ढेकूण चावल्यानंतर तात्काळ काय करावे? How Do You Get Rid of Bed Bugs In Marathi?

घरात एक ढेकूण आला तर काही वेळातच त्यांची संख्या वाढायला फार वेळ लागत नाही. ढेकूण हा एक उपद्रवी कीटक आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस त्यांचा त्रास वाढतो. बेडमध्ये, चादरीमध्ये असणारे ढेकूण चावल्यानंतर कोणत्याही आजाराचा थेट धोका नसला तरीही त्वचेवर जळजळ, खाज जाणवते. एखाद्या व्यक्तीने सतत त्वचेवर खाजवल्याने त्वचेचे नुकसान होते सोबतच काही बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.

ढेकूण चावल्यानंतर काय करावे ?
ढेकूण चावल्यानंतर त्वचेवर जळजळ किंवा लाल चट्टे पाहून घाबरून जाऊ नका. अशावेळेस आईस पॅक (बर्फ) किंवा अ‍ॅन्टी ईच क्रीम, लोशन ती खाज व जळजळ कमी करण्यास मदत करते.

५ नैसर्गिक गोष्टी ज्यामुळे तुम्ही तुमचे घर ढेकुणांपासून वाचवू शकता..
१) निलगिरी
सर्दी-पडशाच्या त्रासाला दूर ठेवण्यासोबतच ढेकूणांचा त्रास टाळण्यासाठीही निलगीरी फायदेशीर आहे. तुम्हांला ढेकूण दिसल्यास त्यावर काही थेंब निगगिरीचे थेंब शिंपडा. यामुळे ढेकूण दूर जातील. सोबतच रोजमेरी, लॅवेंडर यासोबत निलगिरीचे तेल मिसळून त्याचा वापर करू शकता.

२) पुदीना
ढेकूण पुदीनच्या वासाने दूर जातात. त्यांना पुदीन्याचा वास असह्य होतो. तुमच्या अंथरूणाजवळ पुदीन्याची ताजी पाने पसरवून ठेवा. लहान मुलांच्या पाळण्यातही पुदीन्याची पाने ठेवू शकता. पुदीन्याची पाने चुरून त्याचा रस शरीराला लावून झोपल्यानेही ढेकूण तुमच्यापासून लांब राहू शकतात.

३) लॅव्हेंडर ऑइल
पुदीन्याप्रमाणेच लॅव्हेंडरचा वासही ढेकणांना सहन होत नाही. ढेकणांना दूर ठेवण्यासाठी लॅवेंडरच्या पानांचा वापर करा. त्यांना कपड्यांवर घासा. लॅवेंडर परफ्युम शिंपडल्यानेही ढेकूण दूर राहू शकतात

४) कडूलिंबाचे तेल
कडूलिंबामध्ये दाहशामक आणि कीटकनाशक क्षमता आहे. सोबतच कडूलिंबातील अ‍ॅन्टी मायक्रोबायल गुणधर्म घरातील अनेक कीटकांचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतात. थेट ढेकणांवर कडूलिंबाच्या तेलाचा शिकडाव करा. नियमित या प्रयोगामुळे अवघ्या आठवड्याभरात ढेकणांचा त्रास कमी होण्यास मदत होईल. सोबतच कपडे धुतानाही डिटर्जंट पावडरसोबत कडुलिंबाच्या तेलाचा समावेश केल्याने ढेकणाचा त्रास कमी होईल.

५) टी ट्री ऑईल
टी ट्री ऑइलमध्ये अ‍ॅन्टी मायक्रोबियल गुणधर्म असतात. यामुळे ढेकूणांचा त्रास दूर ठेवण्यास मदत होऊ शकते. टी ट्री ऑईल पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे बनवा. या स्प्रेचा वापर करून भिंती, पलंग, कपाटं, पडदे, फर्निचर गाद्यांवर शिंपडा. आठवडाभर जेथे ढेकूणांचा हमखास वावर असतो तेथे टी ट्री ऑईलचा स्प्रे केल्याने ढेकूणांचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

ढेकूणापासून बचावण्यासाठी काय कराल ?
– घरात ओलसरपणा टाळा.
– ढेकणांचा घरात प्रवेश झाला असल्यास नियमित चादरी, उशीची कवर बदला.
– ढेकूणांचं वास्तव्य असू शकेल असा भाग नीट स्वच्छ करा.
– घरात पेस्ट कंट्रोल करा

महत्वाच्या टीप्स :
नवे कपडे, फर्निचर,सोफा घेताना पुरेशी काळजी घ्या. घरात ढेकणांचा प्रवेश होणार नाही याची काळजी घ्या. घरात पुरेशी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. यामुळे आपोआपच ढेकणांचा त्रास कमी करण्यास मदत होते.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment