साने गुरुजींचे 30+प्रसिद्ध अनमोल विचार | Sane Guruji Suvichar In Marathi

Sane Guruji Suvichar In Marathiआईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राज राजेश्वरीच्या ऐश्वर्या लाही लाजवील, हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने म्हणजे स्मशानेच होत.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiआजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत, वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही, मुख्य महत्त्व माणुसकीला आहे.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiआपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे, मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiएका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले तरी ते जवळच असतात.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiकरी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiकला म्हणजे परमोच्च ऐक्य.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathi

कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiकीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा हि आजची भाकर आहे.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiजगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व ज्ञान शोधून काढले आहे असे नाही.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiजिकडून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकाता येईल ते आदराने घ्या.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiजुन्या जीर्ण शीर्ण रूढी आज कशा चालतील? लहानपणीचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा होईल?

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiजे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते, असत्य असते ते अदृश्य होते.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे, वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे, ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiज्यांच्या भावना कशानेही हेलावत नाहीत, ती काय माणसे म्हणायची.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiदुसऱ्याला हसणे फार सोपे असते पण दुसऱ्या करिता रडणे फार कठीण असते, त्याला अंत:करण असावे लागते.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्गही लांब व खडतर असतो.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiध्येय सदैव वाढतच असते.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiनिर्बालांना रक्षण देणे हीच बाळाची खरी सफलता होय.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiनिसर्गावर प्रेम करा, निसर्ग आपली माता आहे.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiप्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दु:ख असते दु:ख गिळून आनंदी राहणे हीच खरी माणुसकी.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiप्रेमाचे नाते सर्वात थोर आहे.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiभूतकाळातील काही गोष्टी आता चुकीच्या वाटल्या तर त्या दूर न करणे म्हणजे भूतकाळाचा अपमान आहे. भूतकाळातील भ्रामक गोष्टी जर तशाच पुढे चालवू तर ते उचित नाही. तो भूतकाळाचा गौरव नाही. तो पूर्वजांचा गौरव नाही. उलट त्या थोर पूर्वजांचा अपमान करण्यासारखे आहे.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiभेदावर अभेद हेच औषध आहे.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiमेघ सारे पाणी देवून टाकतात, झाडे फळे देवून टाकतात, फुले सुगंध देवून टाकतात, नद्या ओलावा देवून टाकतात, सुर्य चंद्र प्रकाश देतात जे जे आहे ते ते सर्वांनी मिळून उपभोग घेऊ.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiमोतांच्या हारापेक्षा घामाच्या धरांनीच मनुष्य शोभतो.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiसदाचार हा मनुष्याचा खरा अलंकार आहे.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiसुधारणा करण्याचे अनेक मार्ग असतात.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiसूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी.

– साने गुरुजी


Sane Guruji Suvichar In Marathiहृदयात अपार सेवा भरली कि सर्व मित्रच दिसतात.

– साने गुरुजी


मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment