How to speak English in Marathi | इंग्रजी कसे शिकायचे

How to speak English in Marathi | इंग्रजी कसे शिकायचे

How to speak English in Marathi: काही लोकांना इंग्रजी ही खूप कठीण भाषा वाटते. बऱ्याच विद्यार्थ्यांना तर नुसत्या इंग्रजी नावाचीच भीती वाटते. या लेखात, आम्ही आपल्याला इंग्रजी बोलायला लिहायला आणि वाचण्यास कसे शिकायचे ते सांगणार आहोत. मराठी माध्यमाचे विद्यार्थी मराठी मध्ये सर्व विषयांचा अभ्यास करतात परंतु जेव्हा त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठविले जाते तेव्हा त्यांना काहीच समजत नाही. त्यांना इंग्रजीची फार भीती वाटायला लागते. मित्रांनो, मला सांगायचे आहे की मी मराठी माध्यमिक शाळेतच शिकलो आहे पण आज माझे इंग्रजी खूप चांगले आहे.

तर चला मग जाणून घेऊया इंग्रजी शिकण्याच्या काही सोप्या टिप्स.

१. व्याकरणाचे सर्व नियम समजून घ्या

जे विद्यार्थी इंग्रजीत कमकुवत आहेत त्यांनी मूलभूत व्याकरणापासून सुरुवात केली पाहिजे. वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ यांचे सर्व प्रकार वाचा आणि दररोज त्याचा सराव करा. काही दिवसात आपल्याला सर्व नियम पाठ होतील. तसेच Noun, Pronoun, Preposition, Conjunction, Parts of Speech, Figure of speech, Active Passive Voice, Direct Indirect speech इत्यादींचा अभ्यास करा.

२. शब्दकोशाचा (Dictionary) वापर करा

use of Dictionary in Marathi
use of Dictionary in Marathi

जो इंग्रजी शब्द तुम्हाला समजत नाहीये त्याचा अर्थ तुम्ही शब्दकोशामध्ये पाहू शकता. आजकाल प्रत्येकाकडे मोबाइल आहे त्यामुळे आपण फोनवर देखील ऑनलाईन शब्दाचा अर्थ मराठी मध्ये पाहू शकता. अशा प्रकारे आपल्याला इंग्रजी भाषा शिकण्यास मदत मिळेल.

३. इंग्रजी वृत्तपत्र (English Newspaper) नियमित वाचा

आपलं इंग्रजी चांगलं व्हायचं असेल तर इंग्रजी वृत्तपत्र वाचलं पाहिजे. तुम्हाला कदाचित ते सुरुवातीला पूर्णपणे समजणार नाही, परंतु हळूहळू तुम्हाला शब्दांचे अर्थ कळण्यास सुरवात होईल. जे लोक दररोज इंग्रजी वृत्तपत्र वाचतात, त्यांचे इंग्रजी स्वतःहून चांगले होते.

४. घरी बोलताना इंग्रजीचा वापर करा

जर आपणास जलद गतीने इंग्रजी शिकायची असेल तर आपण घरातील सदस्यांशी इंग्रजी भाषेत बोलू शकता. असे होऊ शकते कि आपल्या आई-वडिलांना इंग्रजी येत नसेल पण आपण आपल्या लहान भावांबरोबर इंग्रजीत बोलू शकता अश्याने त्यांचे इंग्रजी देखील चांगले होईल.

५. इंग्रजी बोलणारे मित्र बनवा

English speaking course in Marathi
English speaking course in Marathi

तुम्ही मैत्रीचा अनुभव खूप वाचला असेल जेव्हा आपले मित्र चांगले असतात तेव्हा आपण हि चांगल्या गोष्टी करतो. त्यामुळे इंग्रजी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मैत्री केली तर त्यांच्यासोबत राहून तुम्हीपण इंग्रजी बोलायला लागाल.

Learn to Speak English In Marathi

६. इंग्रजी कथा पुस्तके वाचा

खूप लोकांना कथा, कविता वाचण्याची आवड असते. जर तुम्हालाही असा छंद असेल तर तुम्ही इंग्रजी कथा वाचल्या पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला मज्जा देखील येईल आणि तुमचे भाषेवर प्रभुत्व देखील वाढेल. ज्यांचा इंग्रजी हा विषय कच्चा आहे त्यांना शिक्षक इंग्रजी पुस्तके वाचण्याचा सल्ला देतात.

७. Word use in a sentence शिका

इंग्रजी शिकण्यात सर्वात महत्त्वाचे आहे की एखाद्या शब्दाचा वाक्यात उपयोग करणे आपण हे पुढचा उतारा (Paragraph) वाचून समजू शकता.

इंग्रजीमध्ये प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ आहे.
“I and my brother visited a fair yesterday (मी व माझा भाऊ काल एका जत्रेत गेलो)
It is not fair to bully small children in school (शाळेत लहान मुलांना मारहाण करणे योग्य नाही)
The landlord of our house demands fares on the first day of each month (आमच्या घराचा मालक प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी घरभाडे मागतो).

