Information About Internet in Marathi | जाणून घेऊया इंटरनेटबद्दल काही आश्चर्यकारक तथ्ये

Information About Internet in Marathi | जाणून घेऊया इंटरनेटबद्दल काही आश्चर्यकारक तथ्ये

प्रत्येक वस्तूबद्दल माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेली आपल्याला आढळते. अगदी घरातील किचन मध्ये एखादा नवीन पदार्थ बनवाच्या रेसिपी पासून तर एखादया डॉक्टरला रोग्यावर उपचार करण्यासाठी एखादा संदर्भ हवा असेल इथपर्यंत सर्व माहिती आपण इंटरनेटवर सहजरीत्या मिळवू शकतो. जवळपास सर्वच खासगी तसेच सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, रुग्णालये, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच इंटरनेटवर आपले एक संकेतस्थळ उघडून त्यात आपली माहिती प्रकाशित करतात. परीक्षेचा अर्ज असो नोकरीचा अर्ज देखील भरण्याची व्यवस्था इंटरनेटवर आढळते.

सर्वच वृत्तपत्र तसेच वृत्तवाहिन्यांची संकेतस्थळे आज उपलब्ध आहेत आणि त्यावर सर्व बातम्या प्रकाशित करतात. कला, साहित्य, क्रीडा, वैज्ञानिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय सर्वच क्षेत्रातील माहितीचा खजिना इंटरनेटवर उपलब्ध आहे. पूर्वी, कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा संदर्भ हवा असेल तर वाचनालयातील त्या विषयासंदर्भातील पुस्तकात तो शोधला जाई, मात्र आता काळ बदलला असून अशा अडचणी इंटरनेटवर माहिती शोधून सोडविल्या जातात. सध्या इंटरनेटवर सोशल नेटवर्किंग वेबसाईटची विशेष धूम आहे. ज्यामध्ये आपण आपल्या मित्रांशी कायम संपर्कात राहू शकतो, नवनवीन मित्र बनवू शकतो, आपले मत मांडू शकतो, विविध विषयांवर चर्चा करू शकतो.

जगातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या.

जगातील एकूण ३० दशलक्ष लोकसंख्येपैकी जवळपास ४०% लोकसंख्या म्हणजे ३०० दशलक्ष लोक इंटरनेटचा वापर करतात.

भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या

भारतातील १२५ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे २५ कोटी (२०%) लोक इंटरनेटचा वापर करतात.

इंटरनेटवरील वेबसाइट्सची संख्या

१९९१ पूर्वी कोणतीही वेबसाइट नव्हती, तर आज १०० दशलक्षांपेक्षा जास्त संकेतस्थळ आज इंटरनेटवरून नोंदणीकृत झाले आहेत आणि त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

ई-मेल प्रति सेकंद

सुमारे २४,००,००० ई-मेल प्रत्येक सेकंदात इंटरनेटवर पाठविल्या जातात.

प्रति सेकंद वॉट्सएप संदेश

सुमारे २,५०,००० संदेश प्रत्येक सेकंदात व्हाट्सएप अॅपमध्ये पाठविले जातात.

यूट्यूब – प्रति सेकंद यूट्यूब व्हिडिओ

एका सेकंदात यूट्यूब वर सुमारे १,००,००० व्हिडिओ पाहिले जातात.

गुगल शोध – गुगल सर्च प्रति सेकंद

प्रत्येक सेकंदात गुगल वर ६०,००० हून अधिक गुगल सर्च केले जातात.

फेसबुक – फेसबुक प्रति सेकंद नोंदणी

प्रत्येक सेकंदाला फेसबुक वर ५०,००० पेक्षा जास्त नोंदणी केल्या जातात.

ट्विटर – प्रति सेकंद ट्विटर ट्वीट्स

ट्विटरवर सुमारे १०,००० ट्वीट केले जातात.

इंटरनेट रहदारी – इंटरनेट ट्रॅफिक प्रति सेकंद

प्रत्येक सेकंदात इंटरनेटवरील सुमारे २७,००० जीबी वाहतूक होते.

इनस्टाग्रम – इनस्टाग्रम फोटो प्रति सेकंद

प्रत्येक सेकंदात २००० हून अधिक फोटो इनस्टाग्रम वर अपलोड केले जातात.

प्रति सेकंद टंबलर पोस्ट

प्रत्येक सेकंदात १८०० पेक्षा अधिक टंम्बल पोस्ट केले जातात.

स्काईप – स्काईप कॉल्स प्रति सेकंद

दर सेकंदास सुमारे १९०० स्काईप कॉल्स केले जातात.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment