Information about Jawaharlal Nehru In Marathi | जवाहरलाल नेहरू बद्दक महत्वाची माहिती

पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांना लहान मुले ‘चाचा नेहरू’ या नावाने सुद्धा ओळखतात. यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील अलाहाबाद ( प्रयागराज) येथे झाला होता. जवाहरलाल नेहरू काश्मिरी पंडित होते. आणि यांना स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री होण्याचा गौरव मिळाला होता.

१. जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसा निम्मित तर वर्षी १४ नोव्हेंबर या दिवशी ‘बाल दिवस’ साजरा केला जातो.

२. नेहरू लहानपणापासूनच इंग्लीश स्कूल मध्ये शिक्षण घेतले होते पण त्यांना गावा-गावा मध्ये फिरायला भरपूर आवडत असे आणि त्यामुळेच त्यांना हिंदी भाषा चांगली बोलता येत असे.

३. जवाहरलाल नेहरू हे लाल-किल्ल्यावर भारताचा झेंडा फडकवणारे पहिले भारतीय होते.

४. जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर भारतामध्ये एक university सुद्धा आहे. जी JNU या नावाने ओळखली जाते.

५. असे म्हटले जाते कि चंद्रशेखर आझाद यांनी रुसला जाण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांच्या कडून १२०० रुपये उधार घेतले होते.

६. जवाहरलाल नेहरू यांनी २० वर्षापर्यंत सुभाष चंद्र बोस यांच्या परीवाराच्या मागे जासुस मागे लावले होते.

७. जवाहरलाल नेहरू यांनी सरदार पटेल यांना न सांगता काश्मीर मध्ये धारा ३७० तयार करून घेतली होती.

८. फेब्रुवारी १९५० मध्ये राजस्थान च्या पिलानी मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या स्वागतासाठी हिरव्या भाज्यांपासून बनवलेले प्रवेश द्वार तयार केले होते. पण नेहरू या गोष्टी मुळे भरपूर नाराज झाले होते आणि त्यांनी त्या सर्व भाज्या गरीबांमध्ये वाटायला सांगितल्या होत्या.

९. जेव्हा संसदेमध्ये गो-हत्या बद्दल प्रस्ताव ठेवला होता तेव्हा जवाहरलाल नेहरू बोलले होते कि जर गो-हत्या चा प्रस्ताव मंजूर झाला तर मी माझ्या पदावरून राजीनामा देईन.

१०. JRD टाटा यांनी महिलांसाठी नव्हे तर जवाहरलाल नेहरूंच्या सांगण्यावर लैक्मे हे सौंदर्य प्रोडक्ट तयार केले होते.

११. जवाहरलाल नेहरू यांना जेवल्यानंतर ५५५ ब्रांड चा सिगरेट पिण्याची सवय होती. एकदा नेहरू एका कार्यक्रमासाठी भोपाळ येथे गेले होते. आणि त्यांच्या लक्षात आले कि त्यांची सिगरेट संपली आहे आणि तो ब्रांड पूर्ण भोपाळ मध्ये कुठे भेटला नाही म्हणून एका विशेष विमानाने इंदौर वरून नेहरूंसाठी सिगरेट आणण्यात आली होती.

१२. तुम्हाला माहिती आहे का नेहरूंचे कपडे लंडन ला धुवण्यासाठी जात असे.

१३. महत्मा गांधी यांच्या अपील मुळे पूर्ण देशाने विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकला होता आणि त्यामुळे नेहरू यांना सुद्धा त्यांचा बेस्ट कोट फेकून द्यायला लागला होता. आणि त्यानंतर च त्यांनी खादी जैकेट खालायला सुरवात केली होती.

१४. जवाहरलाल नेहरू यांना ११ वेळा नोबेल पारितोषिकासाठी नॉमिनेट केले गेले होते पण त्यांना एकही वेळा या पुरस्कार भेटला न्हवता.

१५. जवाहरलाल नेहरू यांच्यावर चार वेळा प्राणघातक हमाला झाला होता, पहिल्यांदा १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्या विभाजनाच्या वेळी जेव्हा ते भारत-पाकिस्तान सीमेवर होते. दुसर्यांदा १९५५ मध्ये महाराष्ट्रामध्ये चाकू ने त्यांच्या वर हमाला करण्यात आला होता आणि १९५६ मध्ये बॉम्ब द्वारे रेल्वेचा ट्रॅक उध्वस्त करून त्यांना मारण्याचा प्रयन्त केला होता.

१६. जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू २७ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला होता आणि त्यांच्या अंतिम यात्रेसाठी १५ लाख लोक जमा झाले होते.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.