एक पेक्षा जास्त बँक अकाउंट ठेवण्याचे फायदे आणि तोटे | Profit and Loss Multiple Bank Accounts in Marathi
Loss of Multiple Bank Accounts in Marathi: मित्रांनो सध्याच्या काळात कोणताही व्यक्ती दोन किंवा दोन पेक्षा जास्त बँकेत एकाच नावाने खाते (Multiple Bank Account) उघडू शकत आहे. काही लोकांसाठी ही गोष्ट गरजेची आहे मात्र काही लोक गरज नसताना एकाच नावाने अनेक बँक खाते सुरू करतात. उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर एखादा बिझनेसमन असेल किंवा एखाद्याचे दररोजचे व्यवहार जास्त आहेत तर मग त्याला दोन किंवा त्यापेक्षा जास्त बँक अकाउंट ची गरज असते. याशिवाय अनेक लोक सॅलरी अकाउंट शिवाय एक सेव्हिंग अकाउंट देखील सुरू करत असतात. मात्र मित्रांनो, खर तर हे आहे की लोक एकापेक्षा जास्त खाते खोलतात मात्र ते त्यांना मेंटेन करू शकत नाहीत. लोक याच्या फायद्यांविषयी किंवा होणाऱ्या तोट्यांविषयी कधीच विचार करत नाहीत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा असलेल्या पैशांमधून तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागू शकते. चला तर मग तुम्हाला सांगतो की एक पेक्षा जास्त जर बँक खाते तुमचे असतील तर तुम्हाला कोणत्या प्रकारे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकतात.
जास्त इनकम मिळविण्याऐवजी तुम्ही मागेच राहाल
जर तुमचे दोन किंवा दोन पेक्षा जास्त अकाउंट असतील तर मग तुम्हाला एका मोठ्या तोट्याचा सामना करावा लागू शकतो. हे नुकसान तुम्हाला झाले तरी देखील तुम्हाला त्याविषयी माहिती देखील होणार नाही. खरतर तुम्हाला तुमचे खाते जर मेंटेन करायचे असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक ठराविक रक्कम सतत ठेवावी लागते. म्हणजे जर तुमचे जास्त बँक खाते असतील तर तुम्हाला तितकी रक्कम सतत त्या खात्यात ठेवावी लागेल. म्हणजे तुमची खूप मोठी रक्कम गुंतून पडते. तुम्हाला त्या रक्कमेवर जास्तीत जास्त 5 ते 6 टक्केच व्याज मिळते.
मित्रांनो या उलट जर तुम्ही जर तुमचे जास्तीत जास्त पैसे हे सेव्हिंग खात्यात ठेवण्याऐवजी दुसऱ्या योजनांमध्ये जसे की शेअर मार्केट, पोस्ट ऑफिस, सरकारी ब्रॅण्ड लिक्विडीटी फंड, म्युच्युअल फंड किंवा FD मध्ये टाकत असाल तर त्याच पैशांचा तुम्हाला कित्येक पट जास्त रिटर्न मिळू शकतो. खरंतर म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट तुम्हाला तुमच्या पैशांवर सेव्हिंग अकाउंट च्या तुलनेत खूप जास्त रिटर्न देते. तर दुसऱ्या सेव्हिंग योजनांमध्ये देखील तुम्हाला बँकेच्या सेव्हिंग खात्यापेक्षा जास्त चांगला रिटर्न मिळू शकतो.
जास्त बँक खाते असतील तर हे नुकसान होऊ शकतात:
जास्त करून प्रत्येक बँकेकडून सेव्हिंग बँक खात्यात एक मिनिमम अमाऊंट ठेवण्याचा नियम असतो. जर तुम्ही असे करत नसाल तर मग तुम्हाला एक पेनलटी बँकेला द्यावी लागते. याशिवाय बँक तुमचे खाते बंद देखील करू शकते. तुम्ही जर एखाद्या प्रायव्हेट बँकेत खाते खोलत असाल तर मग तुम्हाला 10 हजार पर्यंत मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. जर तुमचे अशा दोन बँकेत खाते असेल तर तुमचे 20 हजार रुपये अडकून पडलेले असतात.
मित्रांनो तुम्हाला हे तर माहितीच असेल की कोणत्याही बँकेत आपले खाते असेल तर आपल्याला त्याचे वर्षाला काही मेंटेनन्स चार्ज आणि सर्व्हिस चार्ज द्यावे लागतात. जर तुमचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त खाते असतील तर तुम्हाला त्या प्रत्येक खात्याचे मेंटेनन्स चार्ज द्यावे लागतील. प्रत्येक बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इतरही अन्य बँकिंग सुविधांसाठी त्यांच्या ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क घेत असते. इथे देखील तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल आणि याकडे आपले कधी लक्ष देखील जाणार नाही.
एक पेक्षा जास्त बँकेमध्ये खाते असल्याचे आणखी एक नुकसान हे देखील आहे की जर तुम्ही डेबिट कार्ड किंवा खात्याचा एखादा पासवर्ड विसरलात तर तुम्हाला तो पुन्हा मिळविणे कठीण होऊन बसते.
इनकम टॅक्स भरण्यासाठी प्रॉब्लेम येतात
तुमचे जर एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर मग तुम्हाला आयकर विभागात म्हणजेच इनकम टॅक्स विभागात टॅक्स भरताना अडचणी येऊ शकतात. टॅक्स जास्त जाणार नाही मात्र कागदपत्रे पूर्ण करण्यात तुमच्या नाकी नऊ नक्की येतील. सोबतच तुम्हाला इनकम टॅक्स फाईल करत असताना सर्व बँकांचे स्टेटमेंट गोळा करून ते त्याला जोडावे लागते. हे स्टेटमेंट जमा करणे आणि त्यांची जुळवाजुळव करणे मात्र कठीण जाते.
भारतातील सर्वात मोठ्या 10 बँका 2024
आता मल्टिपल बँक अकाउंट असण्याचे फायदे जाणून घेऊयात.
मित्रांनो जेव्हा पासून बँकेने ATM मधून 5 ट्रानजेक्शन आणि इतर बँकांच्या ATM मधून 3 ट्रानजेक्शन ही लिमिट लावलेली आहे तेव्हा पासून ज्यांच्याकडे दोन किंवा त्यापेक्षा जास्त बँक खाते आहेत त्यांना अधिक फ्री ट्रानजेक्शन मिळत आहेत. जर तुमचे 2 बँकांमध्ये खाते आहे तर मग तुम्हाला महिन्याला 10 ट्रानजेक्शन ATM मधून फ्री करण्याच्या संधी मिळत आहेत. जर मध्येच एखाद्या बँकेचे नेटवर्क फेल झाले तर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या खात्यातून पैसे सहज काढू शकता.
मित्रांनो याशिवाय तुमच्याकडे एकापेक्षा जास्त म्हणजेच multiple bank account असतील तर अनेक स्कीम्स चा तुम्हाला लाभ घेता येऊ शकतो. काही स्कीम्स मध्ये वर्षाला भराव्या लागणाऱ्या आकर्षक प्रीमियम वर पर्सनल ऍकसिडेंट कव्हर मिळून जातो. जर तुमच्याकडे एक पेक्षा जास्त बँक खाते असतील तर तुमच्याकडे चेक बुक्स ची संख्या देखील वाढते. याशिवाय तुमचे क्रेडिट बघून बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड देखील उपलब्ध करून देतात. तुम्हाला इथे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड देखील निवडण्याची मुभा असते.
जर एखादी बँक कमी व्याज देत असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मर्जीनुसार त्या बँकेतून पैसे काढून दुसऱ्या बँकेत टाकू शकतात जिथे तुम्हाला जास्त व्याज मिळू शकते.
मल्टिपल बँक अकाउंट कसे मॅनेज करायचे?
मित्रांनो जर तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त बँक खाते असतील आणि तुम्ही दुसरे खाते वापरत नाहीत तर ते खाते बंद करून टाकणे कधीही चांगले असते. तुमचे सर्व बँक खाते योग्य प्रकारे चालविण्यासाठी एक एन्ट्री सिस्टम बनवा ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सगळ्या बँक खात्यांची माहिती लिहून सेव्ह करून ठेवू शकतात. तुम्ही कोणत्या खात्याचा वापर कशासाठी करत आहात आणि त्यावर काय व्यवहार करत आहात हे वेगवेगळे लिहून ठेवा. सर्व बँक खात्यांचे व्यवहार एकत्र मिक्स करू नका.
तुम्ही जर असे केले तर तुम्ही सहज एक पेक्षा जास्त म्हणजेच multiple bank accounts मॅनेज करू शकता. तुम्हाला ते मॅनेज करता आले तर मग नुकसान होण्याची शक्यता देखील फार कमी असते. अनेक आर्थिक सल्लागार सांगतात की जर गरज नसेल तर व्यक्तीने उगीचच एका पेक्षा जास्त बँक खाते सुरू करू नयेत.
मित्रांनो Loss of Multiple Bank Accounts in Marathi या आमच्या लेखाच्या माध्यमातून समजले असेलच कि एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असल्यामुळे कोणते फायदे व नुकसान होतात. तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून सांगा.
हे देखील वाचा
बॅक लिंक देऊ शकता का
yes send me email on [email protected]