बाजारात रसायनांनी युक्त सौंदर्य उत्पादने भरपूर प्रमाणात भेटतात. ते आपल्या त्वचेला कसे नुकसान करतात हे आपण पाहिलेच असाल. अशा परिस्थितीत आपण आपल्या त्वचेची नैसर्गिकरित्या काळजी घेणे महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेले काही पदार्थांचा उपयोग करू शकता. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला बेसनचा वापर करून फेस पॅक कसे बनवू शकतो ते सांगणार आहोत.
१) बेसन आणि टोमॉटो यांची पेस्ट एकत्र करून चेहऱ्यास लावल्याने चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी होतात तसेच चेहरा उजळण्यास मदत होते.
2) बेसन मध्ये हळद पावडर व लिंबाचा रस मिसळून लावल्याने त्वचे वरील कळवटपणा (sun tanning) कमी होतो.
३) बेसन, मध व हळद पावडर लावल्याने चेहऱ्या वरील सुरकुत्या दूर होतात.
४) बेसनामध्ये कच्चा दूध मिसळून लावल्यास चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो.
५) बेसनामध्ये दही मिसळून लावल्यास चेहरा गोरा होण्यास मदत होते तसेच चेहयावरील डाग नाहीसे होण्यास मदत होते.