Sachin Tendulkar Information in Marathi
‘सचिन तेंडूलकर’ म्हणजे क्रिकेट क्षेत्रातील देव… सचिन तेंडूलकर खेळातून बाद होताच अर्धा भारत आपापल्या टीव्ही बंद करत असे. क्रिकेट तर सर Don Bradman पासून Brian Lara पर्यंत कितीतरी जण खेळले आहेत तरी देखील का मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरलाच ” The God of The Cricket ” बोलले जाते.
कारण फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जग ह्या क्रिकेटर चे वेडे आहेत. भारतात सचिन रमेश तेंडूलकर शिवाय क्वचितच असा दुसरा कोणी असेल ज्याला “भारत-रत्न” होताना बघण्यासाठी लोक उस्तुक आणि उतावळी दिसण्यात आली. वयाच्या १६ व्या वर्षी अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची सुरवात करणाऱ्या सचिन ने नवीन नवीन विक्रमांचा संग्रह केला. मग ते एकदिवसीय सामन्यात सर्व प्रथम २०० धावा बनविण्याचा विक्रम असो किंव्हा १०० अंतरराष्ट्रीय शतक बनिविण्याचा विक्रम असो. असे अनेक विक्रम सचिन तेंडूलकर यांनी केलेत जे सांगण्यास एक पूर्ण दिवस लागेल. चला बघूया अश्या विक्रम बादशहा सचिन तेंडूलकर बद्दल काही आकर्षित गोष्टी जे वाचून तुम्ही थक्क ह्याल.
१) सचिन चे वडील रमेश तेंडूलकर हे सचिन देव बर्मन यांचे खूप मोठे चाहते होते त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव देखील त्यांच्याच नावाने ठेवले “सचिन”.
२) पहिले सचिनला एक उत्तम गोलंदाज (Fast Bowler) बनायचे होते परंतु M.R.F फाउंडेशन च्या डेनिस लिली यांनी सन १९८७ मध्ये सचिन ला खरेदी केले आणि लिली यांनी सचिनला फक्त फलंदाजी (bating) वर लक्ष द्यायला सांगितले.
३) सचिन जेंव्हा दुसऱ्या खेळांडू बरोबर खेळाचा सराव करत असे तेंव्हा त्यांचे कोच स्टंप वर एक शिक्का ठेवत असत आणि दुसऱ्या खेळांडूना सचिन साठी बॉलिंग करायला लावत असे, आणि जो खेळाडू सचिन ला बाद करेल त्याला तो शिक्का देत असे. पण जर सचिन ला कोणीच बाद नाही करू शकला तर तो पैश्याचा शिक्का सचिन ला मिळत असे. सचिन यांच्या कडे आजही ते जमा झालेले १३ शिक्के आहेत.
४) सचिन गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही उजव्या हाताने खेळतात परंतु लिहितात मात्र डाव्या हाताने तसेच ते टेनिस देखील डाव्याच हाताने खेळतात.
५) १९८८ मध्ये मुंबई येथील ब्रेबोन स्टेडीयम मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये एक सराव सामना झाला होता त्यात सचिन ने पाकिस्तान साठी फिल्डिंग (Fileding) केली होती.
६) सचिन ने ७९ सामन्यानंतर पहिले एक दिवसीय शतक धावा मारले होते. परंतु या दरम्यात टेस्ट सामन्यामध्ये ७ वेळा शतक मारले होते.
७) २००८ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये मोहाली येथे सामना झाला होता तेंव्हा सचिन ने सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडला होता. मैदानात इतका जल्लोष होता कि आतिशबाजी मुळे २० मिनिटे खेळ थांबविण्यात आला जेणे करून झालेला धूर निघून जाईल.
८) सचिन क्रिकेट क्षेत्रातील असे पहिले फलंदाज (batsman) आहेत ज्यांना third umpire (तिसरे पंच) यांनी बाद (out) घोषित केले. १९९२ मध्ये भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या डरबन टेस्ट सामन्या मध्ये महान फिल्डर जॉटी रोड्स यांच्या गोलंदाजीने third umpire यांनी टीव्ही वर रिप्ले बघून सचिन ला बाद घोषित केले.
९) सचिन कधी कधी घरी आपली पत्नी अंजली व आपल्या मुलांसाठी नाश्ता बनवितात. एवढेच नव्हे तर १९९८ मध्ये सचिन ने संपूर्ण संघासाठी वांग्याचे भरीत बनविले होते.
१०) सचिन एकवेव असा खेळाडू आहे ज्याने रणजी, दलीप व इराणी ट्रॉफी या सामन्यामध्ये सुरवातीलाच शतक पटकावले होते. आणि त्याचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कोणीही मोडू शकला नाहीये.
१२) सचिनने पहिला First Class क्रिकेट सामना मुंबई करिता वयाच्या १४ व्या वर्षी खेळला तसेच सचिन ने पहिल्या टेस्ट सामन्यात सुनील गावस्कर यांनी भेट दिलेले पॅड घातले होते.
१३) सचिन वयाच्या २३ व्या वर्षी प्रथम भारतचे कप्तान बनले होते.
१४) सचिन ने लगातार १८५ एक दिवसीय सामने भारतासाठी खेळले जो एक रेकॉर्ड बनला आहे.
१५) सन १९९६ व २००३ मधील विश्वचषक क्रिकेट सामन्यात सचिन “Man Of Tournament” बनले होते.
१६) सचिनला घड्याळ व पर्फुम्स एकत्र करण्याचा छंद आहे तसेच जेव्हा सचिन bating करत असतात तेंव्हा त्यांची पत्नी अंजली ना काही अन्न खातात व पाणी देखील पीत नाही.
१७) १९९५ मध्ये सचिन वेश बदलून ‘रोजा’ चित्रपट बघायला गेले होते परंतु यांचा चष्मा पडल्याबरोबर चित्रपट गृहातील लोकांनी त्यांना ओळखले.
१८) सचिन ची बॅट साधारण १.५ किलोग्राम ची असायची. एवढी जड बॅट फक्त दक्षिण आफ्रिकेचे लान्स क्लूजनर वापरत होते.
१९) सचिन सौरभ गांगुली यांनी “बाबू मोशाय” बोलतात व गांगुली सचिन यांनी “छोटा बाबू” नावाने हाक मारतात.
२०) भारत सरकारकडून सचिन तेंडूलकर यांना पद्मविभूषण , राजीव गांधी अवार्ड (खेळ), महाराष्ट्र भूषण अवार्ड , पद्मश्री, अर्जुन अवार्ड आणि भारत रत्न या सर्व पदांनी सन्मानित केले आहे.
१०० शतक, १६३ अर्धशतक, ३४००० धावा हे बघून अस वाटत ना कि हे सगळे नंबर एखाद्या संघाचे आहेत. पण तस नाहीये, हे सगळे फक्त एकाच व्यक्तीने केलेले नंबर आहेत आणि ते कोणाचे आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाहीये.. कारण ते तुम्हाला कळलच असेल.
तर मित्रांनो Sachin Tendulkar Information in Marathi या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला सचिन बद्दल थोडी फार माहिती जाणून घायला मदत झाली असेल. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा.
या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.
1 thought on “Sachin Tendulkar Information in Marathi | सचिन तेंडूलकर बद्दल माहिती”