Social Quotes in Marathi | Samajik Marathi Suvichar | सामाजिक मराठी सुविचार

फक्त “माणसांना” समजते ते
झाडे तोडणार्या / जाळणारया “जनावरांना” नाही।

वृक्षांची गरज ओळखा वृक्ष लावा व संवर्धन करा!!!

झाडे लावा झाडे जगवा!!

झाडासारखे जगा खुप उंच व्हा ….
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका

ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत
त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही

शेतकरी जगाला तरच तुम्ही,
आम्ही आणि देश जगेल

प्रत्येक प्राणिमात्राचा या पृथ्वीवर तेवढाच हक्क आहे
जेवढा तुमचा आणि माझा आहे

जगातला एक माणूस असा आहे जो तास,
सुट्टीचे दिवस न बघता आपल्यासाठी राबत असतो
तो म्हणजे आपला शेतकरी राजा!!

देवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला,
माझ्या प्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल?
मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला

आज तुम्ही झाडाच्या सावलीत बसले आहात
याचा अर्थ कोणी फार वर्षापूर्वी हे झाड रुजवलय.

कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवायचा प्रयत्न करा…..
ते म्हणजे नाव आणि इज्जत

मुलीला बाहेर एकटीला फिरण्यास प्रतिबंध करण्यापेक्षा,
मुलाला स्त्रीचा आदर करायला शिकवत ते खर सुसंकृत घर !!!!

कोणीही पाहत नसताना
आपले काम इमानदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा.

संस्कृती म्हणजे
आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय.

शिक्षण हे जीवनासाठी तयारी नाही…
तर शिक्षण हेच स्वतः जीवन आहे.

“शिक्षण आपले जग बदलू शकते जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.”
शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य – सोनेरी दार अनलॉक करण्याची गुरुकिल्ली.

स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंताची माता आहे.

चांगली वस्तु, चांगली व्यक्ति,
चांगले दिवस यांची किंमत निघुन गेल्यावर समजते.
प्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड़ शब्द,
हे वैभव ज्याच्या जवळ आहे, तोच खरा श्रीमंत… ..

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात..

रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले
तर प्रार्थना केली नाही तरी चालेल
पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल
तर प्रार्थना जरुर करा….
कदाचित कोणचे प्राण वाचतील

तुम्ही तुमच्या मुलांना सद्गुणी बनवा
हे गुणच त्यांना आनंदी करू शकतात सोने किंवा संपत्ती नाही.

जगावे ते हसून-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते.

जर झाडांनी “ऑक्सिजन” ऐवजी “वायफाय” दिला असता तर…
.
.
प्रत्येकाने किमान एक तरी झाड़ लावले असते..

जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता..
कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता..

आई, वडील, गुरु यांचा नेहमी आदर करावा

तीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे,
1 व्यसन, 2 जुगार आणि3 चोरी

कर्तव्य, कर्ज, उपकार तीन गोष्टींच
कधीच विस्मरण होऊ देऊ नये.

मातीत मरणारे तर अनेक असतात,
पण मातीसाठी मरणारे फक्त मराठेच असतात……….!!!

माणूस स्वतःहून चुकीचा वागत नाही.
परिस्थिती त्याला तसे वागायला भाग पाडते.

माणसासाठी पैसा बनला आहे…
पैश्यासाठी माणूस नाही…

“माणुस” स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे…,
लोकांच काय लोक “चुका” तर “देवात” पण काढतात।!!!

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा

संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

जेवण करताना हि प्रार्थना नक्की करा कि
ज्यांच्या शेतातुन माझ जेवण येत त्यांची मुले कधीही उपाशी झोपू नयेत

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.