If you Looking for Teacher & Students Marathi Jokes then you have come to the right website. In this article we have shared all 400+ Teacher & Students Jokes in Marathi.
सर: सांग रमेश तुझा जन्म कुठे झाला?
रम्या: औरंगाबाद
सर: चल त्याची स्पेलिँग सांग बरं…
रम्या थोडा विचार करतो
आणि म्हणतो “नाही, नाही…. माझा जन्म पुण्यात झाला….”
शिक्षक: “मी तुझा जीव घेईन” याच इंग्रजीत भाषांतर कर….
हऱ्या: इंग्रजी गेलं XXXX…. तू हात तरी लाऊन बघ !
परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण असतो….
चिटीँग पण करता येत नसते.
शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने
परीक्षकाला एक चिठ्ठी दिली.
परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप
आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचारले
यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?
गण्या: “सर, तुमची पँट मागून फाटली आहे….”
सर – किती निर्लज़ज आहेस तु गण्या ?
तु १०० पैकी फक्त ५ गुण मिळवले
आणि तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा??????
. गण्या- सर , मी हसत आहे कारण
उत्तरपञिकेत मी तर पिक्चरच गाण लिहलहोत फक्त,
तर मग हे ५ गुण आले कुठुन.
शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.
विषय होता, ‘आळस म्हणजे काय?’
एका विद्यार्थ्याने चारही पानं कोरी ठेवली आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले.
‘यालाच म्हणतात आळस.’
बाई: काय रे गण्या, Homework नाही केलास?
गण्या: काल रविवार होता, Homework आठवलाच नाही.
बाई: फेसबुकवर online व्हायला बरा टाईम मिळाला तुला.
गण्या:(मनातल्या मनात) च्यायला का चुकून हिच्या फोटोला ‘लाईक’ केलेलं दिसतय वाटत. –
मास्तर: कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे?
विद्यार्थी: सोप्प आहे सर ..,
प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते…आणी शेवट वाइन शॉप मध्ये …
शिक्षक: बादशहा अकबर ने कुठ पर्यंत राज्य केले ?
चिन्टु: पान नं. १७ ते ४२.
शिक्षक- झंप्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..?
.
.
झंप्या: कारण कुणाला कळायला नको
कि माझ्या डोक्यात काय चालले आहे ते…..
एकदा एका शाळे मध्ये गणिताचे मास्तर आणि
इतिहासाचे मास्तर यांचे काही करणा मुळे भांडण होते.
इतिहासाचे मास्तर म्हणतात मी तुज्या अंगावर औरंगजेबाचे सैन्य घालीन.
तर गणिताचे मास्तर म्हणतात की मी तुला आणि त्या औरंगजेबाच्या सैन्याला
कंसा मध्ये टाकून शून्याने गुणाकार करेन.
शिक्षक: त्याने आत्महत्या केली आणि त्याला आत्महत्या करावी लागली,
या दोन वाक्यांना उदाहरण देऊन स्पष्ट करा.
बंड्या: गुरुजी, त्याने आत्महत्या केली कारण, तो सुशिक्षित बेरोजगार होता
आणि त्याला आत्महत्या करावी लागली कारण, तो विवाहित होता.
परीक्षक: मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय?
विधार्थी: मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे सर्फ एक्सेलचा नवीन प्रकार,
ज्याचा वापर कॉम्प्युटर धुण्यासाठी केला जातो .
प्राध्यापक: क्लास सुटायच्या आत हा बाहेर कुठे चाललंय?
विधार्थी: सर, त्याला झोपेत चालायची सवय आहे.
मन्या लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले. “व्हाय आर यू लेट?
“इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, “सर रस्त्यावर चिख्खल झाला होता
आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला.
म्हणून ऊशीर झाला.
“सर पुन्हा ओरडले, “टॉक इन इंग्लिश!”…
हजरजबाबी मन्याने म्हटले,
“सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड.
काऊज हसबण्ड केम…हि मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा.
सो आय कम लेट!
मास्तर : रेडीओ आणि वर्तमान पत्र यात काय फरक आहे ..
.
.
.
.
बंडू (खूप विचार केल्यानंतर ): बघा मास्तर, आपण पेपर मध्ये
म्हणजेच वर्तमान पत्रात चपात्या गुंडाळून घेऊन जाउ शकतो
आणि रेडीओमध्ये तसे नाही करू शकत…
ऐकून मास्तर डायरेक्ट स्वर्गातच रेडीओ घेऊन..
परीक्षेला १५ मार्कासाठी आलेला एक प्रश्न
मुंग्यांना कसे माराल?
उत्तर:
पहिले साखरेला मिरची पावडर लावून मुंग्यांच्या वारुळा पाशी ठेवून द्या
हे खाद्य खाल्यावर मुंग्या पाणी पाणी करत नळावर
जातील आणि ओल्या होतील मग परत सुखण्यासाठी
अगीजवळ जातील, आगीत एक फटका फोडा.. मुंग्या जखमी होतील त्यांना आइ सी यु मध्ये ठेवल्यावर
त्यांच्या तोंडावरील प्राणवायूचा मास्क काढून टाका..
तात्पर्य : १५ मार्कासाठी विद्यार्थी काय पण करू शकतील
गणिताचे सर: एक हजार किलो म्हणजे एक टन,
तर सांगा पाहू बंटी, तीन हजार किलो म्हणजे किती टन?
बंटी : सोप्पाय की सर, टन टन टन!
गणपुले सर: सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?
मंजू: झेब्रा.
गणपुले सर: असं का बरं?
मंजू: कारण तो ब्लॅक अण्ड व्हाईट असतो ना
जीवशास्त्राचे शिक्षक: जर समजा एखाद्या मुलीला अस्थमाच attack आला
तर तिला खूप वेळ आपल्या ओठांनी श्वास द्या.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झंप्या – ते ठीक आहे……….
पण असं काय करायचं की ज्याने मुलीला अस्थमाचा attack येईल?
शिक्षक: तू उदास का आहेस?
विधार्थी: सर , मला प्रश्न पडलाय,
इतक्या मोठ्या आगीतून तुम्ही जिवंत कसे ?
शिक्षक: “बंडू पेपर लिहायचा सोडून कशाचा विचार करतोस.”
बंडू: “कुठल्या प्रश्नाचे उतर कुठल्या खिशात आहे याचा विचार करतोय सर.”
शिक्षक: काय रे हत्ती कुठे सापडतात?
विद्यार्थी: हत्ती हा एवढा प्रचंड प्राणी आहे
की तो हरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
गुरुजी: अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?
बंडू: माहीत नाही.
गुरुजी: अरे असेकाय करतोस……?
पुस्तकामध्ये लिहिले आहे की १५४२ – १६०५
.
.
.
.
.
बंडू : मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे.
पप्पू 5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो..
शिक्षक :- का रे पप्पू …….पेपर मधल काही येत नाही का?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पप्पू – तसं नाही सर…… मला उद्याच्या पेपर
चा अभ्यास करायचा आहे…. म्हणून लवकर चाललोय.
गुरूजी- गण्या,सांग बरे ,प्रेम अन दारू
यामध्ये काय फरक आहे…?
गण्या- सोप्पय गुरूजी….
दारू जास्त झाली तर मुले उल्टी करतात.
अन प्रेम जास्त झाल तर मुली उल्टी करतात…
गुरुजी: तुझा जन्म कोणत्या वारी झाला?
बंड्या :मंगळवारी,
बंड्या :मास्तर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला.
गुरुजी :रविवारी
बंड्या :गप बसा राव मास्तर…रविवारी सुट्टी असती
‘
मास्तर: सांग, ५ – ५ = कीती?.
सगळी मुले शांत…
मास्तर.: सांग बंड्या,जर तुझ्याकडे ५ इडल्या आहेत आणि मी ५ इडल्या खाल्ल्या,
तर तुझ्याकडे काय उरले?
बंड्या: सांबर अणि चटणी
मास्तर: सोन्या सांग कि चंद्रावर पहीले पाऊल कोनी टाकले?
सोन्या: निल आर्मस्ट्राँग
मास्तर: अगदी बरोबर .. आनि दुसरे पाऊल कुनी टाकले..?
सोन्या: तेनच टाकल आसल की ते काय लंगड वाटल व्हय तुमाला ..!
मास्तरनी खडू चाउन खाल्ला….
Madam: काय डोळ वासून? पुढच्याच उत्तर बघतोय
मुलगा :- तुम्हाला कसं कळलं… मी त्याच उत्तर बघतोय?
Madam :- मी माझ्या डोळ्यांनी बघितल?
मुलगा :- तुम्हीच कशाला बघता?
Madam :- मी बघीन ?नाही… तर काय पण करीन?
मुलगा :- मी पन बघीन नाही.तर कायपन करीन?…
तुम्हाला नसेल आवडत तर नका बघू
Madam :- गाढवा? तुला काय मी आर्चि वाटले
.
.
आन पेपर इकडे आणि जा बाहेर …
सोन्या आणि मोन्या दोन भाऊ एकाच वर्गात शिकत होते.
शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांना ऑफिस मध्ये बोलावले.
मुख्याध्यापक: काय रे सोनू मोनू तुम्ही तर दोघे सख्खे भाऊ आहात,
मग पेपर मध्ये वडिलांचे नाव वेगवेगळे का लिहिले?
सोन्या: बस काय सर …. परत तुम्हीच म्हणाला असता
…. कॉपी केली म्हणून
मुख्याध्यापक जागेवर कोसळले.
सर्वात जास्त आनंद केंव्हा होतो
जेंव्हा oral घेणारा म्हणतो
“ROLL NO सांगा आणि जावा.”
आई शप्पथ जग जिंकल्यावाणी वाटत राव.
शाळेत वर्गामध्ये एक मुलगा मॅडमला विचारतो.
मी कसा आहे..?
मॅडम: तू खुप छान आहेस रे
मुलगा: मग मॅडम, तुमच्याकडे बोलणी करायला
मी आई बाबांना कधी पाठवू?
मॅडम: वेडा आहेस का तू?
काय बोलतोयस तू?
मुलगा – अहो मॅडम…..टयुशन्स साठी हो…….!
तुम्ही पण ना.. त्या व्हाट्सएपमुळे चावट झालेल्या दिसताय!!
जर कधी मला school che MATHS चे Teacher भेटले
तर त्यांना एक गोष्ट नक्की विचारेन की,
अर्धी नोकरी संपत आली पण…
तुम्ही जे साईन थीटा / कॉस थीटा शिकवल ते नक्की वापरायचं कधी?
काल बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो.
सुदैवाने काही शिक्षकांची भेट झाली.
मी अतिशय नम्रपणे व दाटलेल्या कंठाने त्यांना म्हणालो…
“आज मी जो काही आहे, तुमच्यामुळे आहे” लगेच दोघेजण म्हणाले …
“हे बघ, तू आम्हाला दोष देउ शकत नाही.
आमच्या परीने आम्ही शक्यते सर्व प्रयत्न केले होते.”
गुरुजी: बंडू खर खर सांग नाहीतर चड्डी काढून मारेन तुला….
बंडू: पण सगळी चूक माझी आहे, तुम्ही का चड्डी काढताय..??
एकदा झंप्याला exam madhye काहिच येत नाही..
तो पेपर मध्ये लिहितो “गाय हमारी माता है, हमे कुछ नही आता है!”
त्या वर सर रीमार्क लिहितात “बैल तुम्हारा बाप है,मार्क देना पाप है!!!!
सदाशिव पेठेमधला एक ह्रदय हेलावून टाकणारा प्रसंग
गुरुजी ओळखलंत का मला?
हो ओळखलं ना. १९८७ ची तुकडी ना?
.
.
.
.
.
.
.
.
.
३ महिन्याची ट्युशनची फी बाकी आहे तुझी …..
गुरुजी: काय रे बंडु हि @@ कोणाची सही अशी
बंडु: आई चि माझ्या
गुरुजी: अशी सही ?? आई चे नाव काय?
बंडु: जलेबी बाई
बंगळूर मध्ये एका शिक्षकाने वर्गातील
एका मुलाला कानाखाली मारले त्यामुळे त्याला 50,000 रूपये दंड
आकारण्यात आला व तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात आला
.
.
.
आमच्या वेळेला जर असे असते तर
आज माझ्या कडे 2/4 बंगले, 3/4 कार, 10 एकर
शेती चा मी मालक असतो….(इतका मार खाल्लाय राव)
गुरुजी: बंड्या…आज डब्याला काय आणल आहेस…..
बंड्या: गुरुजी.. पुरणपोळी आणली आहे …
गुरुजि: मला देशील का तुझा डबा .. .मी आज डबा आणला नाही …
बंड्या: हो देईन….
गुरुजी: पण तुझ्या आईने विचारल्यावर, काय सांगशील.
बंड्या: सांगीन कुत्र्या ने खाल्ला म्हणून
वर्गात मराठीचा तास सुरु होता. प्राध्यापक शब्द शिकवीत होते.
त्यानी एका विद्यार्थ्याला विचारले, “कविता आणि निबंध यातला फरक सांगा…”
“प्रेयसी एक शब्द बोलली तरी ती कविता असते
आणि बायकोचा एकच शब्द म्हणजे निबंध !”, विद्यर्थ्यांने उत्तर दिलं.
शिक्षक अजुन विचार करत आहेत ह्याचे लग्न झालेले
नसताना उत्तर बरोबर आल कस… ?
गुरूजी मराठी व्याकरण शिकवत होते.
“मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत:
कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग.
‘मी व्हिस्की पितो’ किंवा ‘मी रम पितो’ या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो?’
बंडया: तरतरी प्रयोग..!
गुरूजीनी व्यकरणाची पुस्तके जाळली
शिक्षक गण्याला
शिक्षक: दहा नारळांपैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील.
गण्या: दहा.
शिक्षक: ते कसे?
गण्या: नासलेले नारळ सुद्धा नारळच राहतील.
त्यांचा काय फणस होतील काय मास्तर
शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल?
गण्या : 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठिक आहे.
नाहीतर Staff Room मधे जमा करणार.
नियम म्हणजे नियम
ट्यूशन शिक्षक – अरे गधड्या,
होम वर्क का नही केला तू……..?
विद्यार्थी – नीट बोल रताळ्या,
कस्टमरशी असं बोलतात का….?
शिक्षक: बंडू, उठ , मला सांग 57 भागिले 8 किती?
बंडू: 7
शिक्षक: बाकि?
बंडू: बाकि काही नाही, निवांत
शिक्षिका (विद्यार्थ्यास): असा कोणता प्राणी आहे, जो सर्वाधिक अंडी देतो?
विद्यार्थी: मॅडम, आमचे गणिताचे सर,
कारण मला गणिताच्या पेपरात त्यांनी सर्वच पानांवर अंडी दिली.
बंड्याचे आजोबा त्याच्या शाळेत बंड्याला भेटायला जातात.
आजोबा: (शिक्षकांना) जरा बंड्याला बोलवता का?
शिक्षक: अहो, तो तर आज तुमच्या दहाव्याला गेला आहे.
शिक्षक : बंड्या ऊठ. सांग बरं आपल्या देशाचा मृत्यूदर किती आहे?
बंड्या : १०० टक्के.
शिक्षक : कसं काय?
बंड्या : कारण, जो जन्माला येतो तो मरतोच ना.
पेपर मधे प्रश्न होता……शास्त्रिय कारणे द्या…..
डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये…….
एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले…….’
कारण कोण झोपलय ते कळत नाही ‘ …मास्तरांनी बदाबदा बडवला.
शिक्षक : तुझे आणि तुझ्या वडिलांचे नाव सांग बघू.
सूर्यप्रकाश: माझे नाव सूर्यप्रकाश असून माझ्या वडिलांचे नाव चंद्रप्रकाश आहे.
शिक्षक: शाब्बास! आता हेच मला इंग्रजीत सांग बघू.
सूर्यप्रकाश: माय नेम इज सनलाइट, अँड फादर नेम इज मूनलाइट.
“कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन।।”
गुरुजी: बंड्या याचा अर्थ सांग?
बंड्या: करमत नसल्यामुळे राधिका रस्त्यावर फिरत असते,
तिला पाहताना मला काय फळ मिळेल!
शाळेमध्ये शिक्षक लोकसंख्येबद्दल बोलत होते.
शिक्षक: भारतामध्ये प्रत्येक १० सेंकदाला स्त्री एका मुलाला जन्म देते.
बंड्या: आपण त्या स्त्रीला शोधून हे थांबवायला हवे.
शिक्षिका – चिंटू, तुला ५० मार्क देताना मला आनंद होतोय.
चिंटू – मॅडम तुम्ही आपला आनंद द्विगुणित करू शकता.
शिक्षिका- ते कसे?
चिंटू – पूर्ण १०० मार्क देऊन.
शाळेचे तपासनीस एका शाळेवर तपासणीसाठी जातात.
तपासनीस: बाळा तुझे नाव काय?
विद्यार्थी: पांडू.
तपासनीस: अरे बाळा, पांडू नाही, पांडुरंग असे सांगावे.
तपासनीस दुसर्या मुलाला विचारतात,
तपासनीस: आणि बाळा तुझे नाव काय?
दुसरा विद्यार्थी: बंडुरंग.
हेडमास्तर: का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला?
बंड्या: काय करणार बाईक खराब झाली होती सर.
हेडमास्तर: बस ने येता येतं नव्हतं का गधड्या?
बंड्या: मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ
गुरुजी: तुझा जन्म कोणत्या वारी झाला?
बंड्या :मंगळवारी,
बंड्या :मास्तर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला.
गुरुजी :रविवारी
बंड्या :गप बसा राव मास्तर…रविवारी सुट्टी असती.
‘
बाई: कायरे बंड्या आज शाळेत यायला एवढा उशीर का?
बंड्या: गायीला बैलाकडे घेवून गेलो होतो.
बाई: हे काम तुझे बाबा नाही करू शकत का?
बंड्या: करू शकतात पण बैल चांगला करतो.
बाईना चक्कर आली.
गुरुजी: मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड.
बंड्या: लोखंड
गुरुजी: दोघाचंही वजन एक किलोच आहे, मग लोखंड कसं जड?
बंड्या: लोखंडच जड
गुरुजी: अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील.
बंड्या: नाही गुरुजी लोखंडच जड
गुरुजी: गधड्या दोघांचाही वजन सारखाच आहे…
बंड्या: तुम्ही मला एक किलो कापूस फेकून मारा,
मी तुम्हाला एक किलो लोखंड फेकून मारतो मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते
सर: होमवर्क का नाही केले?
मुलगा: सर लार्ईट गेले होते.
सर: मेणबत्ती लावायची मग.
मुलगा: काडीपेटी नव्हती.
सर: का, काय झाली?
मुलगा: देवघरात होती.
सर: घ्यायची मग.
मुलगा: अंघोळ नव्हती केली.
सर: का नाही केली?
मुलगा: पाणी नव्हते.
सर: का?
मुलगा: मोटार चालू होत नव्हती.
सर: का?
मुलगा : आधीच सांगितले ना की लाईट गेलेले म्हणून.
शिक्षक: मुलांनो तिसर विश्वयुद्ध झाल तर काय होईल?
बाळू: सर फार गंभीर परिणाम होतील.
शिक्षक: सांग काय परिणाम होतील ?
बाळू: सर ईतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा जोडला जाईल.
शिक्षक : राजू तु जेवण्यापूर्वी प्रार्थना करतोस का?
राजू : नाही सर, तशी गरज नसते.
माझी आई फार चांगला स्वयंपाक करते.
शिक्षक : बाळू, वर्गात थोड लक्ष देतोस का ?
बाळू : सर, मी शक्य तितक कमीच लक्ष देतोय.
शिक्षिकाः करण तू गृहपाठ का केला नाहीस?
करणः सॉरी, मॅम.
शिक्षिकाः माझ्या शब्दकोशांत सॉरी हा शब्द नाही.
करणः लायब्ररीमधल्या शब्दकोशांत नक्की असेलच
शाळेत English चे lecture चालू असते.
मास्तर _ : गण्या ‘it’ केव्हा वापरतात ?
गण्या _: घर बांधताना !!!!
मैडम :-“काय रे एकटाच का हसतोयस.?
सगळ्या वर्गाला सांग की काय विनोद झाला तो,
म्हणजे आम्ही देखिल त्याचा आस्वाद घेउ..!”
चंप्या: “मैडम हा तुम्ही आल्यावर “माझी आर्ची आली” म्हणाला..!!!
गुरुजी: ती मुलगी सर्व मुलांकडे पाहून हसते
सांग बर झंम्प्या या वाक्यात मुलगी काय आहे?
झंम्प्या: “मुलगी चालू आहे.
शिक्षक: सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे?
हात वर करून बंड्या सांगतो,
‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’
शिक्षक: काय ते?
बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,
पण आताच काही सांगू शकत नाही.
बाबा: काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?
चंदु: हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या…
बाबा: ऑ…मॅडम कशा नापास होतील गाढवा?
चंदु: हो बाबा, त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात.
गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे..
तू परीक्षेला नाही बसू शकत…..
गण्या: फिकीर नाॅट गुरूजी… आपल्याला जराबी घमेंड नाय …
आपून उब्यानेच पेपर लिवू बगा… गुरूजींनी शाळा सोडली…
धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहणारा पोरगा!!!
संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ…… या ओळिचा अर्थ काय ?
बंड्या : तु झोपुन जा आई, मी ज्योती च्या घरी जात आहे….
संस्कृत चे शिक्षक कोमात बंड्या आपला जोमात…
शाळेत मराठीचा क्लास चालू होता.
बाई: हे बघा मुलांनो,
मराठी मध्ये प्रत्येक वाक्याचे २ अर्थ काढता येतात!!
मन्या: बाई काढून दाखवा ना !!!!!
बाई(लाजुन): खाली बस मन्या येडया! तुझ्या या वाक्याचे देखील २ अर्थ निघतात
गुरूजी: बंड्या भारत कधी स्वतंत्र झाला.
.
.
.
.
.
.
.
बंड्या: कवाच…
गुरुजी मुलांवर खुश झाले…
गुरुजी: “मुलांनो जखमेवर मीठ चोळणे” याचं उदाहरण सांगा..
मुलं: पेट्रोल पंपावर मोदींचा हसता फोटो बघणे
गुरुजी: शाब्बास मुलांनो …
शिक्षिकाः- एकीकडे पैसा,
एकीकडे अक्कल, काय निवडाल.
विद्यार्थीः पैसे.
शिक्षिकाः- चूक. मी अक्कल
निवडली असती.
विद्यार्थीः- तुमच बरोबर आहे बाई,
ज्याच्याकडे जे नसतं त्याने तेच घ्यायच असतं ..
आज कालच्या मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवशी
त्यांचे शिक्षक मुलांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत करतात.
.
.
.
.
.
.
.
आणि आमचे एक होते पहिल्या दिवशी कचरा गोळा करायला लावायचे. ‘
मास्तर: दिप्या तू मोठेपणी कोण होणार?
दिप्या: मी खुप श्रीमंत होणार, माझ्याकडे बंगला,
2-3 गाड्या, दिमतिला 10 नोकर असतील. सतत परदेश प्रवास करणार.
मास्तर: बस बस. आता सायली तू सांग. तू मोठेपणी कोण होणार?
सायली: दिप्याची बायको.
मास्तर कोमात. “कार्टी लई आगाव झालीत “
टिचर:- तुझे वडील काय काम करतात….??
मुलगा:- ते K F C चे मालक आहेत..
टिचर :- ओ..हो..मग सांग बरं
KFC चा फुल फॉम….काय..? .
..
…
….
मुलगा:- काळुबाई फरसाणा सेंटर..
गुरुजी: भारताचे 5 ऐतेहासिक वास्तुचे नाव सांग?
बंड्या: ताजमहाल.
गुरुजी: आणि 4 ही सांग..
बंड्या: चार मीनार..
शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा.
“सापाच्या शेपटीवर पाय देणे “
गण्या: बायकोला माहेरी जाण्यापासून रोखणे
शिक्षकांनी गण्याला मिठी मारली.
गुरूजी: सांगा बरे बंडू ….
कडधान्य म्हणजे काय?
बंडू: गुरूजी, शेताच्या कडं कडं नी जे धान्य उगवते.
त्यास कडधान्य असे म्हणतात.
गुरुजी: सांगा बरं भारतात इलेक्ट्रिक वायर एवढ्या उंचीवर का असतात?
गण्या: कारण भारतातील बायका त्यावर पण
कपडे वाळत घालायला कमी करणार नाहीत..
गुरुजी = गण्या, 52 गावांची नावे सांग
गण्या = चाळीस गाव ,आणि बारामती
गुरुंजी राजिनामा देऊन वनवासाला निघुन गेले
विज्ञानाचा तास सुरू असतो.
मास्तर : सांग बर बंड्या साखर आपली सर्वात मोठी शत्रु का असते?
बंड्या: कारण हिंदीत तिला चिनी म्हणतात आणि विरघळली की तिचा पाक होतो.
मास्तर शाळा सोडून अफगानीस्तानला गेले.
टीचर: लिहा दुनिया गोल आहे.
स्टूडंट : तुम्ही सांगता म्हणून लिहितोय
नाहीतर दुनिया “लय हरामखोर ” आहे
हद झाली राव..
. आजकाल ९-१० वी चे मूलं स्टेटस टाकत आहे..
Feeling Love
Heart Broken
. . आम्ही जेव्हा शिकत होतो.
तेव्हा feeling तर दूरची गोष्ट हाय..
.
.
स्वप्नात पन गणिताच मास्तर
हाणताना दिसायच
“शब्दाने शब्द वाढतात म्हणून
आम्ही तोंडी
परिक्षेमध्ये शांत बसायचो…!!”
शिक्षक :- मुलांनो, जगात अशी कोणती गोष्ट आहे.
जी बनवली तर माणसाने आहे, पण तो तिथे जाऊ शकत नाही?
मन्या: सर “लेडीज मुतारी”…..
सरांनी शाळा सोडली…..
गुरुजी: गण्या भारत कधी स्वतंत्र झाला?
गण्या: लई दीस झालं.. तुम्ही काय झोपला व्हता का मास्तर
गुरुजी – काय रे वर्गात डुलक्या देतोयस?
विद्यार्थी – नाही गुरुजी ….
.
.
.
.
.
.
गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतय ..!
गुरुजी पृथ्वी सोडून गेले…..
गुरूजी : आफ्रीकेत आढळणाऱ्या तीन प्राण्याची नावे सांगा?
गण्या : वाघ….
गुरुजी : अजून दोन प्राणी?
.
.
.
.
.
.
.
गण्या : वाघाचे आई आणी वाघाचे बाबा!!!
शिक्षक: तू मोठा झाल्यावर काय करणार?
हऱ्या: लग्न
शिक्षक: नाही, मी असे विचारतोय कि, तू मोठा झाल्यावर काय बनणार?
हऱ्या: नवरदेव!!
शिक्षक: अरे तुझ्या वडिलांची तू मोठा झाल्यावर तुझ्यापासून काय अपेक्षा आहे?
हऱ्या: नातू
शिक्षक: माझ्या देवा! हऱ्या Rocks शिक्षक Shoks
शिक्षिका: मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत जावे.
नारायण, तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?
नाऱ्या: श्रीमतीराम!
शिक्षिका: गाढवा, वडिलांच्य नावामागे श्री.
लावावे व आईच्या नावामागे श्रीमती. समजलं?
नाऱ्या: पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे!
गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात?
पक्या: ३ प्रकारचे….
भूतकाळ
वर्तमानकाळ
भविष्यकाळ
गुरूजी : अरे वा
एक उदाहरण दे पाहू??
पक्या : काल तुमचा मुलीला पाहिलं
आज प्रेम झालं
उद्या पळवुन नेईन….