Information about Brain In Marathi | मेंदूबद्दल काही आश्चर्यकारक माहिती

Information about Brain In Marathi | मेंदूबद्दल काही आश्चर्यकारक माहिती

मस्तिष्क म्हणजे काय? कधीकधी आपल्याला असे वाटत असेल की आपले मेंदू हे एक अद्भुत गोष्ट आहे कारण ते आपल्या हुकुमासाठी नेहमीच तयार असते. बऱ्याचदा आपण थकलेलो असलो की आपण म्हणतो की माझा डोक आज काम करत नाही पण तसं पाहिलं गेलं तर आपला मेंदू कधीच थकत नसतो. चला मग जाणुन घेऊया या मेंदूबद्दल काही आश्चर्यकारक माहिती.

१) जर आपल्या मेंदूपर्यंत पाच ते दहा मिनिटं ऑक्सिजन पोहोचले नाही तर आपले मेंदू कायमचे खराब होऊ शकतो.

२) मेंदू हा आपल्या संपूर्ण शरीराचा फक्त दोन टक्के भाग आहे परंतु संपूर्ण शरीराचे २०% रक्त आणि ऑक्सिजन मेंदू साठी वापरले जाते.

३) आपला मेंदू चाळीसाव्या वर्षापर्यंत वाढत राहतो.

४) आपल्या मेंदूतील ६० टक्के जागा चरबीयुक्त असते. म्हणून मेंदू शरीराचा सर्वात जास्त चरबी असलेला अवयव आहे.

५) आपले अर्धे मेंदू शस्त्रक्रिया द्वारे काढला जाऊ शकतो आणि यामुळे आपल्या मेमरी वर देखील परिणाम होणार नाही.

६) जी मुलं ५ वर्ष पूर्ण होण्याअगोदरच दोन भाषा शिकून घेतात त्यांच्या मेंदूची रचना किंचित बदलते.

७) मेंदूच्या सर्व भागांच्या मदतीने आपल्या शरीरातील विविध कार्य केले जाते.

८) मेंदूबद्दल सर्वात प्रथम उल्लेख सुमारे ६००० वर्षांपूर्वी झालेला.

१०) आपल्याला आपल्या बालपणातील काही वर्ष आठवत नसतील कारण तोपर्यंत आपल्या मेंदूतील हिपोकॅम्पस विकसित झालेला नसतो कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी हिपोकॅम्पस आवश्यक आहे.

११) लहान मुले अधिक झोपतात कारण त्यांचे मेंदू त्यांच्या शरीरात बनविलेल्या ५०% ग्लुकोजचा वापर करतो.

१२) दोन वर्षाच्या लहान मुलांच्या मेंदूत सर्वाधिक पेशी असतात.

१३) जर तुम्ही अगोदरच्या रात्री मद्यपान केले असेल आणि तुम्हाला काहीच आठवत नसेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे विसरले आहात पण जास्त मध्यपान केल्यानंतर व्यक्तीला काहीच नवीन आठवत नाही.

१४) एका दिवसात आपल्या मेंदूमध्ये जवळजवळ ७० हजार विचार येतात आणि यातील ७०% विचार हे नकारात्मक असतात.

१५) आपले अर्धे जीन्स मेंदूच्या बनावटी बद्दल सांगतात आणि उरलेले अर्धे जीन्स संपूर्ण शरीराबद्दल सांगतात‌.

१६) जर आपण आपल्या स्मार्टफोनवर बरेच तास काम केले तर आपल्याला ब्रेन ट्यूमर होण्याचा धोका वाढतो.

१७) शरीराचा आकार लक्षात घेतला तर मनुष्यांचा मेंदू सर्व प्राण्यांपेक्षा मोठा आहे. हत्तीच्या मेंदूचा आकार त्याच्या शरीराच्या तुलनेत फक्त ०.१५ टक्के आहे परंतु मनुष्याचा मेंदू त्याच्या शरीराच्या तुलनेत दोन टक्के आहे.

१८) जीवित मेंदू खूपच मऊ असते आणि चाकूने सहजपणे कापता येते.

१९) जेव्हा कोणी व्यक्ती आपल्याला टाळते किंवा आपल्याला नकार देते तेव्हा आपल्या मेंदूला तसेच वाटते जेव्हा एखादी दुखापत होते.

२०) उजवा मेंदू आणि डावा मेंदू असे काहीही नसून हा केवळ एक गैरसमज आहे. आपला सर्व मेंदू एकत्रितपणेच काम करते.

२१) चॉकलेट च्या सुगंधामुळे आपल्या मेंदूत अशा लाटा निर्माण होतात ज्यामुळे व्यक्तीला शांत वाटते.

२२) ज्यांच्या घरामध्ये अधिक तणाव असते अशा घरातील मुलांच्या मेंदूवर तसाच परिणाम होतो जसा युद्धातील सैनिकांच्या मनावर होतो.

२३) टेलेव्हिजन पाहण्याच्या प्रक्रियेत मेंदूचा खूपच कमी उपयोग होतो आणि यामुळेच आपल्या मुलांच्या मेंदूचा लवकर विकास होत नाही. मुलांचे मेंदू पुस्तक वाचल्याने किंवा कथा ऐकल्यावर अधिक जास्त विकसित होतो कारण पुस्तके वाचल्यामुळे मुलं अधिक कल्पनाशील बनतात.

२४) प्रत्येक वेळी जेव्हा आपण नवीन काहीतरी विचार करतो किंवा शिकतो तेव्हा मेंदूमध्ये एक नवीन सुरकुती विकसित किंवा निर्माण होते आणि याच सुरकुतत्यांवरून आपल्या मेंदूचे IQ मोजले जाते.

२५) जर आपण आपल्या मेंदूला समजावून सांगितले की आपल्याला चांगली झोप लागली आहे तर आपले मस्तिष्क पण हीच गोष्ट मानायला लागते.

२६) Helmet परिधान केल्यानंतरही मेंदूच्या दुखापतीचे प्रमाण ८० टक्के आहे.

२७) मनुष्याच्या मेंदूत वेदनेची नस नसते त्यामुळे मेंदूला कोणतीही वेदना जाणवत नाही.

२८) एकाच गोष्टीचा बराच वेळ ताण घेतल्याने आपल्या मेंदू ची विचार करण्याची, समजून घेण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता काही वेळासाठी नष्ट होते.

२९) आपले मेंदू तेज बनवण्यासाठी डोक्यावर मेहेंदी लावावी किंवा दही खावा कारण दह्या मध्ये अमिनो ऍसिड असते ज्यामुळे टेन्शन दूर होते आणि मेंदूची क्षमता वाढते.

३०) आपल्या मेंदूतील ” Amygdala” नावाचा भाग काढून टाकला तर मनुष्याला कधीही कुठल्याही गोष्टीचे भय वाटणार नाही.

३१) मेंदू आणि मन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शास्त्रज्ञ आजपर्यंत शोधू शकले नाही की आपले मन हे शरीराच्या कुठल्या भागात स्थित आहे.

३२) आपल्या मेंदूमध्ये “मिड ब्रेन डोपामाइन सिस्टम” असते ज्यामुळे बुद्धीला घडणार्याय घटनांबद्दल कळते. ज्या व्यक्तींचे हे सिस्टम अधिक विकसित असते त्या व्यक्ती भविष्यवाणी चांगली करू शकतात.

३३) आपल्या मेंदूची मेमोरी पूर्ण होऊ शकते का? आपल्या मेंदूची स्मरणशक्ती(memory) अमर्यादित आहे. ती कधीही संगणका सारखी म्हणता येऊ शकत नाही ज्याची मेमेरी संपते. ही वेगळी बाब आहे की वृद्ध लोक काही गोष्टी विसरून जातात पण या गोष्टी त्यांना आठवण करून दिल्यास लगेच लक्षात येतात.

३४) मेंदूला गती देण्यासाठी सर्वात सोप्पा मार्ग कुठला? आपले मेंदू तेज करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे.एक ग्लास पाणी पिल्यास मेंदू १४% वेगाने काम करतो. जोपर्यंत व्यक्तीची तहान भागत नाही तोपर्यंत त्याचे लक्ष केंद्रित करणे कठीण होते.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment