Information about China in Marathi । चीन देशाची माहिती | Chin chi mahiti
चीन(China Facts in Hindi) हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना म्हणूनही ओळखला जातो. चीन जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, ज्याने अवघ्या 30 वर्षात चीनचे रूपांतर केले. चीनच्या लोकांच्या मेहनतीने आज चीन जगातील एक बळकट अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो.
1. गेल्या एक दशकात चीनचा आर्थिक विकास USA पेक्षा ७ टक्क्यांनी वाढला आहे.
2. जागतिक स्तरावर 85% कृत्रिम ख्रिसमस ट्री आणि 80 टक्के खेळणी चीन मध्ये बनवली जातात.
3. चीनी लोक प्रत्येक सेकंदाला 50,000 सिगारेट पितात.
4. जगभरात अंडी पाण्यात उकळली जातात तर चीनमध्ये अंडी हि मुलांच्या मूत्रामध्ये उकळली जातात.
5. जगातील सर्वात जुना कागदाचा तुकडा चीन मध्ये आढळतो हा इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातला आहे. हा कागदाचा तुकडा खूप मजबूत आहे आणि याचा उपयोग कपडे तयार करण्यासाठी सुद्धा केला जायचा.
6. चीन मध्ये 3000 बीसी पूर्व पासून रेशीम निर्मिती करण्यात येत आहे. रोमन लोकांनी चीन चे नाव ‘सैरिका’ ठेवले होते म्हणजे “रेशीमच्या देशात’. चीनी लोकांनी रेशीमच्या किड्यांपासून रेशीम बनवण्याची कृती सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. आणि ह्या पद्धतीने जो कोणी रेशीम तयार करेल त्याला ठार मारण्यात यायचे.
7 चीनच्या “एक मूल” धोरणामुळे मुलींच्या संख्येत खूप कमतरता आली आहे. चीन मध्ये मुले हि मुलींपेक्षा ३ कोटी २० लाखनी जास्त असून भविष्यात अनेक मुलांना लग्नासाठी मुली भेटणार नाहीत.
8. चीन मध्ये स्वादिष्ट खाद्य म्हणून दरवर्षी ४० लाख मांजरी खाल्ल्या जातात.
9. द वर्ल्ड हे सर्वात मोठे शॉपिंग मॉल चीन मध्ये असून 2005 पर्यंत ते 99 टक्के रिक्त होते.
10. 2030 मध्ये चीनच्या शहरांची लोकसंख्या इतकी असेल की जगातील तिसरा सर्वात मोठा लोकसंख्येचा देश अमेरिकाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक असेल.
11. इटली मध्ये ख्रिश्चन धर्माचा जन्म झाला होता. पण चीन मध्ये 5 करोड, 40 दशलक्ष ख्रिस्ती राहतात.आणि इटलीमध्ये फक्त 4 करोड 74 दशलक्ष ख्रिस्ती लोक राहतात.
12. चीनमध्ये श्रीमंत लोक स्वतः ऐवजी दुसऱ्यांना तुरुंगात पाठवू शकतात.
13. चीन येथे सर्वाधिक जुळी मुले जन्माला येतात.
14. जर आपण चीन आणि उर्वरित जगास वेगळे मानून मूल्यमापन केले तर जगात जितक्या लोकांना मृत्यूची शिक्षा दिली जाते त्यापेक्षा ३ टक्के अधिक लोकांना चीन मध्ये मृत्यूची शिक्षा दिली जाते.
15. चीन मध्ये आत्महत्येच्या इतक्या घटना आहेत की नदीतुन मृत शरीर काढण्याची सुद्धा नोकरी तुम्हाला मिळू शकते.
16. चीनची भाषा चीनी हि जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून इंग्रजी हि दुसरा क्रमांकावर आणि आपली हिंदी हि तिसऱ्या क्रमांकावर आहे.
17. 2008 मध्ये चीन हा असा तिसरा देश बनला ज्याने यशस्वीरित्या मनुष्यास अंतरिक्षामध्ये पाठवले. प्रथम रशियाने पाठविले होते आणि नंतर अमेरिकाने. 27 सप्टेंबर, 2008 मध्ये झई झीगांग(Zhai Zhigang) हे पहिले चिनी अंतराळवीर बनले ज्यांनी अंतराळात प्रवेश केला.
18. चीनची भिंत हि मानवाद्वारे बनवलेली सर्वात मोठी कलाकृती असून हि अंतराळातून सुद्धा दिसते. त्याची लांबी 8,848 किलोमीटर आहे.
19. जगातील प्रत्येक पाचवा मनुष्य चिनी आहे.
20. टॉयलेट कागदाचा शोध इसवी सन १३०० मध्ये चीन मध्ये लागला. पण ते फक्त राज घराण्यातील लोकांद्वारे वापरले जायचे.
21. चीनमध्येच कागद, दिशासूचक यंत्र, बंदुकीच्या दारूचा शोध लागला.
22. 3,000 वर्षे पूर्वी चिनी लोकांनी पतंगाचा शोध लावला. ते याचा वापर युद्धात शत्रूला घाबरवण्यासाठी करायचे तसेच मनोरंजनासाठी सुद्धा याचा उपयोग केला जायचा.
23. चीनमध्ये, वर्ष 2009 पासून फेसबुक आणि ट्विटर वर प्रतिबंध घालण्यात आला आहे. आणि येथील लोक google सुद्धा वापरत नाही, चीनचा स्वतःचा search engine आहे ज्याचे नाव आहे Baidu.
24. अनेक इतिहासकारांचे असे म्हणणे आहे कि फुटबॉलचा शोध 1000 पूर्व मध्ये चीन मध्ये लागला होता.
25. चीनमध्ये सर्वात जास्त लोकांचा आवडता छंद तिकिट गोळा करणे हाच आहे.
26. इसवी सन 103 मध्ये जेहन हॅन्ग या खगोलशास्त्रज्ञाने एक अश्या यंत्राचा शोध लावला ज्याने भूकंपाचे मूल्यमापन करता येत होते.
27. चीनच्या लोकांनीच आईस-क्रीम आणि नूडल्स सारख्या अनेक पक्वानांचा शोध लावला.
28. चीन मधील एक सरकारी कर्मचारी सु गीत यांनी इ.स. 1088 ते 1092 मध्ये प्रथम एक घड्याळ तयार केले जे वेळेसह ताऱ्यांची स्थिती सुद्धा सांगत असे.
29. चीन मध्ये प्राकृतिक गॅसचा वापर इसवी सनाच्या ४ शतक आधीपासून उष्णतेच्या स्रोतासाठी केला जायचा.
30 दुसऱ्या शतकाच्या पूर्वीपासून चिनी लोकांना हे माहिती होते कि मानवी शरीरात रक्त हे सारखे फिरत असते. हि गोष्ट युरोप मध्ये १७व्या शतकापर्यंत माहिती नव्हती. युरोप मध्ये विल्यम हार्वे यांनी (1578-1657) ह्या रक्ताच्या चक्राचा शोध लावला.
31. धनुष्य बाणाच्या शोध सुद्धा चीन मध्ये सर्वात आधी लागला होता.
32. चीनच्या शांघाय शहरामध्ये लाल रंगाची कार वापरणे कायद्यांच्या विरुद्ध आहे.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Information about China in Marathi । चीन देशाची माहिती | Chin chi mahiti) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.
हे देखील वाचा: ब्लॉगसाठी कल्पना आणि विषय कसे शोधावे
हे देखील वाचा: ब्लॉगिंग करण्याचे 12 फायदे काय आहेत?