Information about ATM in Marathi | ATM बद्दल काही मनोरंजक माहिती

भारतात जवळ जवळ सगळ्यांनीच ATM वापरला असेल किंव्हा बघितला असेल कारण ऐतिहासिक नोटबंदी नंतर सगळ्यात जास्त गर्दी ATM जवळ दिसत असे. आज च्या या लेखा मध्ये मी तुम्हाला ATM बद्दल काही मनोरंजक माहिती सांगणार आहे.

१) ATM चा पूर्ण अर्थ “Automated Teller Machine” असा आहे. खास गोष्ट अशी आहे कि ए.टी.एम मशीन च्या अविष्काराचा जन्म भारतामध्ये झाला होता. ATM मशीन बनविणारे स्कॉटलंड मधील जॉन शेफर्ड बैरन यांचा जन्म २३ जून १९२५ ला मेघालय मधील शिलॉंग मध्ये झाला होता. ATM मशीन ची कल्पना त्यांना अंघोळ करता करता आली. त्यांनी विचार केला जर चॉकलेट निघायची मशीन असू शकते तर तशीच पैसे निघायची मशीन देखील असू शकते, ज्या मशीन ने २४ तास पैसे निघत असतील तर किती सोपे होईल. त्यानंतर त्यांनी ए.टी.एम मशीन चा शोध लावला. त्यानंतर सन १९३९ मध्ये ए.टी.एम मशीन चा शोध पूर्ण झाला.

२) भारतात ए.टी.एम ची सुविधा सन १९८७ मध्ये सुरु झाली होती. संपूर्ण जगात ३० लाख ATM मशीन आहेत त्यातील अडीच लाख ए.टी.एम मशीन ह्या भारतात आहेत. भारतात पहिली मशीन होण्ग्कोंग अॅड शंघाई बँकिंग कॉर्पोरेशन – एचएसबीसी बँक द्वारे मुंबई मध्ये स्थापित केली गेली होती. सुरुवातीला एटीएम मशीन मधून पैशांचा तपशील देणारी सूचना पावती मिळत नसे.

३) काही लोक असे मानतात कि संकट समयी आपल्या ATM कार्ड चा पिन कोड उलटा टाकल्यास (म्हणजेच १२३४ ऐवजी ४३२१ टाकल्यास) जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये त्याची माहिती जाते. परंतु तुमच्या माहिती साठी सांगतो हि एक असत्य गोष्ट आहे. कारण तुम्हीच विचार करा ना कि एखाद्याचा ATM पिन Palimdrome number असला तर. Palimdrome number म्हणजे 1441 किव्हा एक अंकी number जसे कि चार वेळा २ तर ते ATM machine ला कळू शकणार नाही. आणि म्हणूनच जगात कुठेही सध्या तरी या technology ची अंमलबजावणी कलेली नाही आहे.

४) कधी कधी चोर फक्त पैश्याऐवजी पूर्ण ए.टी.एम मशीन चोरून नेतात परंतु ते जास्त दूर नाही जाऊ शकत कारण मशीन मध्ये GPS ची एक चीप असते. ज्यामुळे ए.टी.एम मशीन सापडणे सोपे होते.

atm1 Marathi varsa

५) आश्यर्याची गोष्ट म्हणजे सुरवातीला ATM मशीन फक्त पहिले ६ महिनेच चालली होती. पहिली ATM मशीन २७ जून सन १९६७ ला लंडन मधील बारक्लेज बँक ने लावली होती.

६) ए.टी.एम चे जनक बैरन यांनी आपला अविष्कार कधी पेटंट नाही केला. त्यांना त्यांची हि टेक्नोलोजी गुपित ठेवायची होती. बैरन यांनी पहिले ए.टी.एम चा पिन ६ अंकी नंबर ठेवणार होते परंतु लोकांना लक्षात ठेवणे सोपे जावे म्हणून त्यांनी ४ अंकी पिन ठेवला. जगातील प्रत्येक १०व्या ए.टी.एम कार्ड चा पिन नंबर १२३४ आहे. तर मग मित्रांनो आजच तुमच्या जवळच्या ATM ला भेट द्या आणि तुमचा पिन number change करून घ्या.

७) ए.टी.एम मशीन ची एक खास गोष्ट म्हणजे: ए.टी.एम मशीन मध्ये जिथे नोटा ठेवल्या जातात तेथे निळ्या रंगाच्या शाई ची बाटली ठेवण्यात येते. जर कोणी ए.टी.एम मशीन मधून जबरदस्ती नोटा काढण्याचा प्रयत्न करतात किंव्हा मशीन तोडतात तेंव्हा हि शाई नोटांवर पसरली जाते.

८) भारतात ए.टी.एम मधून शुक्रवारी सगळ्यात जास्त रक्कम काढली जाते. दुबई मध्ये काही ए.टी.एम मशीनस अश्या देखील आहेत ज्या मधून सोन्याचे बार काढता येतात.

९) ब्राझील मध्ये ए.टी.एम मशीन मधून पैसे काढण्या करिता पिन नंबर ची नाही तर बोटांचे ठसे लावावे लागतात, म्हणजेच तेथील ए.टी.एम मशीन आणि तेथील लोकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.

हे देखील वाचा: भारतीय चलन रुपयाची महत्वाची तथ्ये मराठी मध्ये

१०) अमेरिकेमध्ये पहिल्यांदा २ सप्टेबर सन १९६९ ला ATM मशीन मधून नगद रक्कम काढायची सुरुवात झाली होती.

११) पहिला ATM केमिकल बँक च्या न्युयोर्क शाखेने स्थापित केले होते. ए.टी.एम मशीनचा नाव केमिकल बँक ने पहिले डॉक्यूलेटर ठेवले.

१२) तुम्ही बँक खाते शिवाय देखील ए.टी.एम मधून पैसे काढू शकता परंतु हे भारतात शक्य नाहीये. खरतर युरोप देशातील रोमानिया मध्ये ८४% लोकसंख्ये कडे बँकेचे खाते नाहीये परंतु तरीसुद्धा ते ए.टी.एम चा वापर करतात.

१३) जगातील एकटा ए.टी.एम हा अंटार्क्टिका मध्ये आहे म्हणजे तेथे फक्त एकच ए.टी.एम मशीन आहे.

१४) पाण्यात तरंगणारी ए.टी.एम मशीन सर्वप्रथम केरला मधील कोची येथे लावण्यात आली होती. हि मशीन SBI बँकेने झंकार मध्ये लावली होती. ती Kerala Shipping and Inland Navigation Corporation Ltd (KSINC) या कंपनीची होती.

१५) जगातील सर्वात उंच ATM नाथू-ला मध्ये आहे. हा समुद्र तळापासून १४३०० फूट उंचावर आहे. हि ATM मशीन भारत चीन बोर्डर वरील सैन्य साठी लावण्यात आला आहे.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

2 thoughts on “Information about ATM in Marathi | ATM बद्दल काही मनोरंजक माहिती”

Leave a Comment