukhane for male funny समाविष्ट केलेले आहेत.

तर मित्र आणि मैत्रिणींनो लग्नाची तयारी करताय तर या Ukhane in Marathi comedy मधील एक तर उखाणा नक्की लक्षात ठेवा जेणे करून तुमचे Comedy ukhane लग्नातील लोकांना पोट धरून हसायला भाग पाडेल.

तुम्हाला जर का हे vinodi ukhane आवडले तर तुमच्या मित्रांसोबत किव्हा तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. आणि सणासुदीला जाताना यातला एक तरी उखाणा नक्की लक्षात ठेवा.

Ukhane Marathi funny / Ukhane in Marathi comedy

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
गणपतराव अजून आले नाहीत, पिऊन पडले कि काय

एक होती चिऊ एक होती काऊ,
गणपतरावांचे नाव घेते, डोक नका खाऊ

समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू,
गणपतराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू

तळ्यातल्या चिखलात लाल कमळ उगवले,
गणपतराव पडले खड्यात, त्यांना चौघांना उचलले

गणपतीच्या देवळात शंकराची आरती,
गणपतराव गेले वरती, नी मी राहिले खालती

लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास,
आणि गणपतरावांच्या घशात अडकला घास.

रेशमी सदऱ्याला प्लास्टिक चे बक्कल,
गणपतरावांना आहे टक्कल पण त्यात नाही अक्कल

लाडाने गेले जवळ, केली जरा घसट
गणपतराव एकदम खेकसले, फारच बाई तिरसट

बागेमध्ये असतात गुलाबाच्या कळ्या ,
गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या

चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे,
घास भरविते, मरतुकड्या थोबाड कर इकडे

करत होते वेणी फणी, समोर होता आईना
गणपतरावांनी मारली मिठी, पण मी त्यात मावेना

गुलाबाच्या कळीला बकुळीचा वास,
गणपतराव बनले माझ्या आयुष्याचा त्रास.

तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
गणपतारावाशी केले लग्न, आयुष्याची लागली वाट.

संपात संप कामगारांचा संप
गणपतरावांच्या हातात ढेकणांचा पंप

विड्याच्या पानात पावशेर कात,
गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लाथ

गोव्यावरून आणले काजू
गणपतरावांच्या थोबाडीत मारायला मी कशाला लाजू

निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान,
गणपतरावांचा आवडता छंद म्हणजे सतत मदिरापान

शिडीवर शिडी बत्तीस शिडी
गणपत राव ओढतात विडी न मी लावते काडी

कालच पिक्चर पाहिला त्याचे नाव सायको,
मनोहरपंतांचे नाव घेते गणपतरावांची बायको

शिसवाचा पलंग, मखमलीची गादी अन मऊ मऊ उशी,
मी गेले ——– रावांपाशी तर राव म्हणतात आज एकादशी

यमुनेच्या तीरावर, कृष्ण वाजवितो मुरली…
__ आल्यापासून, सॅलरी कधी नाही पुरली

लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा
… तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?

कधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त…
_च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त

उखाणा घेते मी, खूपच Easy …
___राव असतात नेहमी, कामामध्ये Busy

ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस…
__तू मला, सुपरवूमन वाटतेस

माझ्या Life मध्ये, __भेटली Luckily…
कोणी काही बोलले तर, करते माझी वकिली

बिर्याणी हवी सारखी, नको वरण भात…
__च्या हॉटेल प्रेमाने, पोटाची लागलीये वाट

मुरेल तितका होतो Tasty, प्रेमाचा मुरांबा…
___ चिडते तेव्हा भासते, ditto जगदंबा

कॅन्टीन, हॉटेलला ठोकला मी राम राम…
__च्या हातचं जेवण, आवडते मला जाम

उन्हाळ्यात हवा, गार गार ऊसाचा रस…
__चाच विचार, माझ्या मनी रात्रंदिवस

पाहताच___ला, जीव झाला येडापीसा…
तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा

___सोहळ्याला सर्वजण झाले, आनंदाने जॉईन….
___माझा हीरो, नी मी त्याची हिरॉईन

गाडीत गाडी डेक्कन क्वीन…
___आहे, सेल्फी क्वीन

स्मार्ट Couple करते, कामांची वाटणी…
मी करते इडल्या आणि, __वाटतो चटणी

मिळून काम केल्यावर, कामं होतात लवकर…
मी चिरते भाजी, आणि __ लावतो कुकर

पोळीचे नकाशे बनवणं, ही __ची कला…
त्यानेही बनवल्या गोल तर, भाव कोण देणार मला?

__च्या बाईक वर __ दिसतो एकदम फिट…
बोलू दे लोकांना, आपण आपले जाऊ डबल सीट

सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी लंच…
___चं नाव घेताच, मनी उठतात रोमांच

एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल…
__सोबत असताना, कशाला हवा हमाल

शॉपिंगला जायला, तयार होते मी झट्कन …
__चे नाव घेते, तुमच्यासाठी पटकन

पाण्यात घागर बुडताना, आवाज येतो बुडबुड…
___आणि माझ्या Life मध्ये, नको कुणाची लुडबुड

क्रिकेटच्या मॅच मध्ये, धोनी ने मारली Six…
___ला केलं, मी सात जन्मांसाठी Fix

प्रेमाच्या प्रवासात, पास केल्या सर्व टेस्ट…
सर्व विषयांत ___ला, मार्क्स मिळाले बेस्ट

प्रपोझ केलं देऊन, गुलाबाची फुलं… ___शी लग्न झालंय पण, एवढ्यात नाही हा मुलं!

इस्त्री केल्यावर, कॉलर राहते एकदम ताठ…
माझ्या__चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ

__ची बाटली आणि काचेचे ग्लास …
__ सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास

काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज…
__नी वजन #काटा मोडलाय आज

डास चावला की, येते अंगाला खाज…😂
__चे नाव घेतो, तुमच्यासाठी आज

चांदीच्या करंड्यात, ठेवले हळदी कुंकू…
__रावांना पाहताच, कुत्री लागतात भुंकू

सन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून,
…..रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून्

नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
………तर आहेत माझ्या डाव्या खिशात

भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
…च्या #जीवावर करते मी मजा

गुलाबाचे फूल वाऱ्यावर लागते डुलू,
दिवसभर सुरु असते __ चे गुलूगुलू.

रम गरम भाजीबरोबर, नरम नरम पाव…
__राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव!

डाळित डाळ तुरिचि डाळ
हिच्या मांडिवर खेळविन एका वरशात बाळ

बायकोपेक्षा बाकी पोरी, वाटतात गोड गोड…
___ रावांना डोळे मारण्याची, फार जूनी खोड.😂

एक होति चिउ एक होता काउ
……. रावान्चे नाव घेते दोके नका खाउ

हिरव्या हिरव्या साडीला, भरजरी काठ…
__रावांच्या खोड्या सुरु, जरा वळली की पाठ

बाजारातून घेऊन येतो __ ताजी ताजी…
__शी गुलूगुलू करायला, मी नेहमीच राजी

हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू …
___ एवढी हॉट# असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू

खोक्यात खोका टिविचा खोका,
मी त्यांची मांजर् तो माझा बोका.

उखाणा घ्या म्हटलं की, उखाणा काही सुचत नाही
कोणाकोणाचं नाव घेऊ, माझंच मला कळत नाही

लिपस्टिक वाढवते ___ची ब्यूटी…😂
त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी

काचेच्या# ग्लासात कोकम सरबत
….रावांशिवाय मला नाही करमत

मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय…
__ भाव देत नाही, कित्ती केले ट्राय

शंकराच्या पिंडींवर् नागोबाचा वेढा,
हि माझी म्हैस आणि मी हिचा रेडा

तांदुळ निवडत बसले होते दारात
ते पादले दारात नि वास आला घारात😂

__व माझी Lovestory एकदम सच्ची…
गुलूगुलू करायला, गाठतो आम्ही गच्ची

चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी…
__माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी

नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट…
चल ___ पिक्चरला, सीट पकडू लास्ट.

बागेत बाग राणीचा बाग…
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!

केऴिच पान टर टर फाटत
…रावानच नाव घ्यायला मला कसतरिच् वाटत.

चान्दिच्या ताटात फणसाचे गरे ,
….राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे

भातुकलीचा खेल मांडला चुल आणि बोळक्यात
…च नाव घेतो# मुर्खांच्या किंवा मित्रांच्या घोळक्यात

रनवे वर प्लेन धावतात फास्ट,
–इज माय फस्ट आणि लास्ट

ठाण्याच्या मैदाणात ख़ेळत् होतो क्रिकेट,
बघितल तिला आणि पडली माझी विकेट.

अटक मट्क चांदणी चट्क,
…. ला म्हणा जळ्गांव मध्य़ै भटक

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
… माझी बायको आहे मोठी लुच्ची

जर तुम्ही सुद्धा लग्नाची तयारीकरताय तर त्यापूर्वी सर्वात महत्वाचे Marathi ukhane for female या लेखातील एक तरी उखाणा नक्की पाठ करा नाहीतर सासरची माणसे तुम्हाला सोडणार नाहीत.

तरी मला आशा आहे मित्र आणि मैत्रिणींनो या लेखामधील सुंदर सुंदर ukhane Marathi funny तुम्हाला आवडली असतील. तुम्ही हे उखाणे Facebook तसेच Whatsapp द्वारे तुमच्या मित्र-मैत्रिणींना पण शेअर करू शकता.

जर तुमच्या कडे सुद्धा काही अशाच Marathi ukhane for female funny तसेच marathi ukhane for male funny चा संग्रह असेल तर आमच्या अधिकृत ई-मेल आयडी [email protected] नक्की शेअर करा. आम्ही तुम्ही दिलेले New ukhane in Marathi comedy आमच्या वेबसाईट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू.

हे देखील वाचा

आधुनिक उखाणे

हळदीकुंकू व मंगळागौर साठीचे उखाणे

सासू सुनेचे खास उखाणे

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment