संत नामदेव महाराज जीवन चरित्र । Sant Namdev Information in Marathi
Sant Namdev / संत नामदेव महाराज हे भारतातील एक प्रसिद्ध संत आहेत. संत नामदेव महाराजांचे महाराष्ट्रात तेच स्थान आहे जे संत कबीर किंवा संत सूरदास यांना उत्तर भारतात आहे. कदाचित त्याहूनही जास्त महत्व हे संत नामदेव महाराजांच्या कार्याला आहे. त्यांचे संपूर्ण जीवन हे मधुर भक्ती भावात दंगलेले आणि रमलेले आहे. ते आपल्या संप्रदायाला कोण व्यक्ती भक्ती करू शकतो किंवा जातीची जी जोखडे आहेत त्यातून मुक्ती देऊ इच्छित होते. नामदेव महाराजांनी अनेक अभंग लिहिले त्यातुन त्यांची देवप्रति श्रद्धा दिसून येते.
संत नामदेव महाराजांच्या विषयी थोडक्यात परिचय – Sant Namdev Information in Marathi
नाव (Name) : संत नामदेव महाराज (Sant Namdev Maharaj)
वडिलांचे नाव (Father Name) : दामाशेठ
आईचे नाव (Mothers Name) : गोनाई
जन्म (Birthdate) : 26 ऑक्टोबर 1270
जन्म स्थळ (Birth Place) : महाराष्ट्र
मृत्यू (Death) : इसवी सन 1350
संप्रदाय : वारकरी संप्रदाय
पत्नी (Wife’s Name) : रजाई
असे सांगितले जाते की जेव्हा संत नामदेव हे खूप छोटे होते तेव्हा देखील ते ईश्वराच्या भक्तीत रमलेले असायचे. ते लहान असताना त्यांच्या आईने त्यांना पांडुरंगाला प्रसाद ठेवण्यासाठी म्हणजे नैवद्य देण्यासाठी पाठवले. नामदेव महाराज गेले मंदिरात… त्यांनी तिथे विठुरायाच्या चरणावर प्रसाद ठेवला आणि हट्ट केला की तुम्ही प्रसाद म्हणजेच नैवद्य ग्रहण करावा. त्यांच्या हट्टासमोर अखेरीस पांडुरंगाला स्वतः साक्षात दर्शन देऊन तो नैवद्य ग्रहण करावा लागला.
संत नामदेव महाराजांचे संपूर्ण जीवन हे मानव कल्याणासाठी समर्पित होते. मूर्ती पूजा, कर्मकांड, जातपात यांच्या विषयी त्यांच्या स्पष्ट विचारांमुळे हिंदीतील अनेक विचारवंतांनी त्यांना संत कबीर यांचे मार्गदर्शक मानले आहे. संत नामदेव महाराजांनी पंजाबी भाषेत देखील पद्य रचले आहेत. नामदेव महाराजांच्या वाणीमध्ये साधेपणा आहे. ते प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करतात. त्यांच्या देवाप्रति असलेल्या भक्तीभावाला आजही पंजाब मधील लोक देखील अनुसरतात.
संत नामदेव महाराज जीवन चरित्र – Sant Namdev Maharaj Life History and Biography in Marathi
श्री संत नामदेव महाराजांचा जन्म हा 26 ऑक्टोबर 1270 रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेठ आणि आईचे नाव हे गोनाई असे होते. इतिहासकारांची यांच्या जन्माविषयी दोन मते आहेत, काही लोक म्हणतात की नामदेव महाराजांचा जन्म हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड जवळ असणाऱ्या नरसी वामनी या गावात झाला होता तर बाकी लोक म्हणतात की त्यांचा जन्म हा मराठवाड्यातील परभणी मध्ये झाला होता. काही लोक असेही म्हणतात की त्यांचा जन्म हा महाराष्ट्रातील पंढरपूर येथे झाला होता , कारण त्यांचे आई वडील हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. पंढरपूर मध्ये भगवान श्रीकृष्ण ला विठ्ठलाच्या रुपात पुजले जाते.
नामदेव महाराजांचा विवाह हा कल्याण येथे राहणाऱ्या राजाई (राजा बाई) यांच्याशी झाला होता. त्यांना एकूण 4 पुत्र होते. नामदेव महाराजांच्या मोठ्या बहिणीचे नाव हे आऊबाई होते. संत नामदेव महाराजांनी विसोबा खेचर यांना गुरू म्हणून संबोधले होते. विसोबा खेचर यांचे जन्मस्थान हे पैठण होते. पंढरपूर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर औंढा नागनाथ हे प्राचीन शिवक्षेत्र आहे. याच मंदिरात विसोबानी संत शिरोमणी नामदेव महाराज यांना शिकवले होते व आपले शिष्य बनवले होते. संत नामदेव हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन होते. ते त्यांच्या पेक्षा वयाने 5 वर्ष मोठे होते.
