Benefits of eating Walnut / Akroad in Marathi | अक्रोड खाण्याचे आयुर्वेदिक फायदे

अक्रोड आणि अक्रोड चा तेल आपल्या साठी खूप फायदेमंद आहे. अक्रोड ला इंग्लिश मध्ये walnut म्हणतात. अक्रोड हे एक ड्राय फ्रुट(सुका मेवा) आहे. अक्रोड हा आपल्या मेंदूसाठी खूप लाभदायी असतो, म्हणून अक्रोड ला ब्रेन फूड म्हणतात. यामुळे आपल्या मेंदूची शक्ती वाढायला मदत मिळते.

हा एक स्वास्थ वर्धक पदार्थ आहे. अक्रोड चा उपयोग चॉकलेट, कुकीज, लाडू, मिल्क शेक इत्यादीं मध्ये केला जातो. लहान मुलांना खास करून अक्रोड खायला दिले जाते, कारण हे मेंदू व शरीरासाठी खूप फायदेमंद आहे.

अक्रोड व अक्रोड च्या तेलाचा उपयोगामुळे केस लांब, दाट आणि काळे होण्यास मदत होते. यामुळे आपली त्वचा स्वस्थ व कोमल बनते आणि अजून अनेक प्रकारे अक्रोड आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. तज्ञांच्या नुसार हे एक ड्राय फ्रुट असून देखील याच्यात खूप कमी मात्रेत सोडियम असते, तसेच कोलेस्ट्रोल चे प्रमाण देखील कमी असते. या मध्ये भरपूर मात्रेत omega-3 fatty acid असतात. हे शरीरासाठी खूप फायदेमंद असतात.

अक्रोड मध्ये खूप प्रकारचे विटामिन असतात जसे कि विटामिन A, विटामिन B, विटामिन c, विटामिन B12, विटामिन D म्हणून याला विटामीन चा राजा म्हणतात. अक्रोड मध्ये खूप मात्रेत प्रोटीन असते तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयन, फॉंस्फरस, कॉपर, सेलेनियम अधिक मात्रेत असतात. अक्रोड मध्ये एन्टीऑक्सिडेंत तत्व व nutrients भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात.

akrod1 Marathi varsa

अक्रोडचे सेवन सकाळी संध्याकाळी केल्याने आपल्याला अनेक प्रकारच्या विकारांपासून मुक्ती मिळते. अक्रोड आपल्या मेंदूसाठी खूप फायदेमंद असतात. अक्रोड हा जवळ जवळ आपल्या मेंदुसारखाच दिसतो. अक्रोड खाण्यामुळे आपला बौदधिक पातळी (IQ) वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते ज्यामुळे ताण तणाव कमी होतो व आपली स्मरण शक्ती वाढते. अक्रोड मध्ये शक्तिशाली न्युरो प्रोटेक्टीव कंपाऊंड सारखे विटामिन E, मेल्यानीन, omega-3 fatty acid आणि एन्टी ऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे आपल्या मेंदूला सुरक्षा मिळते तसेच आपण तंदुरुस्त राहतो.

अक्रोड हे सगळ्यांसाठी लाभदायक असतो, हे आपल्या मेंदूसाठी च लाभदायक आहे असे नाही. अक्रोड हे आपल्या हृदयासाठी देखील लाभदायक आहे. यामुळे आपले हृदय निरोगी राहते व आपल्या हृदया संबंधी आजार बरे करायला मदत मिळते. म्हणून अक्रोड चा सेवन करायला सुरवात करा कारण अक्रोड च्या सेवना मुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रोल (चरबी ) कमी होण्यास मदत होते. कोलेस्ट्रोल ची मात्रा नियंत्रणात राहते व त्यामुळे आपल्या हृदयाला खूप फायदा होतो. अक्रोड मध्ये उपलब्ध असलेले omega 3 fatty acid, अल्फा लिनोलेनिक एसिड असतो यामुळे आपला हृदय स्वस्थ रूपाने चालतो आणि यामुळे रक्त संचार चांगल्या प्रकारे होतो. अक्रोड मुळे पुरुषांची शुक्राणूंची कमतरता सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते . कारण अक्रोडला आयुर्वेदात एक शक्तिशाली काम उत्तेजना वाढवणारा पदार्थ मानला जातो. यामुळे पुरुषाला मर्दानी शक्ती मिळते. त्यांची सेक्स करण्याची क्षमता वाढते आणि अक्रोड च्या सेवनामुळे शुक्राणूंची गती आणि त्यांची गुणवत्ता वाढते. वीर्य देखील जाड होतो. जर आपल्याला अशी कोणती समस्या असेल तर आपल्याला अक्रोड प्रतिदिन मधा सोबत रोज गरम दुधात मिळवून एक महिन्यासाठी घ्या. यामुळे आपल्याला चमत्कारी फायदे होतील आपली सेक्स शक्ती वाढेल. अक्रोड मुळे आपला मधुमेह देखील कंट्रोल मध्ये राहण्यासाठी मदत होते . जर आपण रोज अक्रोड चे सेवन करत असाल तर आपला डायबेटीज नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. आपला वाढलेला वजन देखील कमी होण्यास मदत होईल.

अक्रोडला एक एन्टी कॅन्सर फूड देखील मानला जातो. कारण याच्यात एन्टी ऑक्सिडेंत घटक असतो. अमेरिकेतील एका युनिवर्सिटी च्या नुसार अक्रोड च्या सेवनाने कॅन्सर (कर्करोग) पासून बचाव करण्यास मदत होते. यामुळे प्रोस्टेट व ब्रेस्ट कॅन्सर चा धोका कमी होतो. यामुळे आपला वजन देखील कमी होण्यास मदत होते एवढेच नाही तर ज्यांचा वजन खूप कमी आहे त्यांचा वजन वाढायला देखील मदत होते.

अक्रोड मध्ये फायबर चांगल्या मात्रेत असतो, ज्यामुळे आपली भूक कमी होते व आपल्याला जास्त खाण्यापासून रोखते यामुळे आपले अतिरिक्त वजन वाढत नाही. अक्रोड मध्ये असलेल्या फायबर मुळे आपल्या पोटा संबंधी समस्या जशा की बध्कोष्टता व आंबटपणा कमी होतात. आपल्या पोटाची चांगल्या प्रकारे सफाई होते. यामुळे आपला पोट निरोगी राहतो व आपली पचन शक्ती सुधारते.

अक्रोड च्या सेवनाने आपला बुद्धी तल्लख होते. त्याच बरोबर मानसिक तणाव, अवसाद(Depression) कमी करतो. जर आपल्याला देखील मानसिक रूपाने स्वस्थ आणि तंदुरुस्त व्हायचे असेल, आपली बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर आजपासूनच अक्रोड खायला सुरवात करा. याच्यात उपलब्ध असलेल्या omega 3 fatty acid मुळे आपल्या शरीरात होणारी बेचैनी संपते. उच्च प्रतिसाद, मूड खराब होण्या सारख्या समस्या दूर होतात.

अक्रोड च्या सेवनाने आपण तणाव मुक्त होतो, तणाव मुक्त झाल्यामुळे आपल्याला चांगली झोप लागते. ज्यांना चांगली झोप लागते त्याचा मेंदू तल्लख होतो व शरीराला आराम मिळतो व मेंदूलाही आराम मिळतो, म्हणून रोज झोपण्याच्या आधी दुधासोबत अक्रोड खायला सुरवात करा. अक्रोड च्या सेवनाने आपला शरीर आंतरिक रूपाने मजबूत होतो. कारण याच्यात उपलब्ध असलेले fatty एसिड मुळे आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढून आपल्या हाडांना पर्याप्त मात्रेत कॅल्शियम पुरवतो, ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. कॅल्शियम आपल्या हाडांसाठी खूप फायदेमंद आहे.

अक्रोड ची साल काढून अक्रोड खाऊ नये कारण अक्रोड च्या सालात ९० % एन्टी ऑक्सिडेंत असतात. अक्रोड साला सकट खाल्यामुळे सालातील पोष्टिक तत्व आपल्या शरीराला मिळतात. आणि हे पोष्टिक तत्व आपल्या त्वचेसाठी व केसांसाठी फायदेमंद असतात. अक्रोड मध्ये विटामिन्स, एन्टीऑक्सिडेंत मिनरल, प्रोटीन आणि SECL fatty एसिड असतात जे आपल्या त्वचेची देखभाल करतात. अक्रोड च्या सेवनामुळे आपल्या शरीराचे अंग मजबूत होतात, अक्रोड खाल्यामुळे आपली त्वचा चमकदार होते.

akrod2 Marathi varsa

आपल्या चेहऱ्यावरील मृत त्वचा, काळे डाग आणि सुरकुत्या नाहीश्या होतात ज्यामुळे आपण जास्त काळा पर्यत तंदुरुस्त दिसतो. अक्रोड च्या तेलात मॉइस्चरायझिंग गुणवत्ता असते ज्यामुळे आपली त्वचा शुष्क होत नाही आणि आपली त्वचा कोमल राहते. जर आपण अक्रोड च तेल आपल्या डोळ्यांच्या खाली लावत असाल तर डार्क सर्कल व काळे डाग व स्पॉट दूर होतात.

जर आपल्याला आपली त्वचा चमकदार व गोरी बनवायची असेल तर ४ अक्रोड 2 चमचे ओटमील च्या सोबत दुधाच्या मलईत चागल्या प्रकारे मिळवून याची पेस्ट बनवा आणि याच्यात थोडा ऑलिव तेल मिळवा आणि हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. हि पेस्ट अर्ध्या तासासाठी चेहऱ्यावर लाऊन ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे आपल्या त्वचेत चमक येईल. व आपल्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स दूर होतील.

त्वचे सोबत अक्रोड आपल्या केसांना देखील लांब सडक, दाट आणि मजबूत बनवतो. आजकाल च्या वातावरणात प्रदुषणाची मात्रा खूप वाढली आहे आपली जीवनशैली खराब झाली आहे. आपण केसांसाठी केमिकल युक्त शॅम्पू चा वापर करतो ज्यामुळे आपले केस हे कमकुवत होतात. हि समस्या दूर करण्यासाठी आपण केसांमध्ये अक्रोड च्या तेलाचा वापर करा यामुळे आपले केस दाट, लांब व चमकदार होतील. कारण अक्रोड मध्ये उपलब्ध असलेले पोटिशियम, ओमेगा ३, ६, 9 आणि DFA (डेनियाल फ्याटी एसिड) आपल्या केसांना लांब, सुंदर व दाट बनवतील आणि यामुळे आपली केस गळण्याची समस्या दूर होईल.

अक्रोड चे औषधी गुण

– अक्रोड मध्ये खूप औषधी गुण आहेत जे आपल्या शरीराला सुंदर आणि मजबूत बनवतात.

– शरीरावर ज्या ठिकाणी आपल्याला वेदना, आग होत असेल, आणि सुज आली असेल त्या ठिकाणी अक्रोड च्या सालाचा लेप लावा आपल्याला बरे वाटेल.

akrod3 Marathi varsa

– अक्रोड ची पाने चावल्याने आपल्या दातात होणाऱ्या वेदना कमी होतात.

– रोज अक्रोड खाल्याने शरीरावर होणार्या सफेद डागांची समस्या दूर होते.

– जर आपण प्रतिदिन ५ अक्रोड १५ ते 2० मनुक्यासोबत घेत असाल तर आपली अनिद्रेची समस्या दूर होईल.

– अक्रोड जर रोज खाल्ले तर आपल्या लिव्हर संबंधित समस्या, थायराईड, सांधे दुखी तसेच पिंपल्स, डायबेटीज सारख्या समस्या दूर राहतील. आपण नियमित पणे अक्रोड चे सेवन करा आपल्याला याचा फायदा होईल.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment