Information about Smile in Marathi | Smile बद्दल काही आश्चर्यकारक माहिती

Information about Smile in Marathi | Smile बद्दल काही आश्चर्यकारक माहिती

जेव्हा आपण लहान होतो, तेव्हा आपला दिवस नेहमीच हसत हसत जात असे … मग आपण मोठे झालो. चांगल्या नोकरी साठी खूप शिक्षण घेतल आणि स्वतःचे जीवन सेट करण्यात आपण आपल आयुष्य खूप गंभीरपणे जगायला लागलो आहोत. आणि या व्यस्त जीवन शैलीमध्ये आपले हसू कुठे तरी हरवत गेलो. आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला हसण्याचे महत्व सांगणार आहे. जे वाचून तुम्ही नक्की आश्चर्यचकित व्हाल.

१) गुदगुदल्या करतेवेळी फक्त मनुष्यच नाही तर उंदीर देखील हसतात.

२) आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपण एक क्षण का होईना पण पृथ्वीवर सर्वात लहान वयाचे व्यक्ती असतो.

३) हसण्यासाठी १७ स्नायुंचा वापर होतो तर रागावण्यासाठी ४३ स्नायुंचा वापर होतो.

४) जगात कुठेतरी, एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील सर्वात उत्तम दिवस असतो.

५) हसण्याचा वास्तवात काहीही अर्थ नाही.

६) आनंदाची पातळी मोजणे कठीण आहे.

७) आपण जेव्हा एकटे राहतो तेव्हा आपण ३० टक्के कमी हसतो.

८) तुमचा मेंदू बनावट हसणे पकडू शकतो.

९) आपल्याला विनोद आणखी मजेदार तेव्हा वाटतो जेव्हा आपण त्या हास्यामध्ये अभिनेत्याला ओळखत असतो.

१०) विश्वास ठेवा कीव्हा नका ठेऊ, परंतू हसणे हे एक प्रकारचे विज्ञान आहे. याला “जेलोटोलोजी” म्हणतात.

११) सरासरी एक व्यक्ती दररोज सुमारे तेरा वेळा हसते.

१२) आपल्या चेहऱ्यावर मेकअप पेक्षा हास्य अधिक आकर्षक दिसते.

१३) हसण्याचे १९ विविध प्रकार आहेत.

१४) महिला या पुरुषान पेक्षा १२७ टक्के अधिक हसतात.

१५) मनुष्य ३५० फूट दूरवरून सुद्धा हसणे पकडू शकतो.

१६) आपले हसणे, आपल्या सभोवतालचे लोक कसे आहेत यावर निर्धारित असते. विनोदावर नाही.

१७) जे लोक आपले दुःख आपल्या हसण्याच्या मागे लपवून ठेवतात त्यांना “Eccedentesiast” म्हणतात.

१८) हसण्यामुळे आपल्या हृदयाची गती कमी होते आणि आपले शरीर तणाव मुक्त रहाते. जे लोक नेहमी हसतात त्यांना हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते तसेच हसल्याने तात्पुरते रक्तदाब कमी होते.

२०) हसल्याने आपला चेहरा उजळतो आणि एका सर्व्हे मध्ये असे दर्शविलेले आहे की हसल्याने लोक त्यांच्या वयाच्या तीन वर्षांपेक्षा लहान दिसतात.

२१) जे लोक जास्त हसतात ते अधिक काळ जगतात एका अभ्यासानुसार म्हटले गेले आहे की सतत हसणारे बहुतेक लोक सात वर्ष जास्त जगतात. ह्याचे कारण असे की हसल्यामुळे ताण तणाव शरीरातून बाहेर काढला जातो आणि आपले आरोग्य व हृदय निरोगी राहते.

२२) सतत हसत राहिल्याने आपल्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसून येतो आणि ह्याचा परिणाम आपल्या कामावर होतो. असे दिसून येते की जे लोक जास्त हसतात ते अधिक पैसे कमावतात कारण अधिक सहजपणे व्यवसाय कल्पनांशी संपर्क साधून प्रगती करतात.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment