Taj Mahal Information in Marathi | Taj Mahal Facts in Marathi

Taj Mahal Information in Marathi | Taj Mahal Facts in Marathi

Taj Mahal Information in Marathi: ताजमहल हे उत्तर प्रदेश राज्यातील आगरा शहरात बांधले गेलेली ऐतिहासिक वास्तु आहे. असे म्हटले जाते की ही वास्तु मुगल बादशाह शाहजहांने 1631 मद्धे त्याची बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ बनवाला होता. 14 व्या मुलाला जन्म देताना मुमताजचा मृत्यू झाला. आजच्या या लेखामधे आम्ही तुम्हाला ताजमहला बद्दल महत्वाची माहिती सांगणार आहोत.

1. तुम्हाला माहिती आहे का ताजमहाल शाहजहां याने बांधला आहे याचा कोणताही योग्य पुरावा अजुन पर्यंत भेटला नाही आहे.

2. ताजमहाल बनवायची सुरवात १६३२ मद्धे झाली होती आणि २२ वर्षानंतर १६५३ मधे ही वास्तु पूर्ण झाली. भारत, फारस आणि तुर्की मधिल कामगारांनी मिळून ताजमहाल बनवला होता.

3. ताजमहालाच्या चारही कोपर्यामद्धे एक-एक मीनार उभी करण्यात आली आहे. या चार मीनार मकबर्याला संतुलन देण्यास मदत करतात. या चार मीनार ४१.६ उंचीच्या असून त्यांना बाहेरच्या बाजूला थोडेसे झुकलेले आहेत जेने करुन भूकंपासारख्या आपदेच्या वेळी हे चारही मीनार ताजमहाल वर न पड़ता बाहेरील बाजूला पडतील.

4. दुसरे विश्व युद्ध,१९७१ मद्धे भारत-पाक युद्धाच्या वेळी ताजमहाल वर हिरव्या रंगाची चादर टाकुन ढाकले गेले होते, जेने करूँ ते दुश्मनांच्या निर्दशनास पडणार नाही.

5. ताजमहाल यमुना नदीच्या काठावर बांधले गेले आहे. कारण ताजमहालाच्या खाली जे लाकुड वापरले गेले आहे त्यासाठी सतत ओलाव्याची गरज असते. आणि हा ओलावा बाजूला असलेल्या यमुना नदिमुले भेटत राहतो.

6. ताजमहल 28 प्रकारच्या मौल्यवान दगडांनी सजविले गेले होते जे वेगवेगळ्या देशांतून आणले गेले होते. परंतु हे मौल्यवान दगड ब्रिटीशांनी काढून घेऊन गेले होते .

7. जेव्हा ताजमहल बांधण्यात आले तेव्हा त्यावर सुमारे तीन कोटी रुपये खर्च झाले होते आणि त्यावेळी चे ३ करोड म्हणजे आजचे 63 अरब 77 करोड़ इतके आहेत .

8. ताजमहल कडे जाणाऱ्या मुख्य मार्गा मध्ये जे कारंजे लावले आहेत ते कोणत्याही पाईपशी जोडलेले नाहीत, तर प्रत्येक कारंज्याच्या खाली एक तांब्याची टाकी बसवली गेली आहे आणि या टाक्या जेव्हा सगळ्या भारतात तेव्हा दबाव निर्माण होऊन एकाच वेळी या टाक्यांमधून पाणी कारंज्यांच्या रूपाने बाहेर पडते.

9. दरवर्षी 40 लाख लोक ताजमहलला बघायला येतात. यापैकी फक्त 70 टक्के भारतीय असतात.

Bibi Ka Maqbara
Bibi Ka Maqbara

10. वर दिलेल्या चित्राचे निरीक्षण करा. हे ताजमहल नसून ‘बीवी का मकबरा’ आहे जे महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे स्थित आहे आणि याला ‘मिनी ताज’ असे सुद्धा बोलले जाते.

11. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ताजमहाल कुतुब मिनार पेक्षा 5 फूट उंच आहे.

12. सकाळी पाहिल्यावर ताजमहालचा रंग बदलतो तो गुलाबी रंगाचा दिसतो, रात्री दुधाळ पांढरा आणि चांदण्या रात्री सोनेरी दिसतो. मात्र वाढत्या प्रदूषणामुळे ताजमहालचा रंग फिकट पिवळा होऊ लागला आहे, त्यामुळे या ताजमहालाच्या आजूबाजूला पेट्रोल आणि डिझेलची वाहने बंद केलेली आहेत.

13. काही हिंदू लोकांनुसार, ताजमहाल हे एक शिवमंदिर आहे ज्याचे खरे नाव तेजोमहालय आहे.

14. ताजमहालाचे टिकेट्स विकून एका वर्षात सुमारे 25 कोटी रुपये कमावले जातात. ताजमहाल बघण्यासाठी भारतीयांना ५० रुपये तर विदेशी नागरिकांना 1100 रुपये द्यावे लागतात.

15. असे म्हणतात की ताजमहाल जेव्हा पूर्ण झाला तेव्हा शहाजहानने सर्व कारागिरांचे आणि कामगारांचे हात कापले होते, जेणेकरून ते जगात ताजमहालसारखा दुसरा महाल कधीही बनवू शकणार नाहीत. मित्रांनो ताजमहाल बांधण्यासाठी 20,000 हून अधिक मजूर कामाला लागले होते, त्याचा घुमट तयार करण्यासाठी 15 वर्षांचा कालावधी लागला होता.

16. ताजमहालच्या बांधकामासाठी 28 प्रकारचे दगड वापरण्यात आले आहेत. हे दगड बगदाद, अफगाणिस्तान, तिबेट, इजिप्त, रशिया, इराण इत्यादी देशांव्यतिरिक्त राजस्थानमधून सुद्धा आयात केले गेले होते.

17. १८५७ मध्ये झालेल्या हल्ल्यात ताजमहालचे थोडेसे नुकसान झाले होते. पण लॉर्ड कर्झनने 1908 मध्ये त्याची पुन्हा दुरुस्ती करून घेतली, कारण तोपर्यंत ताजमहाल पूर्ण जगभर प्रसिद्ध झाले होते?

18. ताजमहालच्या आत, खालच्या मजल्यावर शाहजहान आणि मुमताज बेगम यांची कबर आहे.

तर मित्रांनो तुम्हाला हा Taj Mahal Information in Marathi वर आमचा हा लेख कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला या ब्लॉग मध्ये काही चुकीचे वाटत असेल किव्हा अजून कोणतीही माहिती तुम्हाला या ब्लॉग मध्ये update करायची असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुम्ही दिलेली माहिती पडताळणी करून माच्या या लेखामध्ये update करू.

Information about Russia in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment