Sleep information in Marathi | झोपेबद्दल २२ महत्वाचे तथ्य | जाणून घ्या कोणत्या वयात कीती झोपेची गरज असते

Sleep information in Marathi | झोपेबद्दल २२ महत्वाचे तथ्य | जाणून घ्या कोणत्या वयात कीती झोपेची गरज असते

प्रत्येकाला झोपायला आवडते आणि ही एक नैसर्गिक बाब असून आपण जन्माला आल्या पासून आपण आपल्याला झोप आल्यावर आपण झोपतो. झोप ही गोष्ट आपण रोज ६-८ तास करून सुद्धा आपल्याला झोपेबद्दल च्या भरपूर गोष्टी माहिती नाही आहे, आजच्या ला लेखामध्ये आम्ही तुम्हाला झोपेबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी सांगणार आहोत.

१. आपण न जेवता २ महिने जगू शकतो परंतु, न झोपता ११ दिवसच टिकू शकतो.

२. तुम्हाला माहिती आहे का या जगातील १५% लोक झोपेत चालतात आणि ५% लोकांना झोपेमध्ये चालायची सवय असते.

३. जेव्हा आपण जास्त आनंदी असतो तेव्हा कमी झोपले तरी सुद्धा तुमचा दिवस कंटाळवाणा जात नाही.

४. सगळ्यात जास्त वेळ झोपण्याचा विक्रम १९६४ मध्ये १७ वर्षाच्या Randy Gardner याने केले होते. त्याने २६४ तास १२ मिनिटे जागा राहण्याचा विक्रम केला आहे.

५. सकाळी ३ ते ४ वाजेपर्यंत आपले शरीर खूपच कमजोर झालेले असते, आणि हेच कारण आहे कि भरपूर लोकांचे या वेळे दरम्यात मृत्यू होतो.

६. झोपलेले असताना शिंका देणे अशक्य आहे.

७. एक मनुष्य आपल्या आयुष्याचा एक तृतीयांश भाग म्हणजेच २५ वर्ष झोपण्यात घालवतो.

८. मुलगा २ वर्षाचा होई पर्यंत त्या मुलाचे आई-वडील सरासरी १०५५ तास कमी झोपतात.

९. जी माणसे कमी झोपतात त्यांच्या harmons चे स्तर लवकर खाली जाते.

१०. महात्मा गांधी त्यांच्या इच्छेनुसार झोपायचे व उठायचे, त्यांना शांत झोपेसाठी ५ मिनिटांचा वेळ पण भरपूर होत असे.

११. “Dysania” ही ती स्तिथी आहे, ज्यामध्ये सकाळी सकाळी उठणे खूप कठीण काम वाटते.

१२. मांजर आपल्या आयुष्यातील ७०% भाग हा झोपण्यामध्ये घालवतात.

१३. घोडा नेहमी उभा राहून आणि ससा त्याचे डोळे उघडे ठेऊन झोपतो.

१४. अमेरिकेतील ८% माणसे नग्न होऊन झोपतात.

१५. पूर्ण दुनियेमध्ये माणूसच असा जीव आहे जो आपल्या इच्छेनुसार झोपू शकतो.

१६. जेव्हा पर्यंत कलर TV आला न्हवता तेव्हा पर्यंत माणसांना स्वप्ने सुद्धा black&white येत असे.

१७. ज्या लोकांना झोपल्यावर स्वप्न पडत नाही त्यांना Personality Disorders नावाचा आजार झालेला असतो.

१८. जर तुम्ही रात्री ७ तासापेक्षा कमी झोपत असाल तर तुम्हाला सर्दी होण्याचे शक्यता जास्त असते.

१९. तुम्हाला माहिती आहे का जेव्हा आपण झोपलेले असतो तेव्हा आपली वास घेण्याची शक्ती काम करत नाही आणि म्हणूनच आपल्याला ‘गॅस लिकेज’ तसेच कोणत्याही धुराचा वास आपल्याला येत नाही.

२०. जेव्हा डॉल्फिन आणि व्हेल मासा झोपलेला असतो, तेव्हा त्यांचा अर्धा मेंदू जागा राहतो, हे आठवणीत ठेवायला कि श्वास घेण्यासाठी आपल्याला बाहेर जमिनीवर जायचे आहे.

२१. “Sleep Apnea” हा एक असा आजार आहे ज्यामद्धे झोपलेले असताना श्वास अचानक थांबतो, यामुळे हा आजार असलेली माणस झोपायला घाबरतात आणि त्यामुळे जास्त तणावात राहतात.

२२. “Parasommnia” हे एक असे आजार आहे ज्यामद्धे माणूस झोपेमध्ये एखाद्याची हत्या करू शकतो.

* जाणून घेऊया कोणत्या वयात कीती झोपेची गरज असते.

  • नवजात बाळ(३-११ महिने) – १४-१५ तास
  • १२-३५ महिन्याचे बाळ – १२-१४ तास
  • ३-६ वर्षाचे मुल – ११-१३ तास
  • ६-१० वर्षाचे मुल – १०-११ तास
  • ११-१८ वर्षात – ९.३० तास
  • मध्यम वयात – ८ तास
 • वृद्ध – ८ तास

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment