Friends Jokes in Marathi | मित्र-मैत्रिणींचे मराठी जोक्स

If you Looking for Best Friends Jokes in Marathi then you have come to the right website. In this article we have shared all 350+ Friends Jokes in Marathi.

खोटं बोलायला पण काही लिमिट असते….
काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईन वर फोन केला तर तो म्हणतो,
“अरे यार, थोडा वेळाने फोन कर मी आता गाडी चालवतोय…..” 😀


दोन मुके उ..उ..उ करत एकमेकांशी बोलत होते.
.
.
मला त्यांची दया येणार तेवढ्यात,.
.
हरामखोरांनी गुटखा थुंकून बोलायला सुरवात केली. 😀

Marathi jokes android app
Marathi jokes android app

एक वेळेस हरवलेले प्रेम परत मिळेल पण,
.
.
.
मित्राला दिलेला गॉगल कधीच परत मिळत नाही..

आखिल भारतीय पाच मिनिटात परत देतो संघटना !!! 😀


मन्या : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना,
आणि आज एकदम मूडमध्ये?

गणु: काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत

मनू: मग आज मूड ऑन कसा

गणू: आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय. 😀


प्रेमाने बघाल तर कचरा पण सुंदर दिसेल…
.
.
.
.
फ़क्त नजर डूकराची पाहिजे.. 😀


ज्या दिवशी रिक्षा मधे बसून लिपस्टिक सहजपणे लावता येईल

त्या दिवशी शहरातील सर्व खड्डे 😠 बुजले आहेत म्हणून समजावे….

एका संतप्त बाई ची प्रतिक्रिया

.
.
.
पुरुषांसाठीपण सेम…….फक्त लिपस्टिक हा शब्द वगळावा


एका गरोदर बाईला बघुन ..

.
.
दोन पैकी एक मैत्रीन म्हनाली, बिल्डींग तयार झालेय….
.
दुसरी बोलली, लोक रहायला पण आलेत….
.
ते ऐकुन गरोदर महीला म्हनाली..
.
इंजिनीयर घरचाच आहे, पाठवुन देऊ तुमच्याकडे…..सध्या रीकामाच आहे….


राहुल: डोळा का सूजला ?

अमित: काल बायकोचा वाढदिवस होता. केक आणला होता.
राहुल: पण डोळा का सूजला?

अमित: बायकोचे नाव कृती आहे. पण त्याने त्यावर लिहिले….
“Happy Birthday Kutri”


आत्ता like ,Comment सुद्धा
लग्नाच्या आहेरा प्रमाणे झाली आहे..

तु दिली तरच मी देणार…


आमचा निम्मा वेळ क्रिकेट खेळताना हरवलेला बॉल सापडण्यात जायचा नाहीतर

आम्हीपन टीम इंडियात सिलेक्ट झालो असतो.


पर्श्या ने कधीच गुटखा नाही खाल्ला…
.
.
तरी पण तो सल्या आणि लंगड्याच्या आधि मेला

Moral: प्रेम is खरतनाक than गुटखा


लोक म्हणतात कि एक दिवस दारू पिल्याने सतत सवय लागते.
एकदम चूक

आम्ही लहान पणा पासून अभ्यास करतोय

लागली का सवय ?

याला म्हणतात Control.


आजकाल मावा खाणारी पोरं अन
सेल्फी काढणाऱ्या पोरी

दोघं बी सेम तोंड करतात राव…


काही कळत नाही राव.

पगारवाढ मागितली की बॉस म्हणतो “तू काय काम करतोस “;

आणि रजा मागितली की म्हणतो “तुझं काम कोण करणार ”


परिक्षा हॉल..

Mangya: २ रा प्रश्नाचे उत्तर दाखव
Barkya: नाही लिहले

Mangya: ३ रा
Barkya: नाही

Mangya: ४, ५, ६,
Barkya: नाही,नाही,नाही.

Mangya: तु फक्त पास तर हो रे..
तुला मारला कसा ते सावधान इंडिया मध्ये दाखवतील.


बेरोजगारी

पहिला मित्र: अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस,
आपली पोरं अभ्यासात जरी कमजोर असले
.
.
.
.
तरी पण स्पीड ब्रेकर जिथुन तुटलाय तिथुन

गाडी 80 नी कशी काढायची याचे टॅलेँट अंगात ठासुन भरलय……!


शाळा आमची छान होती…. लास्ट बेंचेवर आमची
.
.
सगळी वाया गेलेली GANG होती…❤


एक मुलगी होती
.
बीना तिचं नाव होतं
.
ती खूप हुशार होती
.
ती दाता ची डॉकटर झाली
.
तिने दवाखाना टाकला आणि दवाखान्याला हौसेने स्वतःचं नाव दिलं
.

“बिना दातांचा दवाखाना”


काय सांगू मित्रांनो??

काल एका मुलीँला मस्करीत म्हणालो..
“दिल चीर के देख, तेरा हि नाम होगा”
:
:
:
कालपासून.. चाकू घेऊन मागे लागलीये..!!!
येडी.. रताळी..


*थंडी* सुरु झाली आहे
दोन महिन्यात *बॉडी* होईल,

असे ठरवुन *जिम* लावणाऱ्या
सर्व *मित्रांना शुभेच्छा….!*


फक्त एकदा girlfriend भेटू द्या रे…….

पार्टी तर लहान पोर देतात…. तुमचा भाऊ…..

भंडारा ठेवणार भंडारा…..!!!


बंड्या: १४ फेब्रुवारीला काय हाय बे?

पिंट्या: तुला बायको किंवा गलफ्रेंड हाय?
बंड्या: दोनीबी नाय.

पिंट्या: मंग हनुमान जयंती हाय.
अखिल भारतीय खुलता कळी खुलेना आमच कुठेच जुळेना संघटना

लागिरं झालं जी


जाताना चोरासारख जाणे…
आणि
येताना वाघासारख येणे
.
.
यालाच म्हणतात
.
.
.
हागुण येणे


रुम‬ वर राहणारे मुले भांडी तो पर्यंत धूत नाहीत .
.
.
.
जो पर्यंत ‪चहा‬ कढईत बनवायची वेळ येत नाही


ठरवलं होत की पायलट बनायच…………….
.
.
.
.
पण Airforce वरून Manforce वर लक्ष कसं गेल कळालच नाही
पण स्वप्न तेच निस्त उडायच…!!!


मित्र आणी खरा मित्र यातिल फरक

मित्र तो, जो जेल मधुन आपली जमानत करेल .. आणी खरा

मित्र तो. जो जेलमधे आपल्या बाजुला बसलेला असेल आणी

म्हणेल – काय सॉलिड धुतला रे त्याला आपण…


मित्र आणि परममित्र यामध्ये काय फरक आहे?

हायवेवर बाइक वरून जाताना…

मित्र: अरे हळू चालव पडू आपण

परममित्र: अबे पळव जोरात….
समोरच्या स्कोर्पिओ मधली पोरगी लाइन देतेय…


एक मुलगा देवाला विचारतो,

‘तिला गुलाबाचं फूल का आवडतं???
ते तर एका दिवसात मरून जातं….!
मग तिला मी का आवडत नाही ???
मी तर तिच्यासाठी रोज मरत
असतो…….!
‘देव उत्तर देतात,
.
.
.
‘भारी रे….!एक नंबर….!….फेसबुक वर टाक पटकन


नितेश: अरे सतीश, हे आंब्याचे झाड बोलू लागले तर काय मज्जा येईल ना !

मितेश: मजाच येईल !
कारण, ते बोलू लागल्यावर प्रथम तुला सांगेल, की मी वडाचे झाड आहे.


एकदा टीना आणि काव्या बाहेर हॉटेलमध्ये सामोसा खात असतात.

काव्या: अगं टीना, तू सामोस्यामधील भाजीच का खात आहेस?

टीना: कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये.


ज्योतिषी: तुझे नाव झंप्या आहे?
झंप्या: हो..

ज्योतिषी: तुला एक मुलगा आहे?
झंप्या: हो.. ज्योतिषी महाराज

ज्योतिषी: तू आत्ताच पाच किलो गहू घेतले.
झंप्या: तुम्ही अंतर्यामी आहात महाराज.

ज्योतिषी: मुर्खा, पुढच्या वेळी येताना पत्रिका घेऊन ये. रेशनकार्ड नको!


आंटी: अरे तू लग्न कधी करणार आहेस ?

मी: मला एक मोठा भाई आहे …आधी त्याचे होऊ दे मग मी करणार

आंटी: अरे पण तुला तर एकपण भाई नाहीये

मी: सलमान भाई


लहानपन: मोठा झाल्यावर मी डॉक्टर होईल,पायलट होईल,किंवा इंजिनीअर होईल….

.
.
तरुणपण: आरे त्या ZP च्या शिपायाच्या जागा निघाल्या की सांग..!!!


गण्या: अरे मित्रा ” अरेंज मॅरेज ” म्हणजे काय ?

बंड्या: सोप्प आहे रे , समज… तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..

गण्या: ठीक आहे …आणी ” लव मॅरेज ” म्हणजे काय ?

लव मॅरेज ” म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो”
फूस फूस … चाव ना मला ..चाव ..”


पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते….

बायको (वैतागून): तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय……

पक्क्या: अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते…


मंग्या कानात बाळी घालून फिरत होता,
चंद्या: कानात बाळी? हि नवीन फॅशन तू कधी पासून सुरू केलीस?

मंग्या: अरे बायको माहेरी जाऊन आल्यापासून..
चंद्या: म्हणजे वहीनीनी माहेरून तुझ्यासाठी बाळी आणली की काय?

मंग्या: नाही रे गाढवा !!! ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली,
आता माझीच आहे सांगितलं म्हणून झक मारत घालावी लागतेय..


तुकाराम सखाराम च्या ६० व्या वाढदिवसाला येतो….
तुकाराम: काय रे सख्या, लेका हे केक वर बल्ब का लावलास?
.
.
.
.
सखाराम: अरे ६० मेणबत्या कुठे लावत बसू,
६० Watt चा बल्ब लावून टाकला… नो झिग झिग…


मोनिका: थोड पाणी मिळेल का?
राहुल: पाणी कशाला, लस्सी पी ना मोनिका..

मोनिका पाच ग्लास लस्सी पिते आणि विचारते,
“राहुल, तुझ्याकडे कोणी लस्सी नाही पीत का?”

राहुल: पितात ग सर्व, पण आज लस्सी मध्येपाल पडली होती.
मोनिका रागाने जोरात पेला जमिनीवर फेकते आणि पेला फुटतो.
.
.
राहुल: आई, मोनिकाने प्याला फोडला आता “कुत्रा” दुध कशात पिणार.


झंप्या: माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आतापर्यँत एकाही पोरिला देता आलं नाही..

पोरगी: इतका अवघड आहे का ? विचार, मी सांगते..

झंप्या:
.
.
.
“तुझा फोन नंबर काय? ”


रमेश चा भाऊ सुरेश खूप दिवसांनी घरी येतो…..

रमेश :- दादा, हे बघ मी आपल्या कुत्र्याला मराठी बोलायला शिकवलं…
सुरेश :- गप रे, काहीपण बोलतोस…

रमेश :- अरे हो, तुला पहायचं का?
सुरेश :- दाखव…

रमेश कुत्र्याला म्हणतो, “सांग सुरेश माझा कोण?”
कुत्रा बोलतो, “भाऊ… भाऊ… भाऊ….”


बेरोजगारी

पहिला मित्र: अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस,
गेल्या वर्षीच तर तू 1st क्लास graduate झालास ना ??

रमेश: हळू आवाजात .. अरेमाझे सोड …
जो वडापाव आणि भज्या तळत आहे ना तो CA आहे…..


मुलांबाबत एक प्रेमळ सत्य…
.
.
.
आपली GIRLFRIEND कितीही सुंदर असली तरी
यांचा डोळा नेहमी तिच्या मैत्रिणींवरच असतो…!!!!


कोणाला तरी प्रेमातला विरह जाळून टाकतो

कोणाला तरी प्रेयसीचा नकार विझवून टाकतो

आणि या सगळ्यातून जो वाचतो त्याला

परिक्षेचा आभ्यास मारून टाकतो


एकदा एक सुंदर मुलगी वर्गात येते.!!

सगळी मुले तिच्या मागे वेडी होतात आणि तिच्या वाटेत
जाऊन थांबतात…पण तिचे उत्तर ऐकुण बेशुद्ध पडतात.
.
.
.
ती म्हणते: ओ भाऊ बाजुला व्हा ना झाडू मारायचा आहे…


गंपू: आई… मला आज हरवलेला बॉल सापडला.

आई: कशावरून तो हरवलेला आहे?

गंपू: ती बघ… ती मुलं तिकडं शोधताहेत.


गंपू : तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना? मग पत्र का पाठवलंस?

झंपू : आधी फोनच केला होता. पण एक बाई सारखी सांगत होती,

‘प्लीज ट्राय लेटर’!


गण्या रात्रीच्या जेवणाला पहिल्यांदाच मासे खातो,
जेवण झाले तरी तासभर पाणी पीत नाही
.
.
.
.
कारण त्याला भीती असते, चुकून मासा त्यात पोहायला लागला तर


जर तुम्हाला वाटतंय की तुमचे आई, वडील, शिक्षक, मालक
किंवा BOSS वगेरे खूप कडक आहेत, किंवा तुम्हाला खूप त्रास देतात…

.
.
तर थांबा तुमच लग्न होऊन बायकोला येउद्यात…
तुम्हाला हे सगळी मंडळी प्रचंड आवडतील..!!


झम्प्या एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता?

मुलगी: एम. जी. रोड

झम्प्या: एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता……!!!


खतरनाक प्रपोज

मुलाने मुलीला मारलेला सगळ्यात खतरनाक Propose.. .

.
.
” तुझं नाव आमच्या Ration Card ला लावायचं आहे ”


बंड्या: अरे लग्नानंतर तुझं दारू पिणं वाढलं कसं?
गण्या: काय करणार, माझी अजिबात इच्छा नव्हती. पण बायकोचा आग्रह.
बंड्या: काय सांगतोस काय!
गण्या: मग काय… सकाळ संध्याकाळ तीचं आपलं एकच पालुपद… दारू-सोडा, दारू-सोडा.

मग काय करणार, तिच्या समाधानासाठी दारू-सोडा घेऊन बसावंच लागायचं ना. 😀


मुलगी: (मंदिरात आजुबाजुला बघून)

देवा मला माझ्यासाठी काहीच मागायचे नाहीय… . . . .

फ़क्त.. . . . .

माझ्या आईला चांगला जावई मिळू दे .. 🙂


संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंड सोबत फिरायची लहर येते….
मुलगी: आई खूप डिप्रेस वाटतंय… मी फिरून येऊ का? मला मोकळ्या हवेची गरज

आहे सध्या…..
.
.
आई: जा तू, पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग 9 वाजता घरी सोडायला…


मित्रांनो मला लगेच सांगा.,

मला तुमच्याकडुन एक पर्सनल सजेशन हवय……….
.
.
.
ताजमहाल विकु कि भाड्याने देऊ……?


गम्प्या : आईचे अश्रु आणि प्रेयसिचे अश्रु हयात फरक काय आहे?

झम्प्या : आईचे अश्रु दीरेक्ट हृदयावर परिणाम करतात
आणि प्रेयसिचे दीरेक्ट पाकिटावर….


एक मुलगी शाम्पु आणायला दुकानात जाते.

दुकानदार शाम्पुची बाटली देतो.
ती मुलगी दुकानदाराला पैसे देते आणि म्हणते, “यावर हे जे फ्री आहे ना ते पण द्या ना.”

दुकानदार: यावर काहीही फ्री नाहीये.
मुलगी: खोटं बोलू नका. यावर एवढं मोठ्ठ्या अक्षरात लिहिलंय, “Dandruff FREE.”


जेव्हा एखादा मुलगा म्हणतो,
“या जगात प्रेमापेक्षा कठीण दुसरं काहीच नाही….”

त्याच्या तोंडावर गणिताचं पुस्तक फेकायचं आणि म्हणायचं,
“घे रताळ्या….जरा हा इंटिग्रेशनचा प्रश्न सोडवून दाखव बरं”


मैत्री म्हणजे सुखामध्ये समोरच्याला हात देणं

मैत्री म्हणजे दुःखामध्ये समोरच्याचा हात होणं


सुरेश: नरेश, समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातल मला एक देशिल कां?
नरेश: हो, देईन ना.

सुरेश: समजा तुझ्याकडे पाच पॅंट्स आहेत त्यातली मला एक देशिल कां?
नरेश: हो. का नाही.

सुरेश: समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशिल?
नरेश: नाही.
सुरेश: का नाही ?
.
.
.
.
नरेश: माझ्याकडे खरच आहेत !!!


एकदा नातू आपल्या आजी ला

आजी आपण नेहमी ५ जण राहू न? तुम्ही,मी,आई,बाबा,आणि ताई.
आजी: नाही रे तुझं लग्न झाल्यावर आपण ६ जणं होऊ न.

नातू: मग ताईच लग्न झाल्यावर आपण ५ जणं राहू न परत.
आजी: अरे मग तुला मुलं झाली कि आपण परत ६ जणं होऊ न.

नातू: आजी, मग तू मेल्यावर परत ५ जणं राहतील न.
आजी: चूप बस मेल्या, मुर्दाडा एक कानाखाली देईल झोप चूप चाप….


बाळू: मी आणि माझी बायको २० वर्षांपासून सुखी होतो.

काळू: मग काय झाले??
.
बाळू एकदम गप्प…..
.
काळू: सांगा कि हो….
.
.
बाळू: काय नाय आमच लग्न झाल नंतर…. :


बंडू: एकदा मी संडासला गेलो तर संडासात एक वाघ बसलेला.

पांडू: मग रे ?

बंडू: मग काय …. मी त्याला बोललो, तू करून घे निवांत …. माझी चड्डीतच झालीये !!!


लाईफ पार्टनर बद्दल काय अपेक्षा आहेत तुझ्या??

मुलगी: त्याचा मस्त बंगला असावा…
मुलगा: बर….

मुलगी: बँक मध्ये खूप पैसे असावेत….
मुलगा: बर…..

मुलगी: त्याची चार चाकी गाडी असावी….
मुलगा: बर…

मुलगी: तो एकटा असावा…. म्हणजे आई,
वडील,भाऊ, बहिण नसावा….

मुलगा: अजून काही म्याडम…
मुलगी: मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा….

मुलगा: तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न का करेल भिकमांगे…


मुलगा: जर ती माझी झाली नाही तर मीतिला कोणाचीच होऊ देणार नाही…..!!

.
.
.
मित्र: आणि तुझी झाली तर सर्वांचीहोऊन देशील का ?.


पहिला: मी माझ्या बायकोला महाबळेश्वरला घेऊन चाललोय…..
जाता जाता दरीत ढकलून देतो तिला !!!

दुसरा: सही……मग माझ्या बायकोलाही घेऊन जा…..दे ढकलून तिलासुद्धा.

.
.
.
.
पहिला: महाबळेश्वरहून येताना ढकलली तर चालेल का ???


मंग्या – यार दिनू तु प्रत्येक पँक नंतर खिशातुन
दरवेळेला काय काढुन पाहत आहे?

.
.
.
.
दिनू – बायकोचा फोटो रे, जेव्हा ती सुंदर
दिसेल तेव्हा समजायच मला दारु चढली आहे…


एक मित्र आपल्या पिकनिकसाठी मित्रांना घेऊन स्मशान घाटावर घेऊन जातो….

सगळे दोस्त: ऐ आम्हाला कुठ घेऊन आलास्?

मित्र: अरे वेडयांनो, “लोक मरतात ” इथं यायला !!!


आधिच आपल्याला Gf नाय…

त्यात Velentine day चे msg जखमेवर मिठ चोळु नका…
लय पाप लागतील..


जोकचा बाप

तीन मित्र बोलत असतात…
पहिला मित्र: माझ्या बायकोन जुडवा पिच्चर बगीतला आणी तिला जुडवा पोर झाली…
दूसरा मित्र: व्हय माझ्यापण बायकोन 3 इडीयट बगीतला तिला 3 पोर झाल्यात…

हे ऐकूण तीसरा मित्र पळत सुटतो….
बाकीचे दोघे : अरे कुट पळतोयस

तिसरा मित्रः आमची खुळी अब तक छप्पन बघायला गेलीये.


जीवन अनमोल आहे

प्रेमाच्या लफडयात पडून आपला वेळ वाया घालवू नका
तुमच्या करिअर वर लक्ष द्या
.
.
.
.
प्रेम आणि गर्ल friend 👩ची जबाबदारी सांभाळायला आहे ना मी
विषय गंभीर तर मी खंबीर


मित्राला भेटण्यासाठी हॉस्पिटल मध्ये गेलो तर तो म्हणतो…

दर्द दिलो के कम हो जाते
.
.
अगर…
.
.
सफरचंद के बदले गाय छाप ले आते


मोदी सरकार चा नवीन नियम

ज्याला 2-3 girl friend आहेत त्याची पण चौकशी होणार

एक त्याला ठेऊन इतर गोरगरिबांना वाटनार म्हणे


काल एक दृश्य बघून फार चिंता वाटली…

आपण हळू हळू आपल्या काही गोष्टी विसरत चाललोय…

काल एका मुलाने ice-cream चा कप घेतला
आणि त्याच झाकण न चाटताच फेकून दिलं….!!


हे बघ भाऊ

बांग्लादेश बरोबरची मैच आम्हीक़ मुद्दामहुन शेवटपर्यंत नेतो
कारण आमच्या पोराना बांग्लादेशच्या आइटम बघायाच्या असतात…

#फ़ाळणीत आम्ही काय गमवल


गणपतराव: काय हो वसंतराव, तुमच्या सौ. सकाळी सकाळी तंबोरा घेऊन कुठे गेल्या?

वसंतराव: सेन्ट्रल जेलमध्ये! तिच्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना.

गणपतराव: अस्सं होय, सरकारने कैद्यांची शिक्षा आणखी कडक केलीये तर…!


खड्यात पडलं की थोडं लागतं आणि

प्रेमात पडलं की घोडं लागतं.


हा मे महिना मोठा विचित्र आहे…
कोणी बायको माहेरी गेली म्हणून खुश आहे

तर कोणी आपलं जुनं प्रकरण परत गल्लीत माहेरी आलं म्हणून खुश आहे..!


*शारीरिक आणि आर्थिक प्रगती* करण्यासाठी

पहाटेचे मित्र वाढवा
आणि
रात्रीचे मित्र कमी करा

असे उपदेशाचे डोस ऐकल्यावर आम्ही निर्णय घेतला की,
.
.
.
.

रात्रीच्या मित्रांसोबत पहाटेपर्यंत बसायचं


गण्याने फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं~

“शुक्र करो, की मेरी कोई मुमताज नही..

वरना,
हर गली मे एक~एक ताजमहल होता..”

त्यावर बाळ्याची कॉमेंट आली~ “घरात संडास बांध आधी”


मुलगी रोमांटिक मूड मध्ये:-
जानू माझ्या साठी एखादी पोएम म्हण ना
.
.
.
.
मुलगा:- गोरी गोरी पान फुला सारखी छान,
समोरच्य टपरितुंन मला एक गायछाप आण…


दिवसा ढवळ्या आपलं घर फोडलं तरि शेजाऱ्यांना पत्ता नसतो.

पण एके दिवशी एखादी आयटम घरी आणा, आख्या गावाला माहिती पडतंय


एखादा मुलगा कितीही व्यस्त असला तरी,
.
.
.
.
थोडा वेळ काढून समोर येणाऱ्या मुलीकडे पाहतोच

#यालाच माणुसकी म्हणतात


च्या मायला आज-काल बऱ्याच पोरांच्या 🏍गाड्यांवर
पोरी फिरताना दिसतात…..​

आणी आमच्या गाड्यांवर….

कधी पेंडीच पोत..
कधी खताच पोत…
तर कधी गवताच वझ ..
हान कीक… उडीव धुराळा


डिगरी तर आपल्याला कोणत्याही काँलेज मध्ये मिळेल…

मात्र ज्ञान आपल्याला चौकात मित्रांमध्ये उभे राहुनच मिळेल.:D


भाउ राजनीती म्हणजे काय असतय?

राजनीती म्हणजे,
कोंग्रेसचा कुर्ता
भाजपा ने धुवायचा
शिवसेनेने वाळवायचा,
मनसे ने इस्त्री करायचा आणि…..

पवार साहेबानी घालायचा.:D


पूर्वी लोक कमी आजारी पडत मुख्य कारण म्हणजे

आधी लोक जेवण घरी करत आणि संडासला बाहेर जात.

आता लोक संडासला घरात आणि जेवायला बाहेर जातात.:D


प्रेमाच्या “क्रिकेट” मध्ये “प्रपोज” नावाचा”बॉल”टाकला..
.
मुलीची “विकेट” पडणार इतक्यात,,
.
मुलीचा बाप “नो बॉल” म्हणाला आणि,
.
.
मुलीचा मोठ्या भावाने “फ्री हिट”चा फायदा घेऊन चोप चोप चोपला:D


एकदा शाळेत बाई मित्रावर निबंध लिहायला सांगतात…

.
.
पण ते पण इंग्लिश मध्येच..
.
.
आपला झंप्या उभा राहतो
.
.
आणि बाईना म्हणतो: “बाई….’फुकनीच्या’ ला इंग्लिश शब्द काय आहे हो..??”:D


जर घरात घुसताना वरांड्यात एखादी नाजुक लेडीज चप्पल दिसली,
तर,

कोणताही माणुस, डोक्यावरचे केस सावरल्या शिवाय आत जात नाही…

संस्कार हो…. आणखी काय 😀


बरं झालं या जगात “श्रीमंती” ही पैशानेच मोजली जातीय,

जर मनाने, प्रेमाने मोजली गेली असती तर माझे नाव
ही कदाचीत स्वीस बँक खातेदारांच्या लिस्ट मध्ये असतं.:D


सबको बता दो आज मै बहुत खुश हूँ
.
.
क्योंकी
.
.
मागच्या वर्षाचे हिवाळ्याचे जॅकेट काढले त्यात 20 रूपये सापडले.:D


परिक्षा पास झाल्यावर्

आई : देवाची कृपा.
सर : माझ्या मेहनतीमूळे.
बाबा : मुलगा कोणाचा आहे
मित्र : चल एक बीयर मारु.
पण ~~~

नापास झाल्यावर्~~
सर : वर्गात लक्ष नाही.
आई :मोबाईलचा परिणाम.
बाबा : आईचे लाड.
मित्र : चल एक बीयर मारु.

सगळे बदलतात पण मित्र बदलत नाहीत.:D


 

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.