Mothers Day Quotes in Marathi | Mothers Day Status in Marathi | मदर्स डे मराठी शुभेच्छा 2024

Mothers Day Quotes In Marathi 2024 | आईसाठी मदर्स डे कोट्स मराठी मध्ये

Mothers Day marathi quotes
Mothers Day Marathi quotes

देवाने फक्त हि शक्ती एका स्त्रीला दिली आहे कि ती एक नव्या जीवाला या जगामध्ये घेऊन येऊ शकते. आई आपल्या मुलाला जन्म देते आणि तिच्या साठी तिचा मुलगा काळजाचा तुकडा असतो . आई आपल्या मुलाबरोबर सावलीप्रमाणे जीवन जगते आणि प्रत्येक लहान-मोठ्या गरजा भागवते. आई जे बलिदान आपल्या मुलासाठी देत असते त्यांचे ऋण मूल कधीही परतफेड करू शकत नाही.

मदर्स डे आपल्या आईसाठी काहीतरी करण्याचा आपला एक मार्ग प्रदान करतो. मदर डे ची सुरुवात अमेरिकेतून 1912 साली झाली होती. हा दिवस जगभर साजरे करण्याची तारीख थोडी वेगळी आहे. परंतु बहुतेक देशांमध्ये मदर्स डे मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी साजरा केला जातो. यंदा मदर्स डे 9 मे रोजी साजरा केला जाईल. परंतु देश आणि जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या दिवसाची चमक थोडीशी धूसर होऊ शकते. परंतु लॉकडाउन झाल्यासही आपण संपूर्णपणे आपल्या आईसोबत मदर्स डेचा आनंद घेऊ शकता. आजच्या या लेखामध्ये दिलेल्या Mothers Day Quotes in Marathi तसेच Mothers Day Status in Marathi या भावनिक संदेशांसह तिचा दिवस सुंदर बनवा आणि तिचा आशीर्वाद मिळवा.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा आमचा मदर्स डे शुभेच्छांचा संघ्रह आवडेल. तसेच तुम्ही यातिल कोणतेही संदेश किव्हा image download करून तुमच्या आईसोबत नक्की शेअर करा.

Mothers Day Quotes In Marathi 2024

आई म्हणजे निस्वार्थी प्रेम
आणि उत्तुंग माया,
उत्साह आणि आपलेपणा…
आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा! 🙏

ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”…
आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!🙏

रोज तुला हाक मारल्याशिवाय
माझा एकही दिवस जात नाही..
आईच्या प्रेमाची माय काहीही
केल्या कमी होत नाही.
🙏मातृदिनाच्या शुभेच्छा 🙏

देवाच्या मंदिरात
एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिलाय मला…

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…

Aai quotes in marathi

aai quotes in marathi
aai quotes in marathi

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते,
डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते… ती आई असते,
खरंच… आई किती वेगळी असते…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🙏

आई…… लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते,
आई असते जन्माची शिदोरी, सरतही
नाही उरतही नाही..!

पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!

आई अशी एकच व्यक्ती आहे….
जी तुम्हाला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखत असते

आई म्हणजे मंदीराचा उंच कळस,
अंगणातील पवीत्र तुळस
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
वाळवंटात प्याव अस थंड पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी,
वाळवंटात प्याव अस थंड पाणी,
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी
आणी वेदनेनंतरची सर्वात पहीली आरोळी.

Mothers Day Status In Marathi । मदर्स डे स्टेटस मराठी मध्ये

Mothers Day Status In Marathi
Mothers Day Status In Marathi

सगळे दिले मला आयुष्याने …
आता एकच देवाकडे मागणे..
प्रत्येक जन्मी मला हिच आई
मिळो या पेक्षा अजून काय हवे…

आई
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही…
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई…

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी..
मातृदिनाच्या शुभेच्छा

mothers day wishes in marathi

mothers day wishes in marathi
mothers day wishes in marathi

गरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही पोळायची…
भाकरीच्या पदरात मला आईची माया दिसायची

आई तुझ्या मूर्तीवाणी..
या जगात मूर्ती नाही..
अनमोल जन्म दिला
आई तुझे उपकार
या जन्मात तरी फिटणार नाही

तू कितीही मला मारलेस
तरी तुझ्यावरील माया काही आटत नाही.
तुझ्याशिवाय आता या जगात मला जगायचे नाही.

आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम.. तूच माझा पांडुरंग
आई उच्चारानेच होईल सगळ्या वेदनांचा अंत..
मातृदिनाच्या शुभेच्छा! –

आई माझी गुरु.. आई तू कल्पतरु…
आई माझी प्रितीचे माहेर..
मांगल्याचे सार…सर्वांना सुखदा पावे…
अशी आरोग्यसंपदा
आई तुला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

mothers day wishes in marathi
mothers day wishes in marathi

जन्म दिला तू मला..
माणूस म्हणून घडवले..
तुझ्याशिवाय या जगात काहीही नाही चांगले

Mothers day caption in Marathi । मदर्स डे निमित्त मराठीतून कॅप्शन

Mothers day caption in Marathi
Mothers day caption in Marathi

आभाळाएवढी माया जिची…
ईश्वरासमान कृपा तिची..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगाच्या बाजारात सगळे काही मिळते…
पण आईचे प्रेम काहीही केल्या विकत मिळत नाही.

घराला घरपण आणते ती आई…
आणि तुमचे बालपण अधिक सुंदर करते
ती म्हणजे आपली आई

माझ्या आयुष्यातील पहिला शिक्षक म्हणजे माझी आई…
आई तुला मात-दिनाच्या शुभेच्छा!

आई तुला किती काय काय सांगायचे असते..
तुझ्यावरचे माझे प्रेम मला शब्दात व्यक्त करायचे असते..
पण तुला पाहिल्यानंतर मला फक्त तुझ्या कुशीत राहायचे असते.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दु:खात हसवी..सुखात झुलवी…
गाऊनी गोड अंगाई.. अशी ही माझी आई

जगात असे काही नाही… जशी माझी प्रिय आई…
ठेच लागता माझ्या पायी.. वेदना होते तिच्या हृदयी

matrudinachya shubhecha
matrudinachya shubhecha

कितीही चुकीचे वागलो तरी
मोठ्या मनाने माफ करणारी
एकमेव व्यक्ती आहे माझी आई…
तीच माझी सर्वस्व.. तिच माझी मैत्रीण

जगात तुमच्यावर प्रेम करणारे
शोधत बसण्यापेक्षा तुमच्यावर
नि:स्वार्थपणे प्रेम करणाऱ्या आईला जवळ करा..
तुम्हाला कधीच कोणाची गरज भासणार नाही.

जी माझ्यासाठी खूप काबाडकष्ट करते
अशा माझ्या माऊलीला मातृदिनाच्या शुभेच्छा!

Mothers day messages in Marathi । मदर्स डे शुभेच्छा मराठी मध्ये

Mothers day messages in Marathi
Mothers day messages in Marathi

‘आई’ या दोन शब्दांनी
सारे विश्व व्यापून टाकणाऱ्या
वात्सल्यरुप आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम असलेल्या
माझ्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!

जगातील सगळीजण तुम्हाला एकदिवस सोडून जातील..
पण आई तुमची साथ कधीच सोडणार नाही.

आईची माया शब्दा मांडू शकेल असा कोणीही नाही..
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही कितीही मोठे झालात तरी
आईसाठी तुम्ही कायम लहान असता ..
तिच्यासाठी तुम्ही कायम तिचे बाळ असता..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

mothers day wishes in marathi 

mothers day wishes in marathi (1)
mothers day wishes in marathi 

आई असतो एक दिवा जो सतत तुमच्या मनात तेवत असतो..
क्षणोक्षणी तो तुमच्या मनात सकारात्मकता वाढवत असतो.

असा एकही दिवस जिच्या आठवणीशिवाय जात नाही…
ती व्यक्ती म्हणजे फक्त आई

सगळ्या जगाने तुम्हाला नाकारले तरी
तुम्हाला आहे त्या रुपात प्रेम करणारी
एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे आई..
आई तुला मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा!

आत्मा आणि ईश्वर
यांचा संगम असलेल्या
माझ्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!

जगातील सगळीजण तुम्हाला एकदिवस सोडून जातील..
पण आई तुमची साथ कधीच सोडणार नाही.

आईची माया शब्दा मांडू शकेल असा कोणीही नाही..
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही कितीही मोठे झालात तरी
आईसाठी तुम्ही कायम लहान असता ..
तिच्यासाठी तुम्ही कायम तिचे बाळ असता..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई असतो एक दिवा जो सतत तुमच्या मनात तेवत असतो…
क्षणोक्षणी तो तुमच्या मनात सकारात्मकता वाढवत असतो.

Mothers day wishes Marathi । मातृ दिन मराठी शुभेच्छा

Mothers Day Quotes in Marathi from daughter
Mothers Day Quotes in Marathi from daughter

असा एकही दिवस जिच्या आठवणीशिवाय जात नाही…
ती व्यक्ती म्हणजे फक्त आई

सगळ्या जगाने तुम्हाला नाकारले तरी
तुम्हाला आहे त्या रुपात प्रेम करणारी
एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे आई..
आई तुला मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा!

आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा…
पण कोणासाठी आईला सोडू नका.

ना कोणासाठी झुरायचं..
ना कोणासाठी मरायचं..
देवानं आई दिली आहे
तिच्यासाठी कायम जगायचं.
मातृदिनाच्या शुभेच्छा!

माझी स्तुती करताना ती कधी थांबत नाही…
आणि माझा मोठेपणा सांगतना
तिच्या आनंदाला पारावर उरत नाही..
अशी ही माझी आई

गल्ली गल्लीत असतील भाई…
पण माझी आई जगात सगळ्यात भारी

जे आधी प्रेम होतं ते तुझ्यावर तसचं
असेल आई तुझ्याशिवाय माझं विश्व काहीच नसेल.

चंद्राचा तो शीतल गारवा…
मनातील प्रेमाचा पारवा..
प्रत्येक दिवशी आई तुझा
हात माझ्या हातात हवा.

घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही…
जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही.

‘आ’ म्हणजे आत्मा…
आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर..
आई तुला तुझ्या खास दिवसाच्या शुभेच्छा!

सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात..
तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर ‘आई’ हेच शब्द राहतात.

ठेच लागता माझ्या पायी..
वेदना होते तिच्या हृदयी..
33 कोटी देवांमध्ये मला श्रेष्ठ माझी ‘आई’

आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे
जी तुम्हाला तुमच्या जन्माआधीपासून ओळखते.

घार हिंडते आकाशी .. चित्त तिचे पिल्लापाशी…
प्रत्येक आई तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर
तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते.

कितीही भांडण झाले तरी
कधीच सोडून जात नाही साथ..
ती असते फक्त आपली आई खास

तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी
तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचे
सामर्थ्य फक्त आईमध्ये असते.

जगात असे एकच न्यायालय आहे
जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई, हजार जन्म घेतले तरी एका जन्माचे ऋण फिटणार नाही..
आई लाख चुका होतील मजकडून तुझं समजावणं मिटणार नाही.
मातृदिनाच्या शुभेच्छा!

देवा सुखी ठेव तिला जिने जन्म दिलाय मला..
आई मातृदिनाच्या मन: पूर्वक शुभेच्छा!

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम,
हृदयाच्या किती कप्प्यात मीत ते साठवू मी,
कितीदा नव्या हृदयाचा संदेश देवाकडे
क्षणाक्षणाला पाठवू मी
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई तुझ्या संस्कारातून कोवळ्या रुपाचे तरु झालो,
मी कसा गं विसरेन तुला,तुझ्यामुळेच मी झालो महान..
मातृदिनाच्या शुभेच्छा!

हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासारखी
दोन अक्षरे ती म्हणजे ‘आई’

नातं मायेचं, छत्र छायेचं… मातृदिनाच्या शुभेच्छा!
हात तुझा मायेचा, असुदे मस्तकावरी,
झेलली आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी….
आपणा सर्वांना मातृदिनाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा!

आई असते जन्माची शिदोरी ..
सरतही नाही आणि उरतही नाही..
मातृदिनाच्या शुभेच्छा!

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी…
आई या शब्दात सगळे विश्व सामावलेले आहे..
मातृदिनाच्या शुभेच्छा!

देव हा कोणी पाहिला माहीत नाही..
पण आईमध्ये सर्वांनाच देव दिसतो…
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई हा जगातील सर्वश्रेष्ठ शब्द आहे…
सगळ्या आईंना मातृदिनाच्या शुभेच्छा!

तुमच्याकडे सगळे असेल पण आई नसेल
तर तुम्ही सगळे असूनही अभागी आहात

तुझ्या ओठांवरील हसू असेच कायम असू दे
आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ असू दे..
मातृदिनाच्या शुभेच्छा!

तुझ्या ओठांवरील हसू असेच कायम असू दे
आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ असू दे..
मातृदिनाच्या शुभेच्छा!

कोठेही न मागता मिळालेले भरभरुन दान म्हणजे ‘आई’.
विधात्याच्या कृपेचे निर्भेळ वरदान म्हणजे ‘आई’

‘आई’ या शब्दात फक्त दोन अक्षरे आहेत.
पण या शब्दात नभाइतके सामर्थ्य आहे.

मायेनं भरलेला कळस म्हणजे ‘आई’
मायेनं विसावा देणारी सावली म्हणजे ‘आई’

एवढ्या दूर जाऊन लोकं करतात पंढरीची वारी..
पण आईचे चरण हेच श्रेष्ठ.. माझ्यासाठी पंढरीहून भारी

पूर्वजन्माची पुण्याई असावी..
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला..
जग पाहिलं नव्हतं पण श्वास स्वर्गात घेतला होता.

शोधून मिळत नाही पुण्य… सेवार्थाने व्हाने धन्य…
कोण आहे तुझ्यावीन धन्य ‘आई’

आई तुझ्यापुढे माझी व्यथा कशाला?
जेव्हा तुझ्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आला..
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

देवाकडे एकच मागणे आता भरपूर आयुष्य लाभो तिला..
माझ्या प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला

या जीवनात आई माझी सर्वप्रथम गुरु..
त्यानंतर माझे जीवन झाले सुरु..
मातृदिनाच्या शुभेच्छा

आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाही..
तिचे उपकार फेडायला सा जन्मही पुरणार नाहीत.

पहिला शब्द जो मी उच्चारला…
पहिला घास जिने मला भरवला…
हाताचे बोट पकडून जिने मला चालायला शिकवले..
आजारी असतानाही जिने माझ्या रात्रदिवस जागून काढले..
त्या माझ्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!

माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही…
कितीही कामात असली तरी मला फोन करायचे विसरत नाही…
कितीही चिडलो तिच्यावर तरी ती माझ्यावर चिडत नाही…
म्हणून तर आई तुला सोडून मला कुठेच जावेसे वाटत नाही.

आई तुझ्या कुशीत पुन्हा यावेसे वाटते…
निर्दयी या जगापासून खरचं दूर जावेसे वाटते.

रोज सकाळी मनामध्ये तुझा फोन वाजत असतो…
आई तुझा आवाज मला तुझी खुसाली सांगत असतो.

कातर होऊन जातो स्वर..
दबून जातो हुंकार…
भेटीला जीव तळमळतो..
जेव्हा येतो तिचा आवाज

आकाशाचा जरी केला कागद…
अन् समुद्राची केली शाई…
तरीही आईच्या प्रेमाबद्दल
कधीच काही लिहून होणार नाही

Miss You Aai Messages In Marathi |  मिस यु आई मराठी मेसेज

Miss You Aai Messages In Marathi
Miss You Aai Messages In Marathi

आज खूप दिवसांनी आई तुझी आठवण आली..
का ग तू मला लवकर सोडून गेलीस..
मातृदिनाच्या शुभेच्छा!

आईच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे..
तिने दिलेले हृदयरुपी फूल सुकले तरी सुंगध त्याचा सुकणार नाही रे…
आई तुझी खूप आठवण येते..

मन आईचं कधीच कोणाला कळत नाही..
ती दूर जाता तिच्यावाचून ही करमत नाही.
काय करु आई आज तुझी खूप आठवण येते…
मला प्रत्येक ठिकाणी आज तुझीच सावली दिसते.

कधी रागावलो चिडलो असेल मी तुझ्यावर आई तर मला माफ कर..
पण तुझ्यापेक्षाही जास्त मला तुझी काळजी आहे.
तुझी आठवण आल्यावाचून माझा एकही दिवस जात नाहीए

रोज तुला घरी आल्यानंतर पाहायची सवय झाली होती..
आज तू दिसली नाहीस त्यावेळी मला तुझी नसण्याची किंमत कळली आई…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

‘आई’ हा शब्द पहिल्यांदा उच्चारणं असते एक आठवण…
आईचं बोट धरून रांगणारा पोर चालू लागतो ती असते आठवण…
भुकेलेल्या पिलाला घास भरवते आई… ती एक आठवण…
आईच्या डोळ्यांदेखत मुलं आकाशात उंच झेप घेतात ती असते आठवण…
सरतेशेवटी “आई तुला नाही गं कळत यातलं काही” असं म्हणण्याजोगी मोठी होतात मुलं..ती एक आठवण…

दु:खात हसवी, सुखात झुलवी,गाऊनी गोड अंगाई.
जगात असे काहीही नाही,जशी माझी प्रिय आई.
ठेच लागता माझ्या पायी,वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये,श्रेष्ठ मला मझी “आई”.

तुझ्या अपरंपार कष्टाच आज बीज होऊ दे.
डोळे मिटून बसलेल्या नशिबाचे आज चीज होऊ दे
.तु पार केलेस डोंगर दुखाचे,पाखरांच्या पोटात जाळ होऊ दे.
किती सहन केलस आयुष्य यातनांच,आज मला तुझ आभाळ होऊ दे.
माझ्या जगण्याच सार होऊ दे

आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे
आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे.

मित्रांनो या पोस्ट मधील Mothers Day Quotes in Marathi तसेच Mothers day caption in Marathi आवडले असतील, तर Facebook आणि Whatsapp द्वारे तुमच्या आईसोबत नक्की शेअर करा.

जर तुमच्या कडे सुद्धा काही असेच सुंदर सुंदर Mothers Day Status in Marathi असतील तर कंमेंट बॉक्स द्वारे नक्की नोंद करा आम्ही तुम्ही दिलेले Mothers day sms in Marathi सुद्धा या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद🙏

नोट: या आजच्या पोस्टमध्ये दिलेले happy mothers day in Marathi, mothers day caption in Marathi, mothers day messages in Marathi, Mothers Day Quotes In Marathi, mothers day quotes in Marathi from daughter, Mothers Day Status In Marathi तसेच happy mothers day images in Marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर द्या.

सर्वांना मराठी वारसा टीम तर्फे मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा… 🙏

हे देखील वाचा

Mom Dad status in Marathi

Friendship status in Marathi

Success Quotes in Marathi

Love quotes in Marathi

Sad Quotes in Marathi

Motivational Quotes in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “Mothers Day Quotes in Marathi | Mothers Day Status in Marathi | मदर्स डे मराठी शुभेच्छा 2024”

Leave a Comment