Police Hawaldar Marathi Jokes | पोलीस हवालदार मराठी विनोद

Police Hawaldar Marathi Jokes | पोलीस हवालदार मराठी विनोद

If you Looking for Police Hawaldar Marathi Jokes then you have come to the right website. In this article we have shared all 100+ Police Hawaldar Marathi Jokes Jokes in Marathi.

मुंबई पोलिस हवालदार

पावती बनाना पड़ेगा रे बाबा…तुझं नाव काय??
What Name…?

फॉरेनर : Wilhelm Voncorgrinzksy Schwerpavacovitz…

हवालदार : दुसरी बार संभालनेका हा…। जाओ अभी… !!!

हसू नकोस., तुला तरी वाचता आलं का?
चल, जाऊ दे


एकदा पोलिस स्टेशन मधे फ़ोन येतो,
” हेल्लो एक emergency आहे लवकर या”

पोलिस: कोण तुम्ही? काय झाले ?
फ़ोन वरुन आवाज येतो, “अहो घरात मांजर शिरलय”

पोलिस (चिडून): मांजर शिरलय ही emergency होऊ शकते का?
फ़ोन वरुन आवाज येतो, “मी पोपट बोलतोय, घरात मी एकटाच आहे”


हवालदार: बाई, तुमची कमाल आहे.
न घाबरता तुम्ही त्या चोराच्या मुस्कटात मारलीत.!!!!!……..

बाई: तो चोर आहे, हे मला नंतर कळ्लं,
मला वाटलं आमचे हेच आहेत..


बंड्या मोटारसायकलवरून भरधाव जात असतो.

पोलिस: नो एंट्रीचा बोर्ड दिसला नाही का तुला?

बंड्या: दिसला साहेब. पण मला वाटले सिनेमाचेच पोस्टर आहे…


हवलदार: साहेब, साहेब काल रात्री सर्व
कैद्यांनी मिळून जेल मध्ये रामायण सादर केले.

इन्स्पेक्टर: वा !! ही तर चांगली गोष्ट
आहे, तू एवढा टेन्शन मध्ये का आलास.

.
.
.
हवलदार: साहेब टेन्शन हे आहे कि हनुमान बनलेला कैदी
अजून संजीवनी घेऊन परत नाही आला.


पोलीस इन्स्पेक्टर: हवालदार रेडे, तुम्ही चोर पकडला का?

हवालदार: नाही साहेब, पण त्याची निशाणी मिळाली.

इन्स्पेक्टर: काय ती?

हवालदार: त्याच्या बोटांचे ठसे.

इन्स्पेक्टर: कुठे?

हवालदार: माझ्या गालांवर.


एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?..

ट्रॅफिक हवालदार.. सगळय़ा गोष्टी रजनीकांतच करू शकतो की काय?


पोलीस: काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?
बेवडा: प्रवचन ऐकायला!

पोलीस: कोणत्या विषयावर प्रवचन आहे?
बेवडा: दारू पासून होणारे दुष्परिणाम,

पोलीस: एवढ्या रात्री कोण देत प्रवचन
बेवडा: माझी बायको !!!


गंपू, झंपू आणि त्यांचा मित्र बाइकवरून जात असतात,
तेवढय़ात ट्रॅफिक पोलिस त्यांना थांबवण्यासाठी हात दाखवतो.

गंपू: अरे वेडा आहेस का? आधीच 3 बसले आहेत, तू कुठे बसशील.


नवरा: कुठे गेली होतीस??

बायको: रक्तदान करायला…

नवरा: पीत होतीस तो पर्यत ठिक होतं….
आता विकायला पण लागलीस? ..!


जज : बोल, मरण्यापूर्वी तुझी काय इच्छा आहे?

कैदी: मला उद्याच पेपर वाचायचा आहे.

जज: ठीक आहे आपण फाशी उद्यावर ढकलू.
तुझा पेपर वाचून झाला, की मग आपण फाशी देऊ.

कैदी: तसं नाही जजसाहेब. मला माझ्या फाशीची बातमी वाचायची आहे.


ऐक आंधळा माणूस पोलिस मध्ये
भरती होण्यासाठी जातो पोलिस म्हणतात तुझा आम्हाला काय उपयोग
आंधळा सांगतो

उपयोग आहे ना अंधाधुंद फायरिंग साठी….


ट्रैफिक पोलिसांनी कार थांबवली. ‘अभिनंदन, रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू आहे…
तुम्ही सीटबेल्ट लावून गाडी चालवत आहात, म्हणून तुम्हाला ५००० रु.चं बक्षिस मिळतंय.

या रकमेचं तुम्ही काय कराल?’

कार ड्रायव्हर: मी त्यातून माझं ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घेईन.

ड्रायव्हरची आई (मागच्या सीटवरून): त्याचं काही एक ऐकू नका.. दारू पिऊन
तो काय वाट्टेल ते बोलतो…

ड्रायव्हरचे बाबा: मला वाटलंच होतं… चोरीच्या गाडीतून आपण जास्त लांब
जाऊ शकणार नाही…

तेवढ्यात डिकीतून आवाज आला: भाई, आपण बॉर्डर पार केली का???


पोलिस स्टेशनात गण्या: ओ साहेब हे फोटो कुणाचे……

पोलिस: गुंड आहेत ते, त्यांना पकडायचय…………

गण्या: काय साहेब, मग फोटो काढतानीच पकडायचं ना.
काय राव तुम्हीबी…. गण्या अजूनही सुटला नाही …..


पोलीस: तू बंडू चे पैसे चोरले हे मान्य आहे का तुला?

गंपू: नाही त्याने स्वतः च्या हाताने पैसे काढून दिले.

पोलीस: कधी ?

गंपू: जेव्हा मी बंदूक दाखवली तेव्हा


पोलीस: कपडे काढून मारीन तुला?

कैदी: पण सगळी चूक माझी आहे तुम्ही का कपडे काढता..


मुलगा: मला गर्लफ्रेंड भेटत नाही आहे.

पोलीस: कधीपासून

मुलग: लहानपणा पासून


मुलगा: मला वाचवा

पोलीस: काय झाले?

मुलगा: काल एका मुलीला बोललो
दिल चीर के देख इसमे तेरा हि नाम होगा

पोलीस: मग
मुलगा: काल पासून चाकू घेऊन शोधतेय मला


एक पोलिस क्राइम ब्रँचमध्ये फोन करतो
क्राइम ब्रँच
हा…बोला

साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय, एक खुन झालाय…..

इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी घातली…

मग तुम्ही तिला अटक केली का नाही

नाही साहेब

फरशी अजुन वाळली नाही!


एक जोडप चित्रपट पाहायला जाते,
तेथे लहान मुलांना न्यायची परवानगी नसते….

ते जोडपे लहान मुलाला बास्केट मध्ये लपवतात.
वाचमनने त्यांला विचारले : या बास्केट मध्ये काय आहे?

जोडपे: यात लंच आहे….
वाचमन: सांभाळून न्या, डाळ बाहेर सांडत आहे….


एक पती: अहो माझी बायको हरवलीय….
दुकानदार: त्याचा इथे काय संबंध….

हे एक मेडिकल स्टोअर आहे…
तुम्ही पोलिस स्टेशन ला जा….

पती: ओह माफ करा….
आनंदाच्या भारत कुठे जायचं हे सुद्धा समजेना….


एका आजीबाईनी सिग्नल तोडला
आणि भुरकण स्कुटी 🏍वरून निघून गेल्या….

तिकड हवालदार शिटी वाजवून दमले पण आजी काही थांबली नाही….
पुढच्या सिग्नलला हवालदाराने आजीला थांबवले आणि म्हणाला
एवढ्या शिट्ट्या मारतोय मग तुम्ही थांबल्या का नाही…..??

आजी: बाळा शिट्टी वाजल्यावर थांबायच हे वय आहे का माझ….


नवीन वाहतूक चिन्ह…

वाहने सावकाश चालवा समोरून मोबाईलवर व्यस्त असणारे येत आहेत.


एका महिलेची तिसऱ्या वेळेस ड्राइविंग टेस्ट झाली.
तरी ती महिला fail झाली…

कारण…

RTO: वहिनी समजा एका बाजूनं तुमचा सख्खा भाऊ
व एका बाजूनं नवरा आला तर काय माराल?

महिला: नवरा….!

RTO: वहिनी हात जोडून शेवटचं सांगतो की ब्रेक मारायचा आहे ब्रेक…


बरं झालं बोर्डच्या रिझल्ट मध्ये Exit poll नाही ते

नाहीतर घरच्यांनी 3-4 दिवस अगोदर पासुन मारायला सुरूवात केली असती….


आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,
जसे 100 लावल्यावर पोलिस येतात

तसे….100 दिल्यावर जातात पण..


नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment