जाणून घेऊया भारतीय प्राचीन श्रद्धे मागील विज्ञान

१) गोमय (सारवणे): पूर्वीच्या काळी घराच्या भिंती आतून व बाहेरून ह्या गाईच्या शेणाने सारावल्या जायच्या कारण गाईचे शेण हे प्रतिजैविक (antibiotic) तसेच खनिजेयुक्त असल्यामुळे वेगवेगळ्या आजारांपासून आणि आजार पसरवणाऱ्या जिवानूपासून प्रतिबंध करतो.

२) गाभारा: हिंदू मंदिरांची स्थापना वैज्ञानिक दृष्ट्या झाली आहे. मंदिरात जिथे मूर्तीची स्थापना केली जाते त्या भागाला “गाभारा” म्हटले जाते. हा गाभारा अश्या ठिकाणी असतो जिथे पृथ्वीतून येणाऱ्या चुंबकीय किरणांचे प्रमाण जास्त असते आणि ते उपासना करणाऱ्याला लाभदायक असतात.

३) वेद मंत्र: हिंदू प्राचीन काळात वेद मंत्रांचे पठण करण्यात येई. वेद मंत्रांचे उच्चार केल्याने शरीराचे आजार बरे करण्यास मदत होते जसे की रक्तदाब.

४) तोरण: आंबा, लिंबू तसेच अशोकाच्या पानांचे तोरण घराच्या दरवाज्याला बांधून पूर्वी घर सजविण्यात यायचे. हि पाने वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करतात.

५) प्राणायाम: जर तुम्हाला रोजच्या ताणतणावातून आराम हवा असेल तर योगासन – प्राणायाम पेक्षा चांगला उपाय नाही. (प्राणायाम म्हणजे नाकाच्या एका बाजूने श्वास हळू हळू आत व बाहेर सोडणे.)

६) बैठका: पूर्वी वरिष्ट लोक देणारी शिक्षा म्हणजे कान पकडून बैठका काढणे, जे खर तर मन तेज बनविण्यास मदत करते तसेच आत्मकेंद्रीयपणा, ऐकण्यात त्रास असल्यास मदत करते.

७) हळद: हळदीत प्रतिजैविक(antibiotic), प्रतिऑक्सिडीकारक(antioxidant), विरोधी दाहक(anti inflammatory) गुण असल्यामुळे हळद मिसळलेले पाणी सकाळ संध्याकाळ घर भोवती शिंपडले जाते.

८) कान टोचणे: लहान बाळाचे कान टोचणे हे एक आयुर्वेदिक उपचारातील भाग आहे. कानाचा जो भाग टोचला जातो तो दमा सारख्या आजरापासून बचाव करण्यास मदत होते.

९) हनुमान चाळीसा: नासा(NASA) च्या संशोधनानुसार हनुमान चाळीसा म्हणजे सूर्य व पृथ्वी मधील अंतराची अचूक गणना आहे.

१०) तुळस: प्रत्येक हिंदूंच्या घराबाहेर तुळशीचं रोप असत. तुळशीचं पाने खाल्याने शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच H1N1 आजाराला प्रतिबंध घालते.

११) केळीचे किंव्हा पळसाचे पान: हिंदू संस्कृती मधे केळीच्या किंव्हा पळसाच्या पानावर जेवण वाढतात कारण हे एक पर्यावरणपूरक साधन असून ते साफ करण्यासाठी कोणत्याही रासायनिक साबणाची गरज नाही तसेच पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहचवता त्यांचा नायनाट करता येतो.

१२) शंख पुकार: शंख पुकारातून जी ध्वनी निर्माण होतो त्याने बरेच हानिकारक जीवजंतू चा नाश होतो. डासांची पैदास देखील शंख ध्वनीने प्रभावित होते ज्यामुळे मलेरिया सारख्या आजार पसरण्यात आळा बसतो.

१३) दिवा: तेलाचा किंव्हा तुपाचा दिवा घरात तसेच मंदिरात तेवत ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

१४) कडूलिंब व केळ्याचे झाड: सकाळी कडूलिंब किंव्हा केळीच्या झाडाजवळ बसून उपासना करावी असे सल्ले दिले जातात, कारण ह्या झाडाजवळची हवा शुद्ध मानली जाते जी शरीरासाठी लाभदायी ठरते.

१५) ॐ: ॐ चा सतत उच्चार हृदयाच्या ठोक्यावर नियंत्रण ठेवते. त्याच बरोबर शरीराला आराम देतो.

१६) वाकून पाय पडणे: वरिष्ठाच्या वाकून पाय पडल्याने पाठीचा कणा नीट ठेवण्यास मदत होते तसेच मेंदूला रक्त पुरवठा होण्यास मदत होते.

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.