Ukhane for festivals In Marathi | सणांचे पारंपारिक उखाणे

कर्ता करविता ईश्वर, त्याच्यावर टाकते भार;
_____ रावांचे नाव घेते, नौका लाव पार

कस्तुरीचा जन्म सुगंधाकरिता ,
माझे सारे जीवन _______रावांकरीता

बहिणीसारख्या नणंदा , भावासारखे दीर,
______ रावांचे नाव घ्यायला मन माझं अधीर

सासूबाई माझ्या प्रेमळ , सासरे माझे दयाळू
_______ राव तर आहेत अतिशय मायाळू

द्वारकेत श्रीकृष्ण , अयोध्येमध्ये राम;
_______ च्या पायांशी माझे चारही धाम

शब्द तिथे नाद आणि कवी तिथे कविता;
______ रावांची जोड जणू सागर आणि सरिता

सौभाग्याची जीवनज्योत प्रीततेलाने तेवते ;
_______ रावांना मी दीर्घायुष्य मागते

माहेरची माया अन माहेरची साडी;
______ रावांची अन माझी जमली जोडी

नववर्षाच्या शुभारंभ करिता येतो पाडवा ;
_____ रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा

श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी आहे सजली;
_______ रावांच्या सुखासाठी मंगळागौर मी पुजली

श्रावण सरला, वाजत गाजत गणपती आले दारात
_______ रावांचे नाव घेऊन आणते गौरी घरात

तीलगुळाच्या देवघेवीनं दृढ प्रेमाचं जुळतं नातं;
_______ रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत

रूप गुण संपदेच्या जोडीला हवं चारित्र्य ;
______ रावांच्या नावात आहे पावित्र्य

स्वर्गीय नंदनवनात सोन्याच्या केळी ;
______ रावांचे नाव घेते गौरी पूजनाच्या वेळी

कुबेराच्या भंडारात हिरे- मानकांच्या राशी
_______ रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी

चंद्र मराठीत, चाँद हिंदीत , इंग्रजीत म्हणतात मून
——– रावांचे नाव घेते मी _______ सून

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
_______ रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी

महाविष्णूच्या मस्तकावर डोलत असतो शेष
_______ रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश

यमुनेच्या डोहात पडे ताजमहालाची सावली ;
______ रावांची आई जशी माझी दुसरी माउली

इंग्रजी भाषेत पाण्याला म्हणतात वॉटर
______ रावांचे नाव घेते, आहेत ते डॉक्टर

घातली मी वरमाळा, _______ रावांच्या गळी
थरथरला माझा हात; चढली लज्जेची लाली

बागेमध्ये फुलतात गुलाब रोज ताजे ;
_____ रावांचे नाव घेते, तेच सौभाग्य माझे

जीवनरूपी कादंबरी वाचली आम्ही दोघांनी,
______ रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

जीवनरूपी कादंबरी वाचली आम्ही दोघांनी,
______ रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

चित्र काढतो चित्रकार, शिल्प घडावी शिल्पकार;
भाग्यवंत मी, मला लाभले ______ राव जोडीदार

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.