टीपः वरील तीन वाक्यात Fair आणि fare वेगळ्या अर्थानी वापरले जातात. प्रथम वाक्यामध्ये fair चा अर्थ जत्रा आहे, दुसर्या वाक्यात fair चा अर्थ “योग्य” आहे. तिसऱ्या वाक्यात fare चा अर्थ भाडे असा आहे .

८. इंग्रजी कसे लिहायचे

Writing english tips in Marathi
Writing english tips in Marathi

खूप लोकांना इंग्रजी लिहण्यास कठीण जाते त्याकरिता दररोज 4 ते 5 पाने इंग्रजी पुस्तकातून पाहून लिहावीत पुन्हा आपल्या कोणत्याही मैत्रिणी / शिक्षकाकडून त्यावर शेरा घेत जा. त्यामुळे हळू हळू आपली इंग्रजी चांगली होईल. शेरा मिळाल्यानंतर पुस्तकात पाहून कुठे काय चुकले ते पाहून घ्या. हळू हळू आपल्या चुका सुधरत जातील.

९. इंग्रजी कसे बोलावे

शाळेतील शिक्षक आपणास इंग्रजी शब्दांचा आणि वाक्यांचा बरोबर उच्चार शिकवतात यासह आजकाल काही ऑडिओ पुस्तके देखील उपलब्ध आहेत ते वापरून सुद्धा तुम्ही इंग्रजी बोलणे शिकू शकता.

१०. इंग्रजी न्यूज चॅनेल पहा

सर्व लोक आपल्या घरी मराठी न्यूज चॅनेल पाहतात. जर आपणास इंग्रजी शिकायचे असेल तर इंग्रजी न्यूझ चैनल पहा त्यामुळे आपणास मदत होईल. व्हिडिओ आणि इमेजेस पाहून न्यूज कशाविषयी आहे ते आपणास आधीच समजेल.

११. मुलांना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घाला

आपल्या मुलांना जर अस्खलितपणे इंग्रजी बोलायला शिकायचे असेल तर आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यम शाळेत पाठवावे. लहानपणापासूनच इंग्रजीमध्ये बोलायला, लिहायला, वाचायला शिकल्यास त्यांचे इंग्रजी चांगले होईल.

१२. इंग्रजीत विचार करा

आपल्या देशात बहुतेक लोक हिंदी बोलतात. प्रत्येक जण आपल्या मातृभाषेमध्ये विचार करतो आणि नंतर त्याचे इंग्रजीमध्ये अनुवाद करतो. परंतु बऱ्याच वेळा, मातृभाषेतील वाक्ये इंग्रजीमध्ये योग्य अनुवादित होत नाही. जर तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल तर तुम्हाला इंग्रजीमध्येच विचार करावा लागेल.

१३. चुकांना घाबरू नका

ज्या लोकांना इंग्रजी अजिबात माहिती नाही त्यांना इंग्रजी शब्द बोलण्यास भीती वाटते. त्यांना वाटते की शब्दाचे उच्चारण चुकीचे होऊ शकते. आपण घाबरू नये. सुरुवातीस चूक होऊ शकते परंतु हळूहळू आपण योग्य उच्चारण करणे शिकू शकाल. उच्चारण pronounce.com , howtopronounce.com ही एक वेबसाइट आहे ज्यावर आपण कोणत्याही इंग्रजी शब्दाचे अचूक उच्चारण शिकू शकता. आपल्याला येथे अचूक उच्चारण मिळेल.

१४. इंग्रजी चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रम पहा

Watch english movies with subtitles in Marathi
Watch english movies with subtitles in Marathi

टीव्हीवर आपण जे पहातो त्याचा आपल्यावर परिणाम होतो. जर आपल्याला लवकर इंग्रजी शिकायचे असेल तर आपण इंग्रजी चित्रपट आणि इंग्रजी टीव्ही शो पहावे. हे देखील आपल्याला मदत करेल.

१५. काही उपयुक्त इंग्रजी पुस्तकेः

Rapidex English Speaking Course
Best English Speaking Course
Dynamic Memory: Speaking Course
A Practical Guide to English Grammar

तर मित्रांनो, या टिप्सचा() अवलंब करून तुम्ही तुमच्या इंग्रजीत बऱ्यापैकी सुधारणा करू शकता आणि तुमच्या आयुष्यातील तुमची कौशल्ये बळकट करू शकता. त्यामुळे आपण आपल्या जीवनात पुढे जाऊ शकता आणि आपले जीवन सुलभ करू शकता.

लक्ष द्या: How to speak English in Marathi हा आमचा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. तुम्हाला या लेखामध्ये काही चुकीचे वाटत असेल तर कंमेंट मध्ये नोंद करा कारण आम्ही वेळोवेळी हा लेख update करतो.

All The Best For your Efforts!

 👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Digital Marketing Information in Marathi

School Life Quotes

 

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

3 thoughts on “How to speak English in Marathi | इंग्रजी कसे शिकायचे”

Leave a Comment