त्यांनी ब्राम्हविद्येला लोकांच्या साठी सुलभ बनवून महाराष्ट्रात प्रचार प्रसार केला. संत नामदेव महाराजांनी महाराष्ट्रापासून ते पंजाब पर्यन्त उत्तर भारतात हरिनामाची शिकवण दिली. असे सांगितले जाते की पंजाब मधील गुरुदासपुर जिल्हयातील घुमन या गावी 20 वर्षांहून अधिक वेळ घालवला. पंजाब मधील शीख समुदायाचे लोक हे त्यांना नामदेव बाबा या नावाने ओळखत असे.
भक्त नामदेवांच्या महापरिनिर्वाण नंतर तीनशे वर्षानंतर श्री गुरूअरजण देवजी यांनी त्यांच्या वाणीचे संकलन करून श्री गुरूग्रंथसाहिब लिहिले. श्री गुरू ग्रंथ साहिब मध्ये त्यांचे एकूण 61 पद, 3 श्लोक आणि 18 राग एकत्र केलेले आहेत. वास्तवात श्री गुरू ग्रंथ साहिब मध्ये नामदेव महाराजांची वाणी ही अमृताचा एक अखंडपणे निरंतर वाहणारा झरा आहे. या वाणीत संपूर्ण मानव जातीला पवित्रता प्रदान करण्याची क्षमता आहे.
संत नामदेव महाराजांनी कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेला एकत्र बांधण्याचे काम केले आहे. पंजाब मधील शब्द कीर्तन आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कीर्तन यात बरेचसे साम्य आपल्याला बघायला मिळते. पंजाब मधील घुमन येथे त्यांचे स्मारक देखील बांधण्यात आलेलं आहे. त्यांच्या आठवणीत शीख समुदयाद्वारे त्यांचे मंदिर देखील पंजाब मध्ये बांधण्यात आले आहे.
संत नामदेव महाराजांनी हिंदी भाषेत जवळपास 125 अभंगांची रचना केली होती. नामदेव महाराजांनी भक्ती गीतां च्या परंपरेला चालना दिली. पुढील 4 शतकांपर्यंत चालू राहिली आणि संत तुकाराम महाराजांच्या काळात ती शिगेला पोहोचली.
त्यांनी दोन वेळा तीर्थ यात्रा केली. जशी जशी त्यांचे वय वाढत गेले तसतशी त्यांची ख्याती जगभरात पसरत गेली. 50 वर्ष वयाचे असताना संत नामदेव महाराज हे पंढरपुरात वास्तव्याला आले. तिथे त्यांच्या आसपास सतत त्यांचे भक्त असत. त्यांचे अभंग खूप जास्त प्रसिद्ध झाले होते. लोक लांबून लांबून त्यांचे किर्तन ऐकण्यासाठी गर्दी करत होते.नामदेवांचे एकूण 2500 पेक्षा जास्त अभंग हे त्यांच्या नामदेव गाथेत आहेत.
त्यांचे गुरू ज्ञानेश्वर महाराजांचे इहलोकी गमन झाल्यानंतर ते थोडे बैचेन राहायला लागले. शेवटचे काही दिवस ते पंजाब मध्ये आले. शेवटी त्यांचे 80 वय असताना 1350 साली त्यांचे देखील देहावसन झाले.
असे म्हणले जाते की संत नामदेव महाराजांचा सर्वात जास्त प्रभाव हा संत तुकाराम महाराजांवर पडला होता. प्रत्येक वर्षी लाखो वारकरी या पांडुरंगाच्या सोबत संत नामदेव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात. संत नामदेव महाराजांनी लहानपणी निरागस पणे शुद्ध अंतःकरनाणे केलेल्या प्रार्थनेने देवाचे दर्शन घेतात. यातून मन शुद्ध असेल तर देव देखील दिसतो हे स्पष्ट होते.
Please Note: मित्रांनो तुम्हाला Sant Namdev Information in Marathi या लेखामध्ये आज आम्ही Sant Namdev History in Marathi व Sant Namdev Biography in Marathi या बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही शंका असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.
लक्ष द्या: Information About Sant Namdev in Marathi हा आमचा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. तुम्हाला या लेखामध्ये काही चुकीचे वाटत असेल तर कंमेंट मध्ये नोंद करा कारण आम्ही वेळोवेळी हा लेख update करतो.
हे देखील वाचा:
छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन चरित्र