www.marathivarsa.com

कबड्डीचे १० आश्चर्यकारक फॅक्टस जे तुम्हाला माहित नसतील!!

१. असे म्हटले जाते की कबड्डी भारतामध्ये 4000 वर्षांपूर्वीपासून खेळला जाणारा खेळ आहे.

२. कबड्डी हा बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ आहे.

३. कबड्डी हे भारत आणि आशियाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. हे महाराष्ट्रात हुतूतू या नावाने ओळखले जाते. बांगलादेश मध्ये हडुडू, मालदीव मध्ये बाईबाला, आंध्र प्रदेश मध्ये डुगुडू आणि तामिळनाडु मध्ये सदागुडू या नावाने ओळखले जाते.

४. कबड्डी या खेळाला, १९३६ बर्लिन ओलंपिकमध्ये जगभरात मान्यता प्राप्त झाली, जेव्हा अमरावती, महाराष्ट्रच्या व्ययाम प्रसारक मंडळाने याचे प्रदर्शन केले.

५. कबड्डी हा एकमेव खेळ आहे ज्यात भारतीय संघ पुरुष आणि महिला दोघांनीही विश्व कप जिंकला आहे.

६. 'कबड्डी' हा शब्द तामिळ शब्दापासून आला आहे, काई-पिडी, म्हणजे 'हात धरून' असा अर्थ होतो.

७. आयपीएल नंतर, प्रो कबड्डी लीग ही भारतीय टिव्हीवरील द्वितीय क्रमांकावर पहिला गेलेला खेळ आहे.

८. कबड्डी या खेळाची सुरवात कुठून झाली हे अजून काही कळलेलं नाही आहे. पण अनेकांचा विश्वास आहे कि, महाभारताच्या दरम्यान अभिमन्यू ने या खेळाची सुरवात केली होती.

९. १९५० मध्ये या खेळाचे नियमन करण्यासाठी पहिली अधिकृत संस्था स्थापन झाली. त्यांना ऑल इंडिया कबड्डी फेडेरेशन (AIKF) असे नाव ठेवण्यात आले होते.

१०. कबड्डीचे दोन मुख्य स्वरूप आहेत: आंतरराष्ट्रीय नियम कबड्डी आणि सर्कल-शैलीतील कबड्डी.

You May Also Like

Add a Comment