मैत्री || मराठी सुविचार । Friendship quotes in Marathi | Friendship Day Quotes in Marathi | Maitriमला स्वर्गात जाण अजिबात मान्य नसेल
कारण माझा कोणताच मित्र तिथे नसेल.

मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

मित्राची मैत्री हि नेहमी गोड असावी ,
जीवनात तिला कशाची तोड नसावी ,
सुखात ती हसावी, दुखात ती रडावी,
पण आयुष्यभर मैत्री सोबत असावी

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे.
या नात्याला किंमत द्या व या नात्यावर मनापासून विश्वास ठेवा.

मैत्री असावी अशी...
मैत्रीसारखी हसत राहणारी..,
हसवत राहणारी... संकटकाळी हात देणारी...आनंदी समयी साद घालणारी...

मैत्री असावी मना-मनाची,
मैत्री असावी जन्मो-जन्माची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी....

मैत्री आपली अशी असावी जीवाला जीव लावणाऱ्या चिमणीसारखी असावी,
प्रसंगी आपल्या तोंडातील घास चीवूसारखा भरवणारी असावी
सुखांमध्ये तू पुढे राहा पण दुखांमध्ये मी तुझी ढाल असेन अशी आपली मैत्री असावी

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा,
मैत्री एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची!
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा

मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुध्दा क्षणों-क्षणी आठवेल अशी करा!!!!

मैत्री करत तर दिव्यातल्या ज्योतीसारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा!!

हि आनंदाची गोष्ट आहे एका अनोळखी माणसाचे रुपांतर एका मित्रामध्ये व्हावे,
पण हि सर्वात वाईट गोष्ट आहे एका मित्राचे रुपांतर अनोळखी माणसात व्हावे.

मैत्री हि कांद्यासारखी असते तिच्यात अनेक पदर असतात
आणि त्या मुळे जीवनात चांगली चव येत असते
पण ती मैत्री तोडण्याचा प्रयत्न केला तर हिच मैत्री डोळ्यात पाणी आणत असत.

सुखात सुखी होतो, आनंदात आनंदी होतो......
पण दु:खात हातात हात घालुन बरोबरीने उभा राहतो तो खरा मित्र !

विश्वास बनून माणसे जीवनात येतात,
स्वप्न होऊन मनात घर करून जातात .....
सुरुवातीला विश्वास करून देतात कि ती आपले आहेत,
मग का कोणास ठाऊक सोडून जातात…

कठीण काळ आला म्हणुन आपण निराश का व्हायचे
पाषाण फोडुन वर येणाऱ्या पानाकडून मग काय शिकायचे...... रडायचं नाही, तर लढायचं… !!!

खोटे मित्र असण्यापेक्षा खरे शत्रू असलेले मला चांगले वाटतात.

मित्र कमी असावेत पण त्यांना तोड नसावी.

आयुष्य बदलत असते वर्गातून कार्यालयापर्यंत,
पुस्तकातून फाइल पर्यंत, जीन्स पासून फोर्मल पर्यंत,
पोकीट मनी पासून पगारापर्यंत,
प्रेयसी पासून पत्नी पर्यंत पण मित्र ते तसेच राहतात.

काही माणसे ही गजबजलेल्या शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!

जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्ण सारखा
जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल
आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.

"मैत्री" म्हणजे 'संकटाशी' झुंजणारा 'वारा' असतो.
'विश्वासाने' वाहणारा आपुलकीचा 'झरा' असतो.
"मैत्री" असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो.
एक 'बाद' झाला तरी दुसर्याने 'डाव' 'सांभाळायचा' असतो...

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!

मैत्री नको चंद्रासारखी दिवसा साथ न देणारी.
नको सावल्यासारखी कायम पाठलाग करणारी.
मैत्री हवी अश्रू सारखी सुख दू:खात साथ देणारी

मैत्री म्हंटली की आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण.

मैत्री म्हणजे पान नसते सुकायला.
मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला.
मैत्री म्हणजे फळ नसते पिकायंला.
मैत्री म्हणजे फांदि नसते तुटायला.
मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना आधार द्यायला !

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात........

मैत्री हे मनाचे बंधन असते
हे नाते सर्व नात्याहून वेगळे असते
दूर असले तरी काही फरक पडत नाही
मित्रांची जागा तर कायमची मनात असते ....

मैत्रीचा हा धागा रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते मायेची ती सूप्त भूक

मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे!


Search For: maitri, maitri suvichar, maitri whatsapp status, maitri quotes in marathi, yari dosti, dosti quotes, happy friendship day in marathi, happy friendship day quotes in marathi, friendship day whatsapp status, friendship day whatsapp status video download, Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2 3

You May Also Like

Add a Comment