शिक्षक आणि विद्यार्थी विनोद | Teacher & Students Jokes in Marathi


सदाशिव पेठेमधला एक ह्रदय हेलावून टाकणारा प्रसंग

गुरुजी ओळखलंत का मला?

हो ओळखलं ना. १९८७ ची तुकडी ना?

.
.
.
.
.
.
.
.
.
३ महिन्याची ट्युशनची फी बाकी आहे तुझी .....

गुरुजी: काय रे बंडु हि @@ कोणाची सही अशी
बंडु: आई चि माझ्या

गुरुजी: अशी सही ?? आई चे नाव काय?
बंडु: जलेबी बाई

बंगळूर मध्ये एका शिक्षकाने वर्गातील
एका मुलाला कानाखाली मारले त्यामुळे त्याला 50,000 रूपये दंड
आकारण्यात आला व तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात आला
.
.
.
आमच्या वेळेला जर असे असते तर

आज माझ्या कडे 2/4 बंगले, 3/4 कार, 10 एकर

शेती चा मी मालक असतो....(इतका मार खाल्लाय राव)

गुरुजी: बंड्या...आज डब्याला काय आणल आहेस.....

बंड्या: गुरुजी.. पुरणपोळी आणली आहे ...

गुरुजि: मला देशील का तुझा डबा .. .मी आज डबा आणला नाही ...

बंड्या: हो देईन....
गुरुजी: पण तुझ्या आईने विचारल्यावर, काय सांगशील.

बंड्या: सांगीन कुत्र्या ने खाल्ला म्हणून

वर्गात मराठीचा तास सुरु होता. प्राध्यापक शब्द शिकवीत होते.

त्यानी एका विद्यार्थ्याला विचारले, "कविता आणि निबंध यातला फरक सांगा..."

"प्रेयसी एक शब्द बोलली तरी ती कविता असते
आणि बायकोचा एकच शब्द म्हणजे निबंध !", विद्यर्थ्यांने उत्तर दिलं.

शिक्षक अजुन विचार करत आहेत ह्याचे लग्न झालेले
नसताना उत्तर बरोबर आल कस... ?

गुरूजी मराठी व्याकरण शिकवत होते.

"मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत:
कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग.
'मी व्हिस्की पितो' किंवा 'मी रम पितो' या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो?'

बंडया: तरतरी प्रयोग..!
गुरूजीनी व्यकरणाची पुस्तके जाळली

शिक्षक गण्याला

शिक्षक: दहा नारळांपैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील.

गण्या: दहा.
शिक्षक: ते कसे?

गण्या: नासलेले नारळ सुद्धा नारळच राहतील.
त्यांचा काय फणस होतील काय मास्तर

शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल?

गण्या : 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठिक आहे.

नाहीतर Staff Room मधे जमा करणार.

नियम म्हणजे नियम

ट्यूशन शिक्षक - अरे गधड्या,
होम वर्क का नही केला तू........?

विद्यार्थी - नीट बोल रताळ्या,
कस्टमरशी असं बोलतात का....?

शिक्षक: बंडू, उठ , मला सांग 57 भागिले 8 किती?

बंडू: 7

शिक्षक: बाकि?

बंडू: बाकि काही नाही, निवांत

शिक्षिका (विद्यार्थ्यास): असा कोणता प्राणी आहे, जो सर्वाधिक अंडी देतो?

विद्यार्थी: मॅडम, आमचे गणिताचे सर,
कारण मला गणिताच्या पेपरात त्यांनी सर्वच पानांवर अंडी दिली.

बंड्याचे आजोबा त्याच्या शाळेत बंड्याला भेटायला जातात.

आजोबा: (शिक्षकांना) जरा बंड्याला बोलवता का?

शिक्षक: अहो, तो तर आज तुमच्या दहाव्याला गेला आहे.

शिक्षक : बंड्या ऊठ. सांग बरं आपल्या देशाचा मृत्यूदर किती आहे?

बंड्या : १०० टक्के.

शिक्षक : कसं काय?

बंड्या : कारण, जो जन्माला येतो तो मरतोच ना.

पेपर मधे प्रश्न होता......शास्त्रिय कारणे द्या.....

डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये.......

एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले.......'
कारण कोण झोपलय ते कळत नाही ' ...मास्तरांनी बदाबदा बडवला.

शिक्षक : तुझे आणि तुझ्या वडिलांचे नाव सांग बघू.

सूर्यप्रकाश: माझे नाव सूर्यप्रकाश असून माझ्या वडिलांचे नाव चंद्रप्रकाश आहे.

शिक्षक: शाब्बास! आता हेच मला इंग्रजीत सांग बघू.
सूर्यप्रकाश: माय नेम इज सनलाइट, अँड फादर नेम इज मूनलाइट.

"कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन।।"

गुरुजी: बंड्या याचा अर्थ सांग?

बंड्या: करमत नसल्यामुळे राधिका रस्त्यावर फिरत असते,
तिला पाहताना मला काय फळ मिळेल!

गुरूजी : आफ्रीकेत आढळणाऱ्या तीन प्राण्याची नावे सांगा?

गण्या : वाघ….
गुरुजी : अजून दोन प्राणी?
.
.
.
.
.
.
.
गण्या : वाघाचे आई आणी वाघाचे बाबा!!!

शिक्षक: तू मोठा झाल्यावर काय करणार?
हऱ्या: लग्न

शिक्षक: नाही, मी असे विचारतोय कि, तू मोठा झाल्यावर काय बनणार?

हऱ्या: नवरदेव!!

शिक्षक: अरे तुझ्या वडिलांची तू मोठा झाल्यावर तुझ्यापासून काय अपेक्षा आहे?

हऱ्या: नातू

शिक्षक: माझ्या देवा! हऱ्या Rocks शिक्षक Shoks

शिक्षिका: मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत जावे.
नारायण, तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?

नाऱ्या: श्रीमतीराम!
शिक्षिका: गाढवा, वडिलांच्य नावामागे श्री.
लावावे व आईच्या नावामागे श्रीमती. समजलं?

नाऱ्या: पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे!

गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात?

पक्या: ३ प्रकारचे....
भूतकाळ
वर्तमानकाळ
भविष्यकाळ

गुरूजी : अरे वा
एक उदाहरण दे पाहू??

पक्या : काल तुमचा मुलीला पाहिलं
आज प्रेम झालं
उद्या पळवुन नेईन....


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment