Power of attorney म्हणजे काय? | Power of Attorney in Marathi

Power of attorney म्हणजे काय? | Power of Attorney in Marathi

Power of Attorney in Marathi: मित्रांनो आपण बऱ्याच वेळा पावर ऑफ अटरनी हा शब्द ऐकला आणि वाचला असेल. परंतु बऱ्याच जणांना पावर ऑफ अटरनी म्हणजे काय हे माहिती नाहीये. Power of attorney म्हणजे नेमकं काय? त्याचबरोबर पावर ऑफ अटर्नीची गरज का असते? Power of attorney किती प्रकारचे असतात? Power of attorney कधी रद्द करता येते?, इत्यादी बद्दल माहिती आज आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत.

Power of attorney म्हणजे काय?

Power of Attorney in Marathi
Power of Attorney in Marathi

Power of attorney ला मराठीमध्ये कुलमुखत्यारपत्र असे संबोधले जाते. Power of attorney द्वारे एखादी व्यक्ती स्वतःचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीला काही कारणास्तव देत असते. परंतु याबद्दल अनेक जणांमध्ये गैरसमज आहेत. कुलमुखत्यारपत्र हा एक असा सरकारी दस्त असतो ज्याद्वारे एखादी व्यक्ती स्वतःच्या तर्फे दुसऱ्या व्यक्तीला काही अधिकार देऊ शकते.

जी व्यक्ती कुलमुखत्यारपत्र देते त्याला मालक किंवा मास्टर असं संबोधलं जातं त्याचबरोबर ज्या व्यक्तीला हे कुलमुखत्यार पत्र दिलं जातं त्या व्यक्तीला एजंट किंवा कुलमुखत्यार धारक असे संबोधले जाते.

प्रामुख्याने कुलमुखत्यार पत्र हे एखादी प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी,एखादा दस्तऐवज एक्झिक्युट करण्यासाठी किंवा कोर्टाच्या केसेस मध्ये हजर राहून कामकाज पाहण्यासाठी दिले जाते.

कुलमुखत्यार पत्राची गरज का असते?

कुलमुखत्यार पत्राची नेमकी गरज का असते, हे आता आपण जाणून घेऊ.

1) जर एखादी व्यक्ती शारीरिक आजारामुळे स्वतः काम करण्यास असमर्थ असेल तर.

2) स्वतःच्या प्रॉपर्टीचा सांभाळ करण्यासाठी ये जा करणे एखाद्याला अशक्य असेल तर.

3) एखादी त्याच्या कामांमध्ये सतत व्यस्त असेल, आणि ती कामे करण्यास त्याला अशक्य असल्यास ती व्यक्ती कुलमुखत्यार पत्राचा वापर करते.

4) एखादी व्यक्ती वृद्धापकाळामुळे आजारी असेल किंवा एखादे काम करण्यास असमर्थ असेल तर अशा वेळेस ती व्यक्ती त्यांचे काम करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला कुलमुखत्यारपत्र देते.

आता आपण कुलमुख्यतार पत्राचे प्रकार जाणून घेऊ.

कुलमुखत्यार पत्राचे प्रकार :-

1) सामान्य कुलमुखत्यारपत्र :-

इंग्रजी भाषेमध्ये याला general power of attorney असे म्हटले जाते. या कुलमुख्यतर पत्रामध्ये जे अधिकार मालकाकडे असतात ते सर्व अधिकार कुलमुखत्यार धारकाला दिले जातात. सामान्यतः असे कुलमुखत्यार पत्र मालमत्तेची विक्री करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा मालमत्ता सांभाळण्यासाठी कुलमुख्यतार धारकास दिले जातात.

ज्या व्यक्तीला हे कुलमुखत्यारपत्र दिले जाते ती व्यक्ती विशिष्ट प्रॉपर्टीची आभासी मालकच बनते. कुलमुखत्यार पत्रामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या असतात त्या सर्व गोष्टींचे अधिकार त्या व्यक्तीला प्राप्त होतात.

2) विशेष कुलमुखत्यारपत्र ( Specific power of attorney in Marathi) :-

काही विशिष्ट कार्य करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या कुलमुख्यत्यार पत्रास विशेष कुलमुखत्यार पत्र असे म्हणतात. सोपवलेले काम जसे संपुष्टात येते तसेच हे कुलमुखत्यार पत्र देखील आपोआप रद्द होऊन जाते.

आता आपण कुलमुख्यतर पत्र कोण देऊ शकतो हे जाणून घेऊ.

कुलमुखत्यार पत्र कोण देऊ शकते?

ज्या व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे त्याचबरोबर जी व्यक्ती मानसिक रित्या बेडसर नाही ती व्यक्ती कुलमुखत्यार पत्र देऊ शकते. यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कुलमुखत्यार पत्र लिहून देणाऱ्यास जेवढे अधिकार असतात तेवढेच अधिकार कुलमुखत्यार पत्र लिहून घेणाऱ्यास देता येतात.

कुलमुखत्यार पत्र तयार झाल्यावर त्यास नोटरी कडून नोंदवले गेले पाहिजे असे केल्याने कुलमुखत्यार पत्राची विश्वासार्हता आणखी वाढते.

कुलमुखत्यार पत्र केव्हा रद्द होते किंवा कधी रद्द केले जाऊ शकते?

1) विशिष्ट कार्य करण्यासाठी जर कुलमुखत्यार पत्र देण्यात आलेले असेल तर ते काम पूर्ण झाल्यानंतर असे कुलमुखत्यार पत्र रद्द होते.

2) जर एखादा दिनांक कुलमुखत्यार पत्रामध्ये नमूद केलेला असल्यास, त्यादिवशी असे कुलमुखत्यार पत्र आपोआप रद्द होते.

3) कुलमुखत्यार पत्र देणाऱ्याचा मृत्यू झाला किंवा जर तो दिवाळखोर निघाला तर अशा वेळेस कुलमुखत्यारपत्र आपोआप रद्द होते.

4) जर एखादे कुलमुखत्यार पत्र पती आणि पत्नी यांच्या दरम्यान असेल आणि अशातच जर त्यांचा कायदेशीर रित्या घटस्फोट झाला असेल तर असे कुलमुखत्यारपत्र रद्द होते.

5) कुलमुखत्यारपत्र देणारी व्यक्ती त्याला वाटेल त्यावेळेस कुलमुखत्यार धारकास नोटीस देऊन असे कुलमुखत्यार पत्र रद्द करू शकते.

कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र कधी रद्द करता येते?

मित्रांनो आज-काल प्रत्येक कुलमुखत्यार पत्रावर बऱ्याच वेळा मुद्दामहून कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र असे लिहिले जाते, परंतु कधीही रद्द न होणारे कूलमुखत्यारपत्र हे नोंदणीकृत असावे लागते.

ही नोंदणी दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात जाऊन स्टॅम्प व नोंदणी फी ची रक्कम भरून करावी लागते.

बऱ्याच वेळा लोक कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र असे लिहून घेतात आणि त्याची नोटरी करून घेतात, अशा कुलमुखत्यार पत्राचे मूल्य तेवढेच असते जेवढे की सामान्य कुलमुखत्यार पत्राचे असते. जे कधीही रद्द करता येऊ शकते.

मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण power of attorney म्हणजे काय? power of attorney ची गरज का असते? power of attorney चे किती प्रकार आहेत? Power of attorney कधी रद्द करता येते? इत्यादी बद्दल माहिती जाणून घेतली. तुम्हाला जर आमचा हा लेख आवडला असेल तर कॉमेंट बॉक्स मार्फत नक्की कळवा.

हे देखील वाचा

Bharat mandapam information in Marathi

What is Dividend in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment