मुरुम येणे ही एक अशा प्रकारची समस्या आहे ज्याची अनेक कारणे होऊ शकतात. मुरुम त्या लोकांना अधिक होतात ज्यांचे पचन चांगले होत नाही. जे लोक आपल्या स्वतःच्या त्वचेसाठी हानिकारक आणि खराब दर्जाची सौंदर्य उत्पादने वापरतात त्यांना देखील ही समस्या होते. हार्मोन्समध्ये बदल आणि असंतुलन यामुळे देखील ही समस्या उद्भवते. आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या लसानाच्या वापराने आपण सहजपणे या समस्या सोडवू शकता. एलिसिनच्या स्वरूपात लसणात अँटी-बॅक्टीरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म अहेत.या लेखात आम्ही तुम्हाला मुरुमांच्या उपचारात लसून कसे वापरावे ते सांगत आहोत.
१. लसणाची पेस्ट
मुरुमांवर उपचार करण्यासाठी आपण लसणाचा अनेक प्रकारे उपयोग करू शकता, आपण लसणाची थेट पेस्ट बनवून वापर करू शकता. त्यासाठी २ लसणाच्या पाकळ्या घ्या आणि त्याचे चांगले पेस्ट करून १० मिनिटे सोडून द्या. मग हे मिश्रण सक्रिय होईल, व आपण हे पेस्ट सरळ मुरुमांवर लावावे. या पेस्टला १० मिनिटे चेहऱ्यावर सोडून द्या आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा.
२. लसणाचा रस
कच्च्या लसणाचा रस काढून तोंडावर लावा. यासाठी लसणाच्या ५ पाकळ्या घेऊन त्यांना चांगले दळून, पेस्ट तयार करावी. १० मिनटानंतर, कापसाच्या मदतीने मुरुमांवर लावून घ्या. यानंतर १०-१५ मिनिटांनी केवळ पाण्याने चेहरा धुवा, चेहरा धुवताना जास्त घासू नका.
३. लसून आणि हळद
आपल्याला कच्च्या लसणाचा वास आवडत नसल्यास, त्यात हळदीचा रस घाला, ज्यामुळे तो आणखी फायदेशीर होईल. २ लसणाच्या पाकळ्या घ्या आणि त्याचे चांगले पेस्ट तयार करून त्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि चांगले मिक्स करून घ्या. हे पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी चेहरा धुवा.
४. लसून आणि व्हिनेगर
लसून आणि व्हिनेगर एकत्र करून, आपण मुरुमाची समस्या दूर करू शकतो. अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटी- ऑक्सीडंट गुणधर्म असतो जो लसणाबरोबर एकत्र मिसळल्यावर अधिक प्रभावशाली फायदा होतो. एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा साधा पाणी घ्या, लसणाच्या २ पाकळ्यांचे पेस्ट बनवून एक सूती कापड घ्या आणि हे मिश्रण चांगले गाळून काढा. पेस्ट चांगले मिक्स करून मुरुमांवर लावावे आणि १० मिनिटांनी चेहरा धुवावे.
५. लसून आणि कोरफड
कोरफड हे एक प्रकारचे नैसर्गिक मॉइश्चराइजर आहे. लसणाच्या २ पाकळ्या घ्या आणि त्याचे रस काढा. यानंतर, ताज्या कोरफडांच्या पानांतून पल्प काढून लसण्याच्या पेस्टमध्ये टाका. हे पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा धुवा.
६. लसून आणि मध
२ लसणाच्या पाकळ्या घ्या आणि त्याचे चांगले पेस्ट तयार करून त्यामध्ये थोडी मध टाका आणि चांगले मिक्स करून घ्या. मध त्वचेतील नमी राखून ठेवतो. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा.
७. लसून आणि अंडे
अंड्याच्या पांढऱ्या भागाचे चेहऱ्यासाठी अनेक फायदे आहेत. मुरुमांच्या उपचारात देखील हे प्रभावी आहे तसेच त्वचेवरील बंद रोमछिद्रे उघडण्यासाठी देखील कार्य करते. ३-४ लसणाच्या पाकळ्या घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करून त्यामध्ये ४ चमचे अंड्याचा पांढरा बल्क टाका आणि चांगले मिक्स करून घ्या. हे पेस्ट चेहप्यावरे सुकवू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
मला आशा आहे, या लेखामधून तुम्हाला लासनाचा वापर मुरुमांसाठी कसा करावा हे समजले असेल. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!