कार्यालयात जास्त वेळ बसल्यामुळे आरोग्य बिघडू लागल्यास, करा ही चार योगासने

क्विक टिप्स

 • बराच काळ कार्यालयात बसून राहिल्यास आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
 • दररोज योगा करून, आरोग्य चांगले राहते आणि रोगांचा धोका कमी होतो.
 • पादोठानासन, पादसंचालनासन इ. योगासने केल्याने आपण निरोगी राहतो आणि आपल्याला उत्साहपूर्ण वाटते.

आजकाल, कार्यालयाचे काम अशा प्रकारे झाले आहे की खाणे आणि पिणे योग्य वेळेवर होत तर नाहीच परंतु, एखाद्या व्यक्तीला त्याच्या जागेवरून उठायचं असेल तर आधी दहा वेळा तरी विचार करावा लागतो. अशा जीवनशैली मुळे वजन तर वाढतेच पण पाठीच्या कण्यातील वेदना आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आढळतात म्हणून आपण प्रत्येक दिवसातून काही काळ आपल्या आरोग्यासाठी लागू करणे महत्वाचे आहे. आम्ही आपल्याला असे काही सोपे योगासने सांगणार आहेत जे वजन कमी करतील आणि आपल्याला निरोगी राहायला मदत करेल, कारण योगासने करण्याने शरीर लवचिक बनते आणि गुडघ्याची वेदना, पाचक मार्ग, रक्तदाब चांगला राहतो. याशिवाय मानसिक आजार पण दूर राहतात.

१. पादोठानासन

या आसनाच्या अभ्यासाने पाठ आणि त्याच्या खालच्या भागाला मजबूती मिळते, आणि पोटाची चरबी कमी होते. याव्यतिरिक्त, या आसनाने धड आणि कंबरेला ताकत मिळते. तसेच, पोटच्या खालच्या भागात जमलेली चरबीही कमी होते.

 • चटई मांडून त्यावर सरळ झोपावे. असे केल्याने आपल्याला कंबरेमध्ये आराम मिळेल.
 • आपले हाताचे तळवे जामिनिवर खालच्या दिशेने ठेवावे. याच स्थितीमध्ये हाताचा वापर न करता, आपल्या पायांची बोटं शक्य तेवढी डोक्याच्या दिशेने वळवावी.
 • श्वास घेऊन, डावा पाय जमिनीवरच ठेवून उजवा पाय हळूहळू जमिनीवरून शक्य तितका वर उचला. दोन्ही पाय यावेळी सरळ असले पाहिजेत.
 • श्वास सोडून आता उजवा पाय हळूहळू जमिनीवर खाली आणा, आणि आता डावा पाय हळूहळू जमिनीवरून शक्य तितका वर उचला.
 • ही प्रथम फेरी आहे. असे ६-१० वेळा करा.
पादोठानासन योगा
पादोठानासन योगा

२. पादसंचालनासन

हे आसन लठ्ठपणाच्या उपचारासाठी फार प्रभावी आहे. या आसनाच्या अभ्यासाने पाठ, नितंब, पाय, ओठ, पोट आणि ओटीपोट मजबूत राहते.

 • चटई मांडून त्यावर सरळ झोपायचे. आपले हाताचे तळवे जामिनिवर खालच्या दिशेने ठेवावे.
 • साधारणपणे श्वास घ्या आणि आपले दोन्ही पाय हवेत फिरवा; सायकल चालवताना फिरवतात तसे. असे १०-१२ वेळा करा.
 • आता पाय खाली ठेवून शवासनाच्या स्थितीमध्ये या आणि दोन मिनिटे हळूहळू श्वास घ्या.
 • आता आपले दोन्ही पाय वरीलप्रमाणेच उलट्या दिशेने हवेत फिरवा. असे १०-१२ वेळा करा.
पादसंचालनासन योगा
पादसंचालनासन योगा

३. सुप्त पवनमुक्तासन

या आसनाने पोट, लहान आणि मोठे आतडे, यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय आणि ओटीपोटाच्या स्नायूंचे आपोआप मालिश होते.

 • चटई मांडून त्यावर सरळ झोपणे. आपल्या गुधघ्यांपासून पाय दुमडून छाती च्या जवळ आणावे.
 • आपल्या पायांवर हात गुंडाळावे. आपण इच्छुक असल्यास, आता आपण आपले डोळे देखील बंद करू शकता.
 • एक दीर्घ श्वास घ्या. याच स्थितीमध्ये 1 मिनिटासाठी राहा.
 • आता श्वास सोडा आणि आपले डोके इतके वर उचला की आपले नाक गुडघ्यांना स्पर्श करू शकेल. ५ सेकंदांसाठी या स्थितीमध्ये राहा. आता श्वासोच्छवास करताना आपण आपले डोके मागच्या बाजूस नेऊ शकता.
 • या आसनाची ५ वेळा पुनरावृत्ती करा.

४. सुप्त उदर आकर्षण आसन

या आसनाने पोटातले स्नायू ताणतात, तणाव कमी होतो आणि पाठीच्या तणावापासून सुटका होते.

 • चटई मांडून त्यावर सरळ झोपायचे. आपल्या एका हातांची बोटे दूसऱ्या हाताच्या बोटांत गुंतवून आपले हात डोक्याच्या मागे ठेवावे. हाताचे कोपरे जमिनीवर टेकलेले असावेत.
 • आपल्या गुधघ्यांपासून पाय दुमडा व आपल्या दोन्ही पायाची टाच नितंबाजवळ आणा.
 • या स्थितीमध्ये, आपले दोन्ही पाय एकमेकांशी चिकटलेले असतील.
 • आता आपले गुडघे डाव्या बाजूला आणि डोके उजव्या बाजूला फिरवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि या स्थितीमध्ये १ मिनिटासाठी राहा.
 • आता हीच वरील कृती दुसऱ्या बाजूने देखील परत करा.

मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला आमचा हा योगा वरील लेख आवडला असेल. हा लेख तुमच्या मित्रांसोबत शेअर करून आम्हाला प्रतिसाद द्या

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment