प्रेम || मराठी सुविचार । Love quotes in Marathi | Marathi Suvichar


देवाच्या चरणी मागितलेली एक दुवा माझी असेल,
तिथे मागितलेली प्रत्येक खुशी तुझी असेल,
जेव्हापण तुझ्या ह्रदयाला प्रेमाची हाक ऐकू येईल
ती प्रेमाची प्रत्येक हाक माझी असेल.

दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं.....
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं !

तो रस्ता मला पाहून आज हसला,
म्हणाला प्रेमात बिचारा फसला...
हो, ती हवा आजही तिथेचं होती,
नेहमी तुझे केस विसकटणारी..

तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.

तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

तू म्हणशील आता बस.....,तू आहे फक्त एक त्रास,
तू म्हणशील आता बस.....,तू आहे फक्त एक त्रास,
तरीसुद्धा तुझ्या एकदा परतण्याची वाट पाहीन,
जोपर्यंत घेयीन मी शेवटचा श्वास..

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला
सुंदर दान पदरात टाकयला त्याने किती उशीर केला.

तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,
थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.

तू निखळ हसायचीस तेव्हा, मनात रिमझिम बरसात व्हायची
तुझी निरागस बडबड कधी, चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात...

तू केसात माळलास गजरा मी गुंतविले माझे शब्द
तू केसात माळलास गजरा मी गुंतविले माझे शब्द
काय सांगू तुला ... त्या मोगऱ्याच्या सुगंधाने
झाले माझे हृदय बेधुंद.

तुला पाहिलं त्याक्षणापासून, रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो...
तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो...

तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.

तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम कराल, तितकं तुम्ही,
इतरांचं अनुकरण कमी कराल आणि अधिताधिक स्वत:सारखे बनत जाल.

तुम्हाला माहिती आहे देवाने असे का केले की
आपल्याला दोन हात, दोन पाय, दोन डोळे दिले पण
हृदय मात्र एकच दिले ??....

कारण ह्या पृथ्वीवर येऊन आपण आपल्या आवडीचे
दुसरे हृदय शोधावे म्हणून.

तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
बागेबाहेरच फिरतंय

तुझ्यासाठी आणलेले गुलाबच लाल फुल माझ्या हातातच राहिले
कारण दुसऱ्या कुणी दिलेलं गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं

तुझ्याविना प्रेमाची कल्पनाच असह्य झाली
प्रेमाला काय महत्व? हे तू मज शिकविले,
प्रेम म्हणजे तू ... तू म्हणजे आयुष्य.
आयुष्यात प्रेमाचा अर्थ समजावला तुन
तुझ्या प्रेमाची आता इतकी सवय झाली
कि तुझ्याशिवाय प्रेमाची कल्पनाच असह्य झाली.

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.

​ तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही,
... कारण,
तुझ्याशिवाय माझ मनं, दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही.

तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी जिच्यावर
मी जीवापाड प्रेम करेन....... ती आपली मुलगी असेल.

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही, एकटा शोधावा म्हटल
पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.

तुझ्या प्रेमाचा रंग तो... अजूनही बहरत आहे. :)
शेवटच्या क्षणापर्यंत.... मी फक्त तुझीच आहे !!!

तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकढे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरील राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे.

तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास

तुझ्या असण्यात तर माझा आनंद जुडला आहे ,
तुझ्या डोळ्यात तर माझा गाव वसला आहे .
तुझ्या ओठांवरचं हसु कधीच कमी होऊ देऊ नकोस. . . .
तुझ्या त्या हसण्यासाठीच तर माझा हा जन्म आहे.

तुझे गालात ते गोड हसणे आठवल्याशिवाय राहवत नाही...
तुझ्या चेहऱ्याशिवाय काहीच बघावस वाटत नाही...
तुझ्या नितळ प्रेमाला माझं हृदय विसरू शकत नाही...
आणि तू समोर नसलीस की जगावसच वाटत नाही.

तुझी एखादी कविता दे ना
माझ्या वहीत आठवण म्हणून ठेवायला
सुरुवात केली आहे मी आता माळ आठवणींची ओवायला.

तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

तुझं दूर जाणं ही एक शोकांतिकाच आहे माझ्या मनासाठी
अजूनही काही ओले बंध बाकी आहेत स्पंदनाच्या तीरासाठी.

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,
निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,
असे का बरे होते.. हेच का ते नाते, ज्याला आपण प्रेम म्हणतो...

तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे


Search For : Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2 3 4

You May Also Like

Add a Comment