विमा म्हणजे काय? त्याचे प्रकार आणि फायदे काय आहेत? । What is Insurance in Marathi
What is Insurance in Marathi: जर आपल्याला हे सोप्या भाषेत समजून घ्यायचे असेल तर विमा म्हणजे, एक अशी व्यवस्था ज्यामध्ये कोणतीही एक विमा कंपनी आपल्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान, आजार, अपघात किंवा मृत्यूच्या नुकसानभरपाईची हमी देते.
विमा कंपनी प्रत्येक दुःखद घटनेनंतर मदत करते म्हणून प्रत्येकासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. आज या गर्दीच्या जीवनात काय कधी घडेल याची कोणाला माहिती नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्या मौल्यवान वस्तूंचा विमा योग्यरित्या केला असेल तर तो आपल्यासाठी बॅकअप मदतीसारखे कार्य करेल.
कसे? याबद्दल सविस्तर माहिती पुढे या लेखात मी देणार आहे, त्यामुळे हा मराठी वारसा चा लेख पूर्ण वाचा.
विम्याचे प्रकार त्याच्या फायद्यासह
विविध प्रकारच्या विम्याचे वेगवेगळे फायदे आहेत. आम्ही खाली काही महत्त्वपूर्ण विमा प्रकार आणि त्यांचे फायदे दिले आहेत.
1. जीवन विमा योजना म्हणजे काय आणि त्याचे फायदे (Life insurance policy information in Marathi)
जीवन विमा योजनेत किंवा लाइफ इन्शुरन्समध्ये निर्दिष्ट मूल्य(Specified Amount) जमा करून पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास पॉलिसीच्या नामनिर्देशित व्यक्तीला (Nominee) पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार (Terms and conditions) पैसे दिले जातात.
लोक हि policy खासकरुन आपल्या कुटुंबासाठी सोडून जातात कारण जीवनावर कोणाचाही विश्वास नाही म्हणून बहुतेक लोक हि policy अवलंबतात जेणेकरून ते गेल्या नंतर त्यांच्या कुटुंबांला पैशाच्या बाबतीत काहीतरी मदत मिळेल.
२. अपघात विमा योजना(Personal accident Insurance Information in Marathi)
पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार (Terms and conditions) पॉलिसीधारकाचा अपघात झाल्यास व पॉलिसीधारकास दुखापत झाल्यास अपघात विमा योजना किंवा अपघाती पॉलिसीमध्ये देखील Specified Amount जमा करून रुग्णालयाच्या खर्चासाठी किंवा मृत झाल्यावर ही रक्कम दिली जाते.
अपघाती विमा पॉलिसीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की अपघात झाल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. विमा पॉलिसी कंपनी सर्व खर्च सहन करते, परंतु भिन्न पॉलिसीमध्ये भिन्न अटी असतात ज्या वाचल्या पाहिजेत आणि त्या वाचूनच हि पॉलिसी घेतली पाहिजे.
3. वैद्यकीय आणि आरोग्य विमा योजना (Medical and Health Insurance Information in Marathi)
वैद्यकीय आणि आरोग्य विम्यामध्ये, आपण पॉलिसी घेतलेल्या व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित सर्व बाबींसाठी एक निश्चित किंमत देऊन अनेक फायदे मिळवू शकता जसे की आजारी असल्यास रुग्णालयात प्रवेश, औषधे आणि ऑपरेशनचा खर्च विमा कंपनी भरते.
हि पॉलिसी खूप महत्वाची आहे कारण प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य कधीना कधी खराब होतेच. अशा परिस्थितीत या पॉलिसीत कंपन्या वर्षामध्ये काही नियमित आरोग्य चेकअपचा (Health Checkup) खर्च देखील करतात. आजकालच्या अनियमित आणि अशुद्ध खाण्यापिण्यामुळे तब्येत कशी राहील याची शाश्वती नाही, अशा परिस्थितीत आरोग्य विमा पॉलिसी खूप उपयुक्त ठरते.
4. वाहन विमा (Vehicle Insurance information in Marathi)
आपल्याकडे आपली कार, मोटरसायकल किंवा इतर कोणतेही वाहन असल्यास वाहन विमा योजना किंवा Vehicle Insurance आपल्यासाठी अनिवार्य आहे. या प्रकारचे विमा पॉलिसी, अपघात किंवा वाहन चोरीस गेल्यास उपयुक्त ठरेल. परंतु काही वाहन विमा योजनांमध्ये, थर्ड पार्टी पॉलिसीदेखील केली जाते, ज्यामध्ये ड्रायव्हर्स किंवा पादचारी यांचा विमा हक्क सुद्धा सांगितला जाऊ शकतो.
हि पॉलिसी असणे फार महत्वाचे आहे कारण वाहन ही आपल्या घरातील एक मौल्यवान वस्तू आहे. आजकाल किरकोळ अपघात होतच असतात, त्यामुळे अशा वाहनांच्या दुरुस्तीवर जास्त खर्च येतो. जर आपण वाहन पॉलिसीचा विमा उतरविला असेल तर आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही कारण आपण आपल्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाल्यास विमा पॉलिसी कंपनीला आपला दावा करू शकता.
5. गृह विमा (Home Insurance information in Marathi)
गृह विमा किंवा Home Insurance मध्ये केलेल्या विम्यामध्ये आपल्या घराच्या बांधकाम साहित्याच्या आणि संरचनेनुसार policy तयार केली जाते. या विम्यात घराचे किंवा घरगुती वस्तूंच्या नुकसानीवर विमा करता येतो. हा विमा घर कोसळणे, अपघात होणे, वस्तू चोरीस जाणे, घरास आग लागणे किंवा घराचे नुकसान झाल्यामुळे किंवा त्यातील सामानाचे नुकसान झाल्यास लागू होतो.
6. प्रवास विमा (Travel Insurance information in Marathi)
तुम्ही एकटे किंवा तुमच्या कुटूंबासमवेत कुठे प्रवास करणार असाल तर प्रवास विमा किंवा Travel Insurance घेणे अधिक चांगले. अशा परिस्थितीत, प्रवासात विलंब झाल्यास किंवा प्रवास रद्द झाल्यास किंवा प्रवासादरम्यान अपघात झाल्यास विमा कंपनी नुकसान भरपाई देते.
अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा: प्रवास विमा मराठी माहिती
7. पीक विमा किंवा शेतकरी विमा (Crop/Farmer Insurance in Marathi)
जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही दरवर्षी पीक विमा काढायलाच हवा. हवामानाचा काहीच भरोसा नाही, पाऊस पडू शकतो किंवा नाही परंतु आपण आपल्या पिकाचा विमा घेतल्यास आपण चिंता न करता शेती करू शकता. जर पाऊस पडत नसेल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपले पीक नष्ट झाले तर विमा कंपनी नुकसान भरपाई देते.
8. इतर प्रकारची विमा योजना
पाळीव प्राणी विमा (Pet Insurance)
राजकीय जोखीम विमा (Political Risk Insurance)
विवाहासाठी विवाह विमा (Marriage Insurance)
आपणास विमा किंवा विमा संबंधित माहिती आवडली असेल तर हा लेख तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.
हे देखील वाचा
पी एम किसान योजना लाभार्थी यादी मराठी
3 thoughts on “विमा म्हणजे काय? त्याचे प्रकार आणि फायदे काय आहेत? । What is Insurance in Marathi”