आध्यात्मिक || मराठी सुविचार । Spiritual Quotes in Marathi | Marathi Suvichar


जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील
तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल.

श्रद्धेची मुळे हृदयात असतात,
जिभेच्या टोकावर नसतात.

मी देव मानतो पण माणसात राहणारा.

पाण्याला बंध घातला तर ते "संथ" होते,
आणि मनाला बंध घातला तर "संत" होतात.

प्रार्थना म्हणजे सर्वात चांगले वायरलेस कनेक्शन आहे.

देवावर विश्वास असेल तर, देव जे देईल त्याच्यात समाधान माना.
पण, स्वतःवर विश्वास असेल तर, देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भाग पडेल.

जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका
कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे,
जो कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देतो.

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात,
प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे

प्रार्थना म्हणजे ईश्वराजवळ जाण्याची शक्ती.

प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक शरीराला जेवढी आवश्यक आहे,
तेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे.

आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी
'रामाचा आचार', 'कृष्णाचा विचार' आणि 'हरिचा उच्चार' फार गरजेच आहे..

जर तुम्ही धर्म कराल, तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,
आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल..

माणसानं पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं पैसा कमावला तर
त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही.
ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं.
कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं
तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे
व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !

स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.

जे का रंजले गांजले।
त्यासी म्हणे जो आपुले।
तोची साधू ओळखावा।
देव तेथेची जाणावा॥

मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द

अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता
नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.

अन्न म्हणजे देव आहे,
म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करु नका.

अपराध करून जो सुख मिळवतो
त्याला देव कधीही क्षमा करत नाही.

​ असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.

आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे
आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होतो.

आत्म्याची सुधारणा हा सर्व सुधारणांचा आत्मा आहे.

स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.

सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर.

श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.

मनाचा लय झाल्यावर परमानंदाचा अनुभव येतो
व हे योगसाधना केल्यावरच शक्य होते.

भक्ती ही अशक्यला शक्य करवून दाखवते.
पण अशक्यला शक्य करण्यासाठी भक्ती करु नका.
परमेश्वर प्राप्तीसाठीच भक्ती करा.

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले ! – संत तुकाराम.

प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक, शरीराला जेवढे आवश्यक आहे,
तेवढीच शरीराला प्रार्थना आवश्यक आहे.

परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.

परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो
अत्यंत शुध्द अंत:करणाने त्याची मदत मागतो
त्याला ती निश्चित पणे मिळत असते.

परमात्म्याची शक्ती अमर्याद आहे
त्याच्या मनाने आपली श्रद्धा अत्यंत अल्प असते.


Search For : Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2

You May Also Like