आपली किंमत ओळखा, हे नकारात्मक लोक तुम्हाला बरबाद करतील
कपड्यांची रंगसंगती जमवल्याने फक्त शरीर सुंदर दिसेल, नाते आणि परिस्थिती यांच्याशी जुळवून घ्याल तर संपूर्ण जीवन सुंदर आहे!
जर लोक तुमच्याविषयी जळत असतील तर लक्षात ठेवा, व्यक्तिमत्व जितके चांगले असेल तेव्हढेच विरोधक आणि शत्रू देखील बनतील, नाहीतर जो वाईट आहे त्याच्याकडे कोणी बघत सुद्धा नाही. दगड देखील त्याच वृक्षावर फेकले जातात ज्या वृक्षाला फळं लगदलेली आहे. कधी बघितले आहे का एखाद्या वाळलेल्या झाडावर दगड मारताना?
मित्रांनो, जीवनात कोणत्याही नात्यात निखरता फक्त चांगल्या काळात हात मिळवून भेटत नाही, तर जेव्हा वेळ खूप वाईट आणि कठीण असतात तेव्हा हृदयापासून हात पकडल्याने येते. जर तुम्ही कोणाचे वाईट करत असाल तर तुमच्या वेळेची देखील वाट बघा. कारण हे सत्य आहे की वेळ प्रत्येकाचा चेहरा कायम लक्षात ठेवते.
मित्रांनो, ज्या मनुष्याच्या संघर्षाच्या काळात जखमा आणि कठिणता जास्त असते तेव्हा समजून जा की संघर्षाचा विजय हा खूप मोठा आणि आलिशान असतो. हा सृष्टीचा नियम आहे की आपल्या नशिबाकडून जितकी जास्त आशा ठेवाल तेव्हढ ते निराश करते. कर्म करण्यात जितका जास्त विश्वास ठेवला तर आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा खूप काही जास्त मिळत जाईल. त्यामुळे कायम कर्मावर विश्वास ठेवा आणि आपले हृदय मोठे ठेवा, लोकांना माफ करत जा परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की धोका देणाऱ्या लोकांवर पुन्हा विश्वास ठेवू नका.
नकारात्मक लोकांना आपल्या जीवनात स्थानच देऊ नका, कारण हे लोक तुमचे जीवन बरबाद करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवत नाहीत. आपली किंमत समजून घेऊन या गोष्टीवर विश्वास ठेवा की या विश्वात तुम्ही खूप महत्वाच्या व्यक्ती आहात. तो व्यक्ती तुमची किंमत कधीच नाही समजून घेणार ज्याच्यासाठी तुम्ही सदैव उपलब्ध असतात. मित्रानो जीवनात तुम्ही जे काही कराल शेवटी तेच तुमच्या सोबत जाणार आहे. परंतु जे काम तुम्ही इतरांसाठी करता ते तुमची आठवण, तुमची देणगी बनून सदैव राहते.
जेव्हा कधी एखाद्या गरजू व्यक्तीचा आवाज तुमच्यापर्यंत येईल तेव्हा त्या परमेश्वराचे आभार माना की त्याने तुमच्याकडे मदत मागितली आहे, मदत घेण्यासाठी तुम्हाला निवडले आहे. नाहीतर तो सर्वांसाठी एकटा पुरेसा आहे.
परमेश्वराच्या समोर मनुष्याची काहीही औकात नाहीये, मनुष्य संपूर्ण जीवनात दोन प्रमाणपत्र स्वतःचे असताना देखील स्वतः घ्यायला जाऊ शकत नाही. जन्माचं प्रमाणपत्र आणि मृत्यूचं प्रमाणपत्र!
मित्रांनो जीवन छोटेसे आहे आणि याचा भरवसा नाहीये की हे कधी संपेल. या कठीण काळात इतरांची मदत नक्की करा. आणि जर तुम्ही कोणाची मदत करण्याचा स्थितीत नाही आहात तर कमीत कमी कोणाचं हृदय तरी दुखावू नका. कोणाला बळ देण्यात, कोणाची हिंमत वाढवण्यात तुमचे पैसे खर्च होणार नाहीत, परंतु हे कोणत्याही व्यक्तीचे जीवन बदलू शकते, कोणत्यातरी मनुष्याचे जीवन देखील वाचवू शकते.
स्वतः देखील हसत रहा आणि दुसऱ्यांचे दुःख देखील वाटून घेण्याचा प्रयत्न करा.