How to earn money from Google in Marathi | गुगल वरून पैसे कसे कमवतात?

गुगल वरून पैसे कसे कमवतात? | How to earn money from Google in Marathi

How to earn money from Google in Marathi: तुम्हाला देखील जाणून घ्यायचे आहे की गुगल वरून पैसे कसे कमवता येतात? भारतात आज अनेक लोक ऑनलाइन पैसे कमवण्याविषयी जाणून आहेत. लोकांकडे ऑनलाइन पैसे कमविण्यासाठी अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. यामध्ये Freelancing हा सर्वात जास्त चर्चेत असलेला एक मार्ग आहे. परंतु जर मी असे सांगितले की तुम्ही या Freelancing वेबसाईट्स पेक्षा गुगल मधून खूप सहज पैसे कमावू शकता, तर तुम्हाला काय वाटतेय?

तुम्ही विचारात पडला असाल की गुगल वापरून पैसे कसे कमवता येतात? इथे तर आपण काही तरी Search करून त्याचे solution मिळवत असतो. परंतु आम्ही जे सांगितले ते एकदम खरे आहे. गुगल वरून पैसे कमविणे अगदी सोप्पे आहे. गुगल अशा अनेक services देते ज्यांचा वापर करून तुम्ही घरी बसल्या महिन्याला चांगली कमाई करू शकता.

आपल्यापैकी अनेक असे लोक आहेत ज्यांना गुगलच्या त्या बाजूविषयी माहिती नाहीये ज्यातून पैसे कमविले जाऊ शकतात. गुगल विषयी सर्वात मोठी गोष्ट ही आहे की गुगल मधून तुम्ही जेव्हा काम करत नसाल तेव्हा सुद्धा तुमची कमाई होत असते. आता सर्वांच्या मनात हा प्रश्न असेल की गुगल मधून काहीही काम न करता पैसे कसे कमवता येतात? यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो,

समजा तुम्ही स्वतःचा व्यवसाय करता आहात आणि तुम्ही एक दिवस सुट्टीवर गेला तरी देखील तुमची इनकम सुरूच असते. कारण तुम्ही जरी नसला तरी तुमच्या व्यवसायात कामावर असलेले कामगार तर आहेतच. अशाच प्रकारे तुम्ही काही दिवस काम करून सोडून दिले तरी देखील तुम्ही गुगल वरून पैसे कमवू शकतात.

चला तर मग आता गुगल वरून पैसे कमविण्याचे मार्ग देखील जाणून घेऊयात.

गुगल काय आहे? | What is google in Marathi

गुगल शब्द Googol शब्दावरून घेतलेला आहे. ही संयुक्त राष्ट्र अमेरिका येथे स्थित एक मल्टीनॅशनल कम्पनी आहे. गुगल हे एक सर्च इंजिन असून त्याचे मुख्यालय हे माऊंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया इथे आहे. गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. गुगल इंटरनेट वर आधारित अनेक प्रोडक्टस आणि सर्व्हिसेस बनवते. याची सुरुवात स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असलेल्या Larry Page आणि Sergey Brin यांनी 1996 साली केली. त्यांचा हा एक Research Project होता. गुगलचे सध्याचे CEO हे सुंदर पिचाई आहेत.

तुम्हाला देखील माहिती असेल की गुगलच्या कमाईचा सर्वात महत्वाचा सोर्स हा Advertising Program आहे. Google Search Engine चे मुख्य कार्य हे User ने search केलेल्या Query नुसार योग्य तो रिझल्ट दाखविणे आहे. गुगल 40 हुन अधिक भाषांमध्ये Results दाखवत आहे. जर तुम्हाला गुगलच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे याविषयी जाणून घ्यायचे असेल तर ही पोस्ट पूर्ण वाचा.

गुगल मधून पैसे कमविण्याचे मार्ग 2022

तसे बघायला गेलं तर गुगल वरून पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत. यामधील काही मार्ग कदाचित तुम्हाला देखील माहीत असतील. याशिवाय इथे आम्ही त्या सर्व लोकप्रिय पद्धतीविषयी माहिती दिलेली आहे त्याचा वापर करून तुम्ही सहज गुगल वरून पैसे कमवू शकतात.

1. Adsense वापरून पैसे कमवा | Earn money from AdSense in Marathi

AdSense हा एक जाहिरात कार्यक्रम आहे त्याचा वापर करून गुगल तुमच्या blog, websites किंवा YouTube channels वर जाहिराती दाखवत असतो. जेव्हा एखादा वापरकर्ता त्या जाहिरातीवर क्लीक करेल तेव्हा त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काही रक्कम दिली जाईल. जरी कोणी त्या जाहिरातीवर क्लीक नाही केले तरी देखील गुगल जाहिरातीवर Mouse Cursor आल्याने आणि गेल्याने तुम्हाला त्याचे पैसे देते.

Google Adsense हा मार्ग इंटरनेट वरून पैसे कमविण्याच्या सर्वात चांगल्या मार्गांपैकी एक आहे. जगभरातील लाखो लोक या Web Tool चा वापर करून लाखो रुपये कमवत आहेत. सर्वात चांगली गोष्ट ही आहे की या टूलचा वापर करणे अगदी सोपे आहे. काही लोकांना यात अडचणी येतात आणि adsence मिळत नाही याचे सर्वात मोठे कारण म्हणजे website चे चांगल्या प्रकारे optimization केलेले नसते. त्यामुळे तुम्ही Google adsense ला apply करत असताना त्याच्यासाठी गरजा काय आहेत हे जाणून घेऊन आणि त्यांची पूर्तता करूनच मग apply करावे.

तुमच्या वेबसाईटला दिसणाऱ्या सर्व जाहिराती या गुगलच्या adwords program मधून येत असतात. इथे अनेक मोठ्या कंपन्या स्वतःच्या जाहिराती देत असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास- GoDaddy गुगलच्या माध्यमातून त्यांची जाहिरात देते. गुगल ही जाहिरात तुमच्या वेबसाईटवर लावत असेल तर तुम्ही याचे प्रकाशक आहात आणि Godaddy ही जाहिरात देणारी कंपनी आहे. जाहिरात देणाऱ्या कंपनीकडून येणाऱ्या रक्कमेच्या 80% रक्कम ही गुगल कडून प्रकाशकाला दिली जाते आणि उरलेली रक्कम गुगल स्वतःकडे घेते.

2. Youtube वापरून पैसे कमवा | Earn money from youtube in Marathi

सध्याच्या काळात युट्युब फक्त आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय झाले आहे. YouTube विषयी लोकप्रियता आता भरपूर प्रमाणात वाढत आहे कारण लोक वाचनापेक्षा व्हिडीओ बघणे जास्त पसंत करत आहेत. आपण सध्या असे अनेक व्हिडिओ क्रिएटर बघत आहोत जे त्यांच्या चांगल्या व्हिडीओ मुळे एका रात्रीतून स्टार बनले आहेत.

सध्या एक Internet User बाकी कोणत्याही वेबसाईटच्या तुलनेत युट्युब वर जास्तीत जास्त वेळ घालवतो आहे. आज अनेक असे लोक आहेत जे YouTube वापरून वर्षाला 1.5 करोड रुपयांहून अधिक पैसे कमवत आहेत. YouTube त्याच्या Video Creators ला Content ला monetize करण्याचा पर्याय देते. Creators ला त्याच्या व्हिडीओ च्या आधी येणाऱ्या व्हिडीओ ऍड च्या आधारावर पैसे दिले जातात. या जाहिरातीवर क्लीक केल्यास जास्त पैसे क्रिएटरला मिळतात. मुख्यतः जाहिराती मधून होणारी कमाई ही Youtube वरून पैसे कमविण्याचा मुख्य मार्ग आहे. जर तुम्ही एक video creator असाल तर तुमच्या व्हिडीओ सुरू असताना येणाऱ्या जाहिरातीच्या आधारावर तुम्ही पैसे कमवू शकतात. यामध्ये जेव्हा user एखादी जाहिरात 30 सेकंद किंवा पूर्ण बघतो किंवा त्यावर क्लीक करतो तेव्हा त्या व्हिडिओ बनविणाऱ्याला youtube पैसे देते. हे सर्व Google Adsense च्या माध्यमातूनच सुरू असते.

3. AdMob मधून पैसा कसा कमवतात | Earn money by making apps in Marathi

आजच्या घडीला ज्या प्रकारे स्मार्टफोन ची मागणी वाढत चालली आहे त्याला बघून हे नक्कीच सांगता येईल की पुढे जाऊन सर्व लोक हे स्मार्टफोन वर अवलंबून राहतील आणि याची मागणी प्रत्येक दिवसागणिक वाढतच जाईल. आज जवळपास सर्वांच्या हातात Android Smartphone आहेत. यामुळे आपल्याला दिवसेंदिवस नवनवीन Android Applications ची गरज पडते आहे आणि बाजारात ते येत देखील आहेत. गुगल प्ले स्टोअर वर आपल्याला प्रत्येक दिवसाला नवनवीन अँप्स बघायला मिळत आहेत.
तुमच्या मनात जर एक आयडिया असेल आणि तुम्ही जर ती वापरून app बनविले आणि ते लोकांना आवडले तर तुम्ही ते प्ले स्टोअर वर टाकू शकता. तुमच्या अँप ला जितके जास्त डाउनलोड येतील त्याप्रमाणात तुम्हाला इनकम ही होत जाईल. App डाउनलोड करत असताना त्या युझर ला काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत मात्र तुम्ही लावलेल्या ads त्याला त्या अँप मध्ये दिसतील. या सर्व जाहिराती गुगल admobs कडून आलेल्या असतील. यातून तुम्हाला इनकम होऊ शकते.

आता तुम्हाला एक शंका आली असेल की मी तर काय एक developer नाहीये मग app तरी कसे बनवू? जर तुमच्याकडे एखादी आयडिया आहे आणि खिशात पैसा आहे तर मग तुम्ही सहज एखाद्या developer कडून app बनवून घेऊ शकतात. यासाठी एखादा चांगला app developer शोधून त्याला तुमची संकल्पना अगदी व्यवस्थित सांगून app बनवून घ्या. तुम्हाला Fiverr या वेबसाईट वर खूप कमी किमतीमध्ये app developer भेटून जाईल. एकदा अँप बनले की ते प्ले स्टोअर वर अपलोड करा. तुम्ही बनविलेल्या अँप चे एखादे प्रीमियम व्हर्जन देख तुम्ही बनवू शकता. हे व्हर्जन डाउनलोड करत असताना युझर्सला पैसे द्यावे लागतील. यातून देखील तुमची चांगली इनकम होईल.

Conclusion | आज आपण काय शिकलो?

आम्हाला आशा आहे की आमचा गुगल मधून पैसे कसे कमवावेत हा लेख नक्कीच आवडला असेल. आमचा कायम हाच प्रयत्न असतो की वाचकांना गुगल वरून पैसे कसे कमवावेत या विषयी संपूर्ण माहिती द्यावी. जेणेकरून या लेखानंतर वाचकांना या विषयाशी संबंधित इंटरनेटवर इतर ठिकाणी माहिती शोधण्याची गरज पडणार नाही.

हे देखील वाचा

Earn money using blogging in Marathi

How To Earn Money From Youtube in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “How to earn money from Google in Marathi | गुगल वरून पैसे कसे कमवतात?”

Leave a Comment