लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी
तुम्हाला सगळ्यांना हे गाण माहीतच असेल आणि हे गाण ऐकताना किंव्हा बोलताना एक मराठी माणूस असल्याचा अभिमान सगळ्यांनाच जाणवतो. परंतु आपल्या मराठी मायबोली बद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी ठाऊक नसतील म्हणून आज मराठी भाषेबद्दलच्या ह्या काही रोमांचक गोष्टी जाणून घ्या.
१) मराठी भाषा हि इंडो-युरोपियन काळातील एक भाषा आहे आणि असे म्हटले जाते कि मराठी हि १५०० वर्ष जुनी भाषा आहे.
२) भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी भाषा एक आहे तसेच मराठी भाषा संपूर्ण जगात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये १५व्या नंबर वर आहे व भारतात चोथ्या क्रमांकावर आहे.
३) शिवकाळापुर्वी म्हणजेच सन १६३० साली मराठी भाषेतील ८०% शब्द पार्शियन होते, शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकानंतर , सन १६७७ ला हा वापर ३०% झाला होता. महाराजांनी मराठी भाषेला देखील परकियांपासून मुक्त केले.
४ ) २०११ च्या सर्वे नुसार भारतातील ८३ दशलक्ष लोकसंख्या मराठी भाषेचा उपयोग करतात.
५) महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे.
६) मूळ मराठी भाषा हि जास्त करून ‘मोडी’ लिपीत लिहिली गेली आहे, १९०० सालानंतर ती आता देवनागरी लिपीत लिहिली जाऊ लागली.
७) जर एखाद्या माणसाला हिंदी भाषा माहित असेल तर तो मराठी भाषा सहज पणे समजू व शिकू शकतो.
८) असे हजारो शब्द मराठी आणि हिंदी भाषेमध्ये समान आहेत ज्यामुळे कोणीही हि भाषा समजू शकतो. उदा: धन्यवाद , स्वागत, पती , पत्नी. ई
९) सध्या मराठी मध्ये वेगवेगळ्या ४२ बोलीभाषा आहेत त्यातील काही भाषेतील अक्षरे हि इतर भाषेमधून घेतली आहेत जसे कि मराठी भाषेतील “ळ” हे अक्षर तमिळ भाषेतून आला आहे.
१०) काही मराठी बोलीभाषा: अहिरानी, खांदेशी, वऱ्हाडी (वैदर्भी), झाडीबोली,आगरी, कोकणी, मालवणी, सामवेदी आणि इतर.
११) मराठी हा शब्द “महाराष्ट्री” या शब्दातून तयार झाला.
हे देखील वाचा: महाराष्ट्राबद्दल आश्चर्यकारक तथ्य आणि महत्वाची माहिती
१२) मराठी साहित्यप्रेमींसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी घेतले जाते. साहित्य संमेलन घेणारी मराठी हि एकमेव भाषा आहे.
१३) आता इंटरनेट वरील सगळ्या महत्वाच्या वेबसाईटस मराठी भाषा हा पर्याय आवर्जून देतात.
१४)भारतात सर्वाधिक विकले जाणारे मासिक “लोकराज्य” हे आहे जे आपले महाराष्ट्र शासन छापते तसेच देशातील सर्वाधिक विकले जाणारे चौथ्या क्रमांकाचे मराठी वर्तमानपत्र “लोकमत” हे आहे.
१५) भारताबाहेरील एकूण १५ विद्यापीठात (15 Universities) मराठी भाषा शिकवली जाते.
१६) विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, वी.स.खांडेकर आणि श्री. भालचंद्र नेमाडे अश्या चार मराठी साहित्यकांना आजवर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत.
१६) कराची, पाकिस्तान सारख्या ठिकाणी देखील एक साधारण ५००० मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा संघ आहे.
१७) मराठी भाषेला वैज्ञानिक भाषा असे देखील म्हटले जाते. या भाषेच्या प्रत्येक शब्दाला काही ना काही कारण आहे. इंग्लिश भाषेमध्ये हि गोष्ट आढळून येत नाही.
१८) कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी “मराठी भाषा दिन” साजरा केला जातो.
१९) भारताच्या इतिहासात अनेक मराठी लोक आजवर झळकले आहेत जसे कि:
स्वराज्याचा पाया रचणारे : छत्रपती शिवाजी महाराज : मराठी
मुलींना शिकविणाऱ्या पहिल्या शिक्षिका : अहिल्याबाई होळकर : मराठी
भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर : डॉ. आनंदीबाई जोशी : मराठी
भारतीय घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर : मराठी
भारतीय चित्रपटाचे जनक : दादासाहेब फाळके : मराठी
भारताची गानसम्राज्ञी : लता मंगेशकर : मराठी
क्रिकेटचा लिटील मास्टर : सुनील गावस्कर : मराठी
क्रिकेटचा देव: सचिन तेंडूलकर : मराठी
भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती: प्रतिभा पाटील: मराठी
मराठी माणसाचे हिंदुहृदयसम्राट : बाळासाहेब ठाकरे : मराठी
आणि असे अनेक मराठी लोक आहेत. अशी आहे आपली सर्वगुणसंपन्न मातृभाषा.. चला तर मग तिला सर्व मिळून जपूया.. मराठी वारसा पुढे नेऊया….
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.