Information about Tattoo In Marathi | टॅटू काढायचा विचार करत आहात का?

Information about Tattoo In Marathi | टॅटू काढायचा विचार करत आहात का?

टॅटू काढायचा विचार करत आहात का? एक मिनिट .. त्या आधी हे नक्की वाचा

If you are thinking to make Tattoo Designs on your body then read this article. You will get Idea what care need to take before Tattoo making or after Tattoo design. Also information of side effects of tattoo or permanent tattoo in Marathi. How to remove tattoo in Marathi information you can able to read in this article.

आजकाल च्या काळात शरीरावर टॅटू काढणे म्हणजे नवीन फॅशन झाली आहे. तरुण तरुणी सध्या आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर स्वतः चे किंव्हा जिवलगांचे नाव, नवनवीन प्रकारचे चिञ आणि बरेच काही रंगीत सिम्बॉल काढून घेतात पण ह्या मुळे आपल्या त्वचेला तर काही दुष्परिणाम नाही ना होत? जाणून घेऊया ह्या लेखातून…

Information about Tattoo In Marathi
Information about Tattoo In Marathi

टॅटू करणे हे आतापासून नव्हे तर पूर्वीच्या काळापासून चालत आलेली प्रथा आहे. पूर्वी लोक आपले नाव हातावर गोंदवून घ्यायचे, आता हे गोंदवणे लांब राहील आणि त्यालाच नाव टॅटू हे नाव देऊन प्रोफेशनल बिझनेस सुरु केलं आहे. आणि सध्याची तरुणाई मध्ये हे खूपच ट्रेंडिंग झालं आहे . टॅटू हे दोन प्रकारचे असतात , एक तात्पुरते आणि दुसरे कायमस्वरूपी. आजकाल लोक थोडे जास्त पैसे खर्च करून कायमस्वरूपी टॅटू काढणे जास्त पसंत करतात कारण ते जास्त आकर्षित वाटतात परंतु त्यामुळे आपल्या त्वचेवर आणि रक्तावर गंभीर परिणाम होतात

Tattoo Ink कश्यापासून बनवीले जाते?
टॅटू बनविण्यासाठी वेगळ्या प्रकारची शाई वापरली जाते, जी आपल्या त्वचेसाठी धोकादायक आहे. निळ्या रंगाची शाई टॅटू काढण्यासाठी वापरली जाते ज्यात अँल्युमिनियम आणि कोबाल्ट असतात. निळ्या रंगाव्यतिरिक्त रंगाच्या शाहीमध्ये स्टेडियम, क्रोमियम, निकेल आणि टायटॅनियम सारख्या अनेक धातू आढळतात, जे त्वचेसाठी चांगले नसतात.

टॅटू काढायचा विचार करत आहात का
टॅटू काढायचा विचार करत आहात का

१) त्वचेवर परिणाम :
टॅटू हे प्रोफेशनल कडून न काढल्यास त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. आणि कितीही नाही म्हटलं तरी आपल्या त्वचेवर त्याचे परिणाम दिसून येतातचे जसे कि त्वचा लाल होणे, सतत खाज येणे. याचे कारण असे कि टॅटू करताना ती शाही त्वचेच्या तीन लेयर्स पर्यंत गेलेली असते आणि त्याचे परिणाम हळू हळू दिसू लागतात.

Skin effects of tattoo in Marathi
Skin effects of tattoo in Marathi

२) एलेर्जी : (Tattoo Allergy in Marathi)
जरी तुम्ही टॅटू काढलात तरी त्या शाई मध्ये असलेल्या केमिकल किंवा प्लास्टिक मुळे सुद्धा एलर्जीक रीऍक्शन होते आणि कालांतराने त्याच रूपांतर सूज येणे किंवा जखम होऊन त्यातून रक्त येणे यात होऊन ती गोष्ट अजून चिघळण्याची शक्यता दाट असते!

Tattoo Allergy in Marathi
Tattoo Allergy in Marathi

३) एमआरआय मध्ये येणारा अडथळा
हा अडथळा फार क्वचितच येतो पण शक्यता नाकारू शकत नाही. टॅटू करताना स्वस्त किंवा चालू क्वालिटीची शाई वापरली असल्यास किंवा टॅटू जुना झाला असल्यास डॉक्टरकडे तुमचा एमआरआय काढताना अडथळा येऊ शकतो. हे खूप क्वचित आहे त्यामुळे याबाबत वैद्यकीय सल्ला घेणं कधीही उत्तमच..!

टॅटू काढायच्या आधी हे नक्की वाचा
टॅटू काढायच्या आधी हे नक्की वाचा

४) स्किन कॅन्सर (Skin Cancer) चा धोका किंव्हा स्किन कॅन्सर असल्यास ते न कळण्याची शक्यता :
टॅटूने झालेल्या एलर्जीमुळे आणि त्यातून त्वचेवर आलेल्या लाल डागांमुळे किंवा सूज आल्यामुळे त्या व्यक्तीला स्किन कॅन्सर असल्यास तो लगेच डिटेक्ट होऊ शकत नाही आणि ही गोष्ट तुमचा जीव सुद्धा धोक्यात घालते! तसेच वापरल्या जाणाऱ्या शाही मध्ये असणारे धातू हे कण 100 नॅनोमीटरपेक्षा लहान आहेत. आणि हे शरीराच्या इतर भागांसाठी धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. कॅन्सर सारख्या आजाराचा धोका असण्याची शक्यताही संशोधकांनी व्यक्त केली आहे. तथापि, या अभ्यासाचे निकाल चांगल्या प्रकारे समजण्यासाठी पुढील संशोधन आवश्यक आहे.

टॅटू काढायचा विचार करत आहात का
टॅटू काढायचा विचार करत आहात का

५) योग्य ठिकाणी टॅटू न काढल्याने होणारे दुष्परीणाम:
प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट तोच असतो जो आपल्या कस्टमरची काळजी घेऊन टॅटू कुठे काढला पाहिजे आणि कुठे नाही याबाबत सल्ला देतो! काही लोकं फक्त पैशासाठी लोकं सांगतील तसा आणि तिथे टॅटू काढतात

६) रक्तदान करताना अडचण (Blood Donation after Tattoo) :
टॅटू केल्यानंतर साधारणपणे एक आठवडा ते एक महिना तुम्ही कुणालाही रक्तदान करू शकत नाही, कारण ती शाई आणि त्यातली घातक केमिकल्स तुमच्या त्वचेमार्फत किंवा रक्तामार्फत समोरच्या व्यक्तीला जाण्याची शक्यता जास्त असते! वैद्यकीय सल्ल्यानुसार आजकाल टॅटू काढल्यास शक्यता: रक्तदान करून देत नाही

७) चुकीच्या सुया वापरल्याने होणारे रोग
आपण लहानपणी सायन्स मध्ये शिकतो की एकमेकांच्या Syring, टूथब्रश, रेझर वापरल्याने एचआयव्ही (HIV) किंवा हीपेटेटीस बी(Hepatitis B) सारखे रोग किंवा कॅन्सर (cancer) व्हायचे चान्सेस असतात, तसंच टॅटू काढताना कुणा दुसऱ्याला वापरलेल्या सुईचा तुमचा टॅटू काढण्यासाठी वापर केल्यास सुद्धा हाच धोका निर्माण होऊ शकतो. प्रत्येक Tattoo Artist सुई बदलतोच असं नाही, त्यामुळे हे सगळे धोके पत्करून आताही जर तुम्हाला टॅटू काढायचा असेल तर किमान तो टॅटू आर्टिस्ट सुई बदलतो का नाही यावर बारकाईने लक्ष द्या आणि मगच टॅटू काढायला सुरवात करा!

टॅटू काढण्याआधी खालील काळजी नक्की घ्या :

१) टॅटू काढण्यापूर्वी हिपॅटायटीस बी चे इंजेक्शन घ्यावे.
२) हे प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट (Professional tattoo Artist) कडूनच बनवून घ्या.
३) स्वच्छतेची काळजी घ्या.
४) टॅटू बनविलेल्या ठिकाणी नेहमी Antibiotic Cream लावा.

जर आपल्याला टॅटू काढायचा असेल तर आपण हि काही सावधगिरी बाळगून हे पूर्ण करू शकता.